scorecardresearch

Premium

Maharashtra Assembly Winter Session 2023 : अजित पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार, ठाकरे गटाचा मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा; म्हणाले, “३१ डिसेंबरला…”

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates, Day 3 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

Ajit Pawar Amit Shah
अजित पवार – अमित शाह

Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 11 December 2023 : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा (११ डिसेंबर) तिसरा दिवस आहे. विधीमंडळात आजही राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. तसेच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्यावरील प्राप्तीकर विभागाच्या धाडींनंतर काँग्रेसवर देशभरातून टीका होत आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळू शकतात. कारण राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आंदोलनं करत आहेत. यासह अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही चर्चा होऊ शकते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सांगलीतल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहे. याबाबतचे अपडेट्सही या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील आणि राज्यभरातील वेगवेगळ्या बातम्यांचा आढावा घेतला जाईल.

Rahul Narwekar
मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, राहुल नार्वेकरांची घोषणा
Marathi News Live Updates
शरद पवारांच्या पक्षाच्या नवीन नावाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, “निवडणूक आयोगाचा ७ फेब्रुवारीचा निर्णय…”
maratha reservation latest news marathi
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा; येत्या २० फेब्रुवारी रोजी…
Congress NCP Meeting sharad Pawar
VIDEO : चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावेळी काँग्रेस नेत्यांची शरद पवारांबरोबर खलबतं, मविआच्या गोटात चाललंय काय? नाना पटोले म्हणाले…
Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates : हिवाळी अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

21:06 (IST) 11 Dec 2023
कांदा लिलाव पूर्ववत; निर्यात बंदीनंतर दीड हजाराची घसरण

नाशिक: कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर तीन दिवसांनी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत झाले. पण, उन्हाळ आणि लाल कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली.

सविस्तर वाचा…

21:03 (IST) 11 Dec 2023
भुजबळ आणि पुतण्याविरोधातील याचिका ईडीकडून मागे; मुलगा पंकजविरोधातील याचिका मात्र कायम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच उच्च न्यायालयात सांगितले.

सविस्तर वाचा…

20:46 (IST) 11 Dec 2023
सांगली बाजारात गुळाला ५ हजार १०० रुपयांचा उच्चांकी दर

सांगली: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी झालेल्या गूळ सौद्यात चिक्की गुळास क्विंटलला ५ हजार १०० रुपये उच्चांकी दर मिळाला. सांगली चेंबर्सचे अध्यक्ष अडत दुकानदार अमरसिंह देसाई यांच्या श्री पंचलिंगेश्वर या दुकानांमधील गूळ सौद्यामध्ये शेतकरी सुरेश मारुती पुणेकर (रा. निडगुंदी, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांच्या अर्धा किलो पॅकिंग मधील चिक्की गुळास ५ हजार १०० रुपये प्रती क्वि़टल इतका उच्चांकी दर मिळाला.

सविस्तर वाचा…

20:32 (IST) 11 Dec 2023
सरोगसीसाठी सरकार देणार आर्थिक मदत? महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार

मुंबई: वंधत्वामुळे हैराण असलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ किंवा सरोगसीमुळे दिलासा मिळाला असला तरी त्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे आजही अनेकांची अपत्यप्राप्तीची इच्छा अपूर्णच राहत आहे.

सविस्तर वाचा…

20:25 (IST) 11 Dec 2023
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केल्याचा शेजाऱ्यांचा आरोप; सावकाराचा आरोप व्यक्तिद्वेशातून – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: शिंदे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे पुन्हा एकदा वादामध्ये गुरफटले आहेत. क्षीरसागर व त्यांच्या मुलाने बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या शेजाऱ्यांनी केला आहे.

सविस्तर वाचा…

20:07 (IST) 11 Dec 2023
कोट्यावधींचा निधी आणल्याचे सांगणाऱ्या पालकमंत्री खाडेंनी पदयात्रा रस्त्याची अवस्था पाहवी – वनमोरे

सांगली: कोट्यावधीचा निधी आणल्याचा दावा करणार्‍या पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेतील रस्त्यांची अवस्था काय आहे हे पदयात्रा करून पाहावे. केवळ मीच विरोधी उमेदवार निश्‍चित करतो असे सांगत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे उद्योग बंद करावेत असे आव्हान जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब वनमोरे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.

