scorecardresearch

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018: कसा पहाल दहावीचा निकाल?

Maharashtra MSBSHSE SSC Result 2018, MSBSHSE 10th Class Result 2018; असून राज्यातील सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

maharashtra SSC Result 2018
Maharashtra SSC 10th result 2018, MSBSHSE SSC 10th Class Result 2018: मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असून राज्यातील सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.९ जूनपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आज दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.

How to see Maharashtra SSC 10th result 2018 online निकाल कुठे बघता येणार?

परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील वेबसाईटवर उपलब्ध असतील:

http://www.mahresult.nic.in

http://www.sscresult.mkcl.org

http://www.maharashtraeducation.com

निकाल कसा बघता येईल?

बोर्डाने दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी. तिथे तुमचा क्रमांक कोणत्याही स्पेसशिवाय टाईप करा. यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावीत.

How to check Maharashtra SSC 10th result 2018 by SMS: एसएमएसद्वारे निकाल कसा बघता येणार?

दहावीचा निकाल बीएसएनएलच्या मोबाइल ग्राहकांना एसएमएसद्वारेही उपलब्ध असेल.
बीएसएनएलच्या ग्राहकांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यावा यानंतर आसनक्रमांक टाईप करावा आणि ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा.

दहावीच्या निकालाच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा

दरम्यान, गेल्या वर्षी दहावीचा निकाल १३ जूनला जाहीर करण्यात आला होता. त्यापूर्वी २०१६ मध्ये ९ जून, तर २०१५ मध्ये ८ जूनलाच निकाल जाहीर झाला होता. या पार्श्वभूमीवर, यंदा तुलनेत लवकरच निकाल जाहीर होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra board msbshse ssc 10th result 2018 how to check result online mahresult nic in

ताज्या बातम्या