Mumbai Maharashtra Live News Updates, 16 September 2024 : “महाराष्ट्राच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. साधारणः दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आचारसंहिता दसऱ्यानंतर लागू होईल”, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष व जनतेलाही अशीच अपेक्षा होती. त्यामुळे पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी चालू केली आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभर फिरत आहेत, दौऱे, मेळावे, प्रचारसभा, बैठका चालू आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत घडणाऱ्या घडामोडींचा व देशभरात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra News Live Today, 16 September 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या
नाशिक : जुन्या नाशिकमधील वाकडी बारव ते पंचवटीतील रामकुंड या मिरवणूक मार्गावर सुमारे २०० सीसी टीव्ही कॅमेरे आणि सहा ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे
पुणे : शहरात गणेशोत्सावाची धामधूम सुरू असताना गंगाधाम परिसरात मिसरूड फुटलेल्या तीन मुलांनी थेट दुकानात जाऊन एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) यांच्या खूनप्रकरणातील तब्बल २१ आरोपींवर पुणे पोलिसांनी मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी स्वीकृत संचालक म्हणून प्रवीण भीमराव लबडे यांची निवडीचा ठराव मांडण्यात आला आणि तो सर्वानुमते मंजूर केला आहे.
या निवडीबद्दल कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते त्यांचा आज सन्मान करण्यात आला.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाषराव शिंदे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुभाषराव काळाणे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक आणि बेलवंडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांच्याकडून सध्या सुरू असलेले सण उत्सव या पार्श्वभूमीवर ५६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १२६ नुसार तालुक्यातील 56 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये ज्या व्यक्तींवर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे यांचा समावेश आहे. आगामी असलेल्या सण आणि उत्सव या काळामध्ये तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे असे श्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
नागपूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला व बालविकास मंत्रालयाचा अंदाज आहे की राज्यातील अडीच कोटी महिलापर्यंत ही योजना विस्तारली जाईल, असा दावा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वर्तवला.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालया मागील प्रसाद सोसायटी प्रभागात दत्त मंदिर गल्लीत, ह प्रभागापासून हाकेच्या अंतरावर एका बेकायदा इमारतीची अरूंद जागेत भूमाफियांनी उभारणी सुरू केली आहे. सविस्तर वाचा…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. दोन महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या आवारातून चंदनाची पाच झाडे कापून नेण्याची घटना घडली होती. शहरात चंदनांची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यंना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. सविस्तर वाचा…
मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवांबरोबर घरगुती गणपतींचे शांततेत विसर्जन व्हावे यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शहरांमधील २३ विसर्जन मिरवणूक मार्गांवर १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियोजन पालिका आणि पोलिसांकडून करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील जिन्याचा मार्ग बंद करून उभारण्यात आलेल्या तीन बेकायदा गाळ्यांना ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. या गाळे मालकांना त्यांच्या जमीन मालकी, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आली आहेत. सविस्तर वाचा…
पिंपरी : शहर आणि परिसरातील उद्या (मंगळवारी १७ सप्टेंबर) होणार्या गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
नागपुर: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड़ यांनी कांग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार संतप्त प्रतिक्रिया दिली असून ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे’ अशी टीका त्यांनी केली आहे.
राज्यात मराठा, ओबीसी, धनगर व मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षणाबाबत मोठं वक्तव्यकेलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी आचारसंहिता जाहीर होण्याआधीच धनगर आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी केली जाईल, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. लवकरच धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे : आर्थिक वादातून उरुळी कांचन परिसरात गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उद्योजकाकडून एक बंदुक, बंदुकीची १७५ काडतुसे, तसेच पिस्तुलाची ४० काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
सविस्तर वाचा…
अमरावती जिल्ह्यात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून खाटा नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जामली या गावात दिसून आले आहे. यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघड झाला आहे.
बुलढाणा : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
नागपूर : तुकडोजी चौक ते मानेवाडा चौकादरम्यान असलेल्या कॅरिस्मा शाळेचे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेची वाट धरतात. वर्दळीच्या मानेवाडा सिमेंट रोडवरील भरधाव वाहनांमुळे येथे विद्यार्थ्यांवर अपघाताची टांगती तलवार असते.
अमरावती : वरूड तालुक्यातील राजुरा येथील मिरची बाजारात लगबग वाढली आहे. विदर्भात रात्रीतून चालणारी ही एकमेव बाजारपेठ असून सायंकाळी ७ वाजेपासून सुरू होणारा बाजार मध्यरात्रीनंतरही सुरू असतो. एका रात्रीत या बाजारपेठेत हिरव्या मिरचीची कोट्यवधींची उलाढाल होते.येथील हिरव्या मिरचीला परदेशातूनही मागणी असल्याने या बाजाराची ख्याती वाढली आहे.