सविस्तर वाचा….

19:53 (IST) 11 Dec 2023
ललित पाटील प्रकरणात सत्य लवकरच बाहेर; सुषमा अंधारे यांचा दावा

नाशिक: अमली पदार्थ माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे येथील ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची सखोल चौकशी व्हावी. या प्रकरणात लवकरच सत्य बाहेर येईल.

सविस्तर वाचा…

19:42 (IST) 11 Dec 2023
सोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

सोलापूर: कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अलिकडे कांद्याची वाढती आवक आणि दर घसरणीसह लिलाव रद्द होण्याचे प्रकार घडत असताना सोमवारी उच्चांकी म्हणजे एक लाख ३० हजार क्विंटलपेक्षा जास्त कांदा दाखल झाला.

सविस्तर वाचा…

19:29 (IST) 11 Dec 2023
एसटीमध्ये आता प्रवाशांना ‘डिजिटल’ तिकीट मिळणार; प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार; यूपीआय, क्युआर कोड सुविधा उपलब्ध

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्टे पैशांवरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद होतात. परंतु, आता एसटी महामंडळाने ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

सविस्तर वाचा…

17:45 (IST) 11 Dec 2023
गोवा मुंबई महामार्ग नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी १५ मिनिटांसाठी रोखला

पनवेल: आमरण उपोषणाचा सहावा दिवस उलटला तरी राज्य सरकार लक्ष देत नसल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पोलीसांना साकडे घालून प्रतिघात्मक रास्तारोको १० मिनिटांसाठी करु देण्याचे आवाहन केले.

सविस्तर वाचा…

17:39 (IST) 11 Dec 2023
सांगली : तासगाव तालुक्यात भानामतीचा प्रकार

सूप, दुरडी, लिंबू, नारळ, लवंग, मिरे, काळे कापड आदी वस्तू भानामतीसाठी वापरण्यात आल्या होत्या. या वस्तूंवर हळदी-कुंकू टाकण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

17:31 (IST) 11 Dec 2023
संकल्प यात्रेच्या फलकांवर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र; संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद, भिवंडी पंचायत समिती आणि काल्हेर ग्रामपंचायतीच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंचावरील फलकांवर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र छापण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

17:25 (IST) 11 Dec 2023
“एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करायला अजित पवार, जयंत पाटील… “, संजय राऊतांची पवारांवर टीका

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कांदा प्रश्नावर शरद पवार आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

सविस्तर वाचा…

17:18 (IST) 11 Dec 2023
जळगावात केळी पीकविम्यासाठी उत्पादक आक्रमक; न्यायालयात जाण्याची तयारी

जळगाव: हवामानावर आधारित फळ पीकविमा अर्थात केळी पीकविम्यातंर्गत संबंधित रक्कम मंजूर असूनही जिल्ह्यातील पात्र १० हजार ६१९ केळी उत्पादकांना विविध कारणे देत लाभापासून विमा कंपनीकडून हेतुपुरस्सरपणे वंचित ठेवले जात आहे.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 11 Dec 2023
तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्याच्या राज्य सरकारच्या आदेशावर कारवाईस उच्च न्यायालयाची मनाई

दागिने मोजताना अनेक वस्तू गहाळ झाल्याचा अहवाल समोर आल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये देवी चरणी अर्पण केलेल्या देवीचाही समावेश होता.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 11 Dec 2023
अपहृत तरुणाची ‘सुखरूप’ सुटका, दुचाकी दुरूस्तीसाठी रचला होता स्वत:च्या अपहरणाचा बनाव

वसईतील एका तरुणाने दुचाकी दुरूस्त करण्यासाठी पैसे नसल्याने चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आहे.

