Maharashtra News Updates Today, 20 May : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला असताना दुसरीकडे शिवसेनेकडून भाजपा त्यांचा वापर करत असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर ज्ञानवापी मशिदीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यात संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीची देखील चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रभरातील आणि देश-विदेशातील अशा प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसह सर्व अपडेट…

uddhav thackeray amit shah latest news
Maharashtra News : “अमित शाहांना एवढंच सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत…”, उद्धव ठाकरेंचा ‘त्या’ विधानावरून टोला!
Mumbai Maharashtra News in Marathi
Maharashtra Political News : “उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय मोदी-शाहांच्या सभेला महत्त्व उरत नाही”, अंबादास दानवेंची टीका; इतर अपडेट वाचा एका क्लिकवर…
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

23:18 (IST) 20 May 2022
शरद पवारांकडून उद्या ब्राह्मण संघटनांची बैठक, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पुण्यात ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली आहे. यात राज्यातील निर्माण होत असलेल्या जातीय तेढाच्या वातावरणाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

https://twitter.com/LoksattaLive/status/1527705854346407936

20:08 (IST) 20 May 2022
“कोट्याधीश घरातील सुशिक्षित मुलगा लादेन बनतो, तर पेपर टाकणारे…”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं पुण्यात वक्तव्य

"कोट्याधीश घरात जन्माला आलेला एखादा लादेन बनतो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन ए. पी. जे. अब्दुल कलाम बनतो," असं मत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

https://twitter.com/LoksattaLive/status/1527655040177311744

20:06 (IST) 20 May 2022
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनी तुरुंगाच्या बाहेर

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडली आहे. बुधवारी (१८ मे) सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला होता.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

https://twitter.com/LoksattaLive/status/1527644171280203776

16:43 (IST) 20 May 2022
अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर मला भीती वाटते की राज ठाकरे आता… : काँग्रेस नेते संजय निरुपम

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला. यानंतर मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर मला भीती वाटते की राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दाच सोडून देतात की काय असं म्हणत संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

https://twitter.com/LoksattaLive/status/1527608021052162055

15:55 (IST) 20 May 2022
“केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी मला आश्वासन दिलंय की अनिल परब यांचा रिसॉर्ट…”, किरीट सोमय्या यांचं दिल्लीत वक्तव्य

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सध्या देशाची राजधानी नवी दिल्लीत आपला तळ ठोकला आहे. महाविकासआघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्या पाठपुरावा करताना दिसत आहे. आता त्यांनी थेट केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत परब यांच्या रिसॉर्टवरील कारवाईबाबत चर्चा केली.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

https://twitter.com/LoksattaLive/status/1527575226502250496

15:54 (IST) 20 May 2022
भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित? किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

https://twitter.com/LoksattaLive/status/1527581555371409410

15:52 (IST) 20 May 2022
विश्लेषण : राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी... पण मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसामधील फरक काय?

मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे?, अनेकदा हे दोन शब्द वापल्या वाचनात येतात. पण त्याचा नक्की अर्थ काय? या दोघांमध्ये काय फरक असतो आणि याचसंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखामधून जाणून घ्या येथे क्लिक करुन...

15:50 (IST) 20 May 2022
वर्ध्यात जादूटोण्याच्या नावाखाली गळा आवळून खून, पोलिसांकडून तिघांना अटक

तांत्रिक विद्येचा कथित उपयोग करीत बळी घेतल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतले आहे. अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुनाईद, अब्दुल जमीर अब्दुल रहीम अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

https://twitter.com/LoksattaLive/status/1527593720459444225

13:59 (IST) 20 May 2022
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे BJP चे बृजभूषण सिंह दौरा स्थगित झाल्यावर म्हणाले, "आम्ही..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. ते नेमकं काय म्हमाले आहेत जाणून घ्या येथे क्लिक करुन...

13:58 (IST) 20 May 2022
अयोध्या दौरा स्थगितीवर मनसेकडून स्पष्टीकरण!

दौरा स्थगित केल्यानंतर सुरू झालेल्या तर्क-वितर्कांना मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल असा आहे. जो नेता महाराष्ट्रहितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? मीडिया आणि विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!” अशी फेसबुक पोस्ट किर्तीकुमार शिंदे यांनी केली आहे.

https://twitter.com/LoksattaLive/status/1527537806092173312

13:17 (IST) 20 May 2022
८९ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकेत असणारे आझम खान २७ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर; समर्थकांनी स्वागतासाठी केली मोठी गर्दी

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान हे आज म्हणजेच २० मे २०२२ रोजी तुरुंगाबाहेर आले. ते मागील दोन वर्षांपासून उत्तर प्रदेशमधील सीतापूर तुरुंगामध्ये होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवपाल यादव आणि मुलगा अब्दुल्ला खान सीतापूर तुरुंगाबाहेर पोहोचले होते.

येथे वाचा सविस्तर वृत्त

13:16 (IST) 20 May 2022
डोंबिवली : सतत मोबाईल बघते म्हणून भावाने मोबाईल काढून घेतल्याने १८ वर्षीय तरूणीचा आत्महत्या

धाकटी बहिण सारखी मोबाईल बघत असते. घरात तिचे लक्ष नसते. या रागातून मोठ्या भावाने बहिणीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यामधील सीमकार्ड काढून टाकले. भावाच्या कृत्याचा राग येऊन १८ वर्षाच्या धाकट्याने बहिणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला असल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका भागात घडली.

येथे वाचा सविस्तर वृत्त

10:50 (IST) 20 May 2022
अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक टोला!

“आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते. त्यांनी ते रद्द केले. पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवं असतं, तर ते आम्ही नक्कीच दिलं असतं. अयोध्या, उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे. अयोध्येच्या जनतेने, साधूसंतांनी, तिथल्या राजकारण्यांनी”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

https://twitter.com/LoksattaLive/status/1527517170670137344

10:50 (IST) 20 May 2022
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिलीय.

https://twitter.com/LoksattaLive/status/1527513822600302601

Maharashtra News Live Today

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घडामोडी एका क्लिकवर!

 

महाराष्ट्रात सातत्याने घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि त्यातून बदलणारी राजकीय समीकरणं यांचे सर्व अपडेट्स!