नागपूर: एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय झाला. परंतु, वेतन निश्चितीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन जास्त गेल्यास ते परत करावे लागेल, असे वचन पत्र प्रशासन लिहून आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचे कार्य वृत्त प्रसारित करताना केवळ सरकारशी संबंधित काही नेत्यांची नावे टाकण्याच्या अट्टाहासामुळे हा घोळ झाला.
नागपूर : मिठाई, जाम, जेली, कँडी यांमध्ये जाडसरपणा आणणे, सॉफ्ट आणि हार्ड कॅप्सुलचे कव्हर, फेस मास्क, सौंदर्य प्रसाधन निर्मिती, फोटो फिल्म, पेंट, डिंक निर्मिती, सर्जरी स्पंज, रक्तस्राव रोखणे, दूध किंवा दही घट्ट करणे, डेअरी उत्पादनात स्थिरता आणणे, मांस रोल्स, हॅम आणि सॉसेज, जैविक पॅकेजिंग, पेय उद्योगामध्ये जिलेटीनचा वापर होतो.
सविस्तर वाचा
वर्धा : एलपीजी कंपनीद्वारे आता ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल, तेव्हा ओटीपी सांगावा लागेल. तेव्हाच गॅस सिलेंडर मिळेल व डिलिव्हरी यशस्वी होईल. तुम्ही ज्या मोबाईलवरून सिलेंडर बुक केले आहे, तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ उडू शकते.
जुन्या भांडणाच्या रागातून शहाड जवळील मोहने रस्ता येथे आयडिया कंपनी परिसरात राहत असलेल्या एका कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी या भागातील एका २८ वर्षाच्या तरूणाने दिली आहे. या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी मेघनाथ कोट या तरूणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा…
कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील सिमेंट काँक्रिट रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी चार यांत्रिकी वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया निविदा पध्दतीने पूर्ण केली आहे. लवकरच ही वाहने पालिकेत दाखल होणार आहेत. सविस्तर वाचा…
महायुतीतील घटक पक्षासाठी जागा सोडण्याच्या सूत्रामुळे भाजपला पक्षाच्या बालेकिल्ल्यात म्हणजे विदर्भात २०१९ च्या तुलनेत ९ हून अधिक जागावर कमी लढवाव्या लागणार आहे. २०१९ मध्ये भाजपने ५० जागी उमेदवार उभे केले होते. ही संख्या आता कमी होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
पुणे : सायबर चोरट्यांकडून तिघांची तब्बल ६८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शिळफाटा रस्त्यावरील शिळ गावातील एका जागरूक नागरिकाच्या सतकर्तमुळे आणि मानपाडा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे शनिवारी सकाळी साडे सात वाजता गोळवली गावा जवळ जनावारांच्या मांसाची बेकायदा तस्करी करणारी दोन वाहने पोलिसांनी जप्त केली.
दहा दिवसांपासून मनोभावे सेवा करणाऱ्या गणेशभक्तांना आता वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचे वेध लागले आहेत. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या सुरेल सुरावटी, शंखनिनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून मानाच्या गणपती मंडळांची पथके निश्चित झाली आहेत. सविस्तर वाचा…
नागपूर : सध्या राज्यभरात कॉन्व्हेंट शिक्षण पद्धतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॉन्व्हेंट संस्कृती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहर आणि तालुक्यांच्या ठिकाणांसह मोठ्या गावांतही इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू झाल्या आहेत, कुठे होत आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे ज्या मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले त्या पैठण मतदारसंघात आता ठाकरे गटाने पुन्हा नव्या गडी आपल्या बाजूने ओढला आहे. पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे सचिन घायाळ यांना उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी प्रवेश देण्यात आला. सविस्तर वाचा
पुणे : बाल न्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आलेल्या मुलीला अश्लील चाळे करण्यासाठी बळजबरी करणाऱ्या अधिपरिचारिकेविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला, ती समलिंगी असल्याचे ठसवून धमकावण्यात आले. सविस्तर वाचा…
लाडक्या बहिणीचा ‘देवा भाऊ’ कार्यक्रमात साड्या घेताना गोंधळ
नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे आयोजित ‘लाडक्या बहिणीचा देवा भाऊ’ कार्यक्रमात साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दाखल झालेल्या महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. साड्यांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने आलेल्या महिलांमुळे आयोजकांचीही पंचाईत झाली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे, भाजपाचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेल्या तामसा येथील कार्यक्रमाची जिल्ह्यात सर्वदूर चर्चा गोंधळाचीच झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.