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 11 Dec 2023
तारापूर येथे कामगाराचा मृत्यू, प्रकरण संशयास्पद असल्याचा कुटबियांचा आरोप

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात रात्र पाळीवरील कामगार गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून. मयत कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाचा सविस्तर…

16:55 (IST) 11 Dec 2023
जयभवानी रस्ता परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिक: तालुक्यातील पिंपळगाव खांब येथे शाळकरी मुलावर हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटे नाशिकरोड भागात जय भवानी रस्ता परिसरात वन विभागाच्या जाळ्यात एक बिबट्या अडकला. अजूनही परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा…

16:49 (IST) 11 Dec 2023
सातारा : कोयना जलाशयातील तराफा सेवा तांत्रिक अडचणीमुळे बंद

तराफा सेवा अचानक बंद झाल्याने अनेक स्थानिक वाहनचालक व पर्यटकांची गैरसोय झाली आहे.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 11 Dec 2023
नातेवाईकाची तब्येत पाहण्यासाठी आलेल्या महिलेचे चार लाखांचे दोन मंगळसूत्र चोरले

पनवेल: पाच दिवसांपूर्वी कामोठे वसाहतीमधील सेक्टर १८ येथील रस्त्यावर सोनसाखळी चोराने फळे खरेदी करुन पतीच्या दुचाकीवर बसणा-या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. चोरीस गेलेल्या दोनही मंगळसूत्रांची किंमत चार लाख रुपयांची असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने नोंदविले आहे.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 11 Dec 2023
शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय… नेमके होणार काय?

पुणे : करोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत, पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याची भीती व्यक्त करत शालेय शिक्षण विभागाने शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर…

16:43 (IST) 11 Dec 2023
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून काँग्रेस खासदार धीरज साहूच्या विरोधात निषेध मोर्चा आंदोलन

नवी मुंबई: कॉंग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहूच्या धाडीत जवळपास ३०० करोडची संपत्ती आढळून आली असून ‘नेते मालामाल आणि जनता फटेहाल’ हे काँग्रेसचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धीरज साहू याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध आंदोलन केले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने माधुरी सुतार यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले आहे.

16:41 (IST) 11 Dec 2023
साप चावला? घाबरू नका… सरकार आहे पाठीशी

नारायणगाव : सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आता आर्थिक मदत देण्यात येणार आहे. केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांनी सर्पदंशावरील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत.

वाचा सविस्तर…

16:27 (IST) 11 Dec 2023
गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे; कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू, कुटुंबाकडून कारवाईची मागणी

कुटुंबाने आरोग्य विभागावर शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला असून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

सविस्तर वाचा…

16:17 (IST) 11 Dec 2023
गडचिरोली जिल्ह्यात दारु निर्मिती कारखाना होणार नाही – फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात मोहापासून दारुनिर्मिती करणारा कारखाना प्रस्तावित आहे. त्याला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी विरोध दर्शविला आहे.

सविस्तर वाचा…

16:13 (IST) 11 Dec 2023
घराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक

मुंबई: नवीन प्रकल्पातील घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊन त्याची फसवणूक करणाऱ्या विकासकाला पंतनगर पोलिसांनी अटक केली. नीरज वेद (५४) असे या विकासकाचे नाव असून तो घाटकोपरमधील रहिवासी आहे.

सविस्तर वाचा…

16:08 (IST) 11 Dec 2023
वाशीम : चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीच चोरी ; २ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास!

चव्हाण यांच्या घरातून चोरट्यांनी सोने, दागिन्यांसह २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

16:00 (IST) 11 Dec 2023
नागपूर : कोट्यवधींची संपत्ती जमविलेल्या काँग्रेस खासदार धीरज साहूंविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन

या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ६ विधानसभा मतदारसंघांत निषेध आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

15:44 (IST) 11 Dec 2023
अजित पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार, ठाकरे गटाचा मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा; म्हणाले, “३१ डिसेंबरला…”

उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लील जाणार असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने गेला आहे. ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत म्हणाले, ३१ डिसेंबरला एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाईल. त्यामुळे अजित पवार दिल्ली दौरा करुन अमित शाह यांची भेट घेणार असतील. ही शक्यता नाकारता येत नाही

15:42 (IST) 11 Dec 2023
बोईसर : नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी; ग्रामस्थ संतप्त

कोलवडे येथील नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची भेट घेत कारवाईची मागणी केली.

सविस्तर वाचा…

15:42 (IST) 11 Dec 2023
“गद्दारांचे सरकार, एका गद्दाराचे दुसऱ्या गद्दाराला पत्र”, असे का म्हणाले जितेंद्र आव्हाड?

