Mumbai Maharashtra Live News Updates, 16 September 2024 : “महाराष्ट्राच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. साधारणः दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आचारसंहिता दसऱ्यानंतर लागू होईल”, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष व जनतेलाही अशीच अपेक्षा होती. त्यामुळे पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी चालू केली आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभर फिरत आहेत, दौऱे, मेळावे, प्रचारसभा, बैठका चालू आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत घडणाऱ्या घडामोडींचा व देशभरात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Today, 16 September 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या निवडणुका कधी होतील हे मुख्यमंत्री निश्चित करणार नाहीत ते निवडणूक आयोग ठरवेल. मात्र, निवडणूक आयोगाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी इशारा दिल्यावरच निवडणूका होतील. सरन्यायाधीश आमदार अपात्रता प्रकरणावर केवळ तारखा देतायत, तिकडे निवडणूक आयोगही तारखा देतोय. या देशात नेमकं चाललंय काय?
नागपूर: एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे यांना ‘इंटरनॅशनल अलम ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.हा पुरस्कार नुकत्याच झालेल्या समारोह दरम्यान प्रदान करण्यात आला. राजू केंद्रे यांना हा पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीसाठी आणि एकलव्य इंडिया फाउंडेशनद्वारे केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रदान करण्यात आला.
कल्याण – दाट धुक्याची चादर तयार झाल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कसारा, खोपोली, कर्जत ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकल सोमवारी सकाळी अर्धा तास उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे.
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारांची मालिका सुरूच असून, आता मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यासह १६ कर्मचाऱ्यांनी ४ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी केली होती.
धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “धनगरांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. याबाबतचा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना त्या बैठकीला बोलवायला हवं होतं. या निर्णयामुळे आगामी काळात लोकांमध्ये संशयाचं कल्लोळ निर्माण होऊ शकतं”.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरसह राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची रविवारी मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठक पार पडली. यावेळी शिंदे म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील. धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल.
लाडक्या बहिणीचा ‘देवा भाऊ’ कार्यक्रमात साड्या घेताना गोंधळ
नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे आयोजित ‘लाडक्या बहिणीचा देवा भाऊ’ कार्यक्रमात साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दाखल झालेल्या महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. साड्यांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने आलेल्या महिलांमुळे आयोजकांचीही पंचाईत झाली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे, भाजपाचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेल्या तामसा येथील कार्यक्रमाची जिल्ह्यात सर्वदूर चर्चा गोंधळाचीच झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.