‘कोण आहे अमोल मिटकरी. काय आहे त्यांचा संघर्ष, अशा लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे नसतात’ म्हणत आव्हाडांनी मिटकरींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

सविस्तर वाचा…

15:27 (IST) 11 Dec 2023
“शेतकरी मेले तरी चालेल, अशी मोदी सरकारची भूमिका”, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

15:08 (IST) 11 Dec 2023
बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा ताफा रोडावला

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन खात्यातील ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ११८९ बसगाड्या उरल्या असून त्या तुलनेत कंत्राटदाराकडून भाडेतत्वावर घेतलेल्या खासगी बसगाड्यांची संख्या अधिक आहे.

वाचा सविस्तर…

15:06 (IST) 11 Dec 2023
कल्याण मधील दुर्गाडी-वाडेघर रस्ता ग्रामस्थांनी केला बंद, हुल्लडबाज तरूणांमुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त

गैरप्रकार रोखण्यासाठी वाडेघर मधील संतप्त ग्रामस्थांनी दुर्गाडी ते वाडेघर वळण रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

सविस्तर वाचा…

14:39 (IST) 11 Dec 2023
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शौचालय घोटाळा प्रकरणी आणखी एकास अटक

नवी मुंबई: आशियातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आवारातील शौचालय घोटाळा समोर आल्यानंतर आता पर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेले दोघे कंत्राटदार होते तर आता स्वच्छता अधिकारी असणाऱ्या सिद्राम नागोराव कटकधोंड याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 11 Dec 2023
नैना बचाव विरुद्ध नैना हटाव असा संघर्ष पनवेलमध्ये होण्याची शक्यता

पनवेल: आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल परिसराचे भविष्याचे विकास नियोजन योग्यपद्धतीने होण्यासाठी तसेच विकास होत असताना स्थानिक शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारमध्ये पनवेलचे प्रतिनिधीत्व करणारे भारतीय जनता पक्षाचे आ. प्रशांत ठाकूर यांनी नैना प्राधिकरणामुळे भूमिपुत्रांचे होणारे फायदे याविषयी सभा घेण्याचे रविवारी जाहीर केले.

सविस्तर वाचा…

14:10 (IST) 11 Dec 2023
“लव्ह जिहादविरुद्धची समिती लोकांवर दबाव आणत आहे”, अबू आझमी यांचा आरोप; म्हणाले, “तातडीने रद्द करा…”

तत्कालीन महिला व बाल कल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादची १ लाख ९ प्रकरणे असल्याची माहिती सभागृहात दिली होती.

सविस्तर वाचा…

13:46 (IST) 11 Dec 2023
भुजबळांच्या सभेनंतर गावबंदीविरोधात ओबीसी एकवटले

पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी भटके विमुक्त समाजाची इंदापूर येथे शनिवारी (९ डिसेंबर) भव्य सभा झाली. भुजबळांनी या सभेमधून गावबंदी कायद्याला धरून नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच सर्वपक्षाच्या नेत्यांना गावबंदी आहे, तर आमदार रोहित पवार यांच्या युवा यात्रेचे स्वागत कसे होते?, असा सवालही त्यांनी सभेत केला होता.

वाचा सविस्तर…

13:46 (IST) 11 Dec 2023
पश्चिम रेल्वे विस्कळीत, लोकलला २० ते २५ मिनिटे विलंब

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत असून त्याचा प्रवाशांना फटका बसला आहे.

वाचा सविस्तर…

13:45 (IST) 11 Dec 2023
गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याचा विटा, सांगलीत निषेध

ओबीसी व्हीजीएनटी परिषदेचे प्रदेश सरचिटणीस संग्राम माने यांच्या नेतृत्वाखाली विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शने करण्यात आली.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 11 Dec 2023
सिडको महामंडळात लेखा लिपीक पदांच्या २३ जागांसाठी भरती

पनवेल: सिडको महामंडळामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रीयेला चालना मिळाली आहे. ९ डिसेंबरपासून सिडको मंडळातील २३ लेखा लिपीक पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून या भरती प्रक्रियेत ८ जानेवारीपर्यंत फक्त उमेदवार ऑनलाईनपद्धतीने अर्ज करु शकतील.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 11 Dec 2023
रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ उभारणीला वेग; जून २०२४ पासून प्रारंभाचे नियोजन

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 11 Dec 2023
प्रसूतीनंतर तीनपैकी एका महिलेला दीर्घकालीन आरोग्य समस्या! नवीन संशोधनातील निष्कर्ष

पुणे : प्रसूतीनंतर महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. आता एका नव्या संशोधनातून एक तृतीयांश महिलांना प्रसूतीनंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब उघड झाली आहे. जगभरात दरवर्षी सुमारे चार कोटी महिलांना हा त्रास सुरू होत असल्याची धक्कादायकही आकडेवारीही संशोधनातून समोर आली आहे.

वाचा सविस्तर…

13:18 (IST) 11 Dec 2023
पुणेकरांची पसंती परवडणाऱ्या घरांना! नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत ५५ टक्के वाटा

पुणे: पुण्यातील मालमत्ता क्षेत्रात मागील महिन्यात तेजीचे वारे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत सात टक्के वाढ नोंदविण्यात आली. एकूण घरांच्या विक्रीत ५० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांचा वाटा ५५ टक्के आहे.

सविस्तर वाचा…

13:17 (IST) 11 Dec 2023
“उद्धव ठाकरे यांनी लंडनमध्ये इक्बाल मिर्चीसोबत डिनर केले”, नितेश राणेंचा आरोप; आदित्य ठाकरेंवरही टीका

शरद पवार गटाला संपविण्यासाठी राजकारणातील हा ‘ओरी’ सक्षम आहे, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

सविस्तर वाचा…

13:16 (IST) 11 Dec 2023
शाळा सुरु करण्याच्या आमिषाने एक कोटी १७ लाखांची फसवणूक; न्यायालयाच्या आदेशाने प्राचार्यांसह तिघांवर गुन्हा

पुणे: शाळा सुरू करण्याच्या आमिषाने एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्राचार्यांसह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 11 Dec 2023
तापमान बदलाचा असाही परिणाम! डासांचं आयुष्य वाढून हिवतापाचा धोका वाढला

पुणे : तापमान बदलामुळे जगभरात ऋतुचक्रात अनेक बदल घडत आहेत. तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमान यातील मोठ्या चढउतारांमुळे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या ॲनाफिलस डासांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम होत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होऊन हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत.

वाचा सविस्तर…

12:57 (IST) 11 Dec 2023
नागपूर : पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या

सोनाली यांनी अजय खर्चे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना ८ वर्षांची मुलगी आहे.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 11 Dec 2023
“गुडघ्याला बाशिंग बांधून रोहित पवारांचा नेता बनण्याचा प्रयत्न”, राम शिंदे यांची संघर्ष यात्रेवरून टीका; म्हणाले…

संपूर्ण राज्यभर सुरू असलेली ही यात्रा रविवारी उपराजधानीत दाखल झाली. येथे यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 11 Dec 2023
पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण राज्यात एकत्रित निवडणूक घ्या; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊन संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीआधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला तर संपूर्ण काश्मीरमध्ये निवडणुका घेता येतील. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम आपला भाग राहील.

Uddhav Thackeray Asaduddin Owaisi

“तेलंगणात भाजपाने ओवेसी योजना अंमलात आणली, पण…”,

भाजपाच्या तेलंगणातील पराभवावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपा नेतृत्वाला टोला लगावला आहे. ठाकरे गटाने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटलं आहे की, “तेलंगणात मोदी-शहांच्या भाजपाची धूळधाण उडाली. मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे राज्यांत जे मोदी-शहा होते तेच तेलंगणात होते व ‘जमकर’ प्रचार करीत होते. योजनांच्या घोषणा व नेहमीचे तांडव करीत होते. मुसलमानांची मते काँग्रेसकडे जाऊ नयेत यासाठी ‘ओवेसी’ योजनाही अमलात आणली. तरीही काँग्रेसचा विजय झाला”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Maharashtra assembly winter session 2023 live updates day 3 at nagpur sharad pawar onion export ban aaditya thackeray asc

First published on: 11-12-2023 at 10:01 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×