Maharashtra Politics Live News Updates, 13 May 2026 : पुण्यात बारामती येथे पुन्हा एकदा आज एक विमान कोसळले. या विमानात शिकाऊ वैमानिक होता. वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघाताची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रावादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून वाद सुरू झाला आहे. या वादावर सुनेत्रा पवार यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला असला तरीही पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील वादाची ही परिणती आता समोर आली आहे. राज्यातील वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत. यासदंर्भात वातावरणाचे अपडे्टसही जाणून घेऊयात.

Live Updates

Today’s Latest Marathi News Live , 13 May 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

19:02 (IST) 13 May 2026

चेंबूर मेट्रो स्थानक आणि मोनोरेल मार्गिकेची उद्यापासून सीएमआरएस चाचणी

याचसोबत गेल्या काही काळापासून बंद असलेली मोनोरेल सेवाही पुन्हा सुरू होणार असून, मेट्रो आणि मोनोरेलला पादचारी पुलाने जोडल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. ...वाचा सविस्तर
18:49 (IST) 13 May 2026

शिंदेसेनेच्या नेत्यांनी रद्द केले विदेश दौरे, ताफाही केला कमी; उदय सांमत यांची माहिती

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून अनेक मंत्र्यांनी परदेश दौरे रद्द केले आहेत. शंभूराज देसाई, आशिष शेलार असतील यांनी परदेश दौरे रद्द केले आहेत. सरकार म्हणून आमची जी जबादारी आहे, ती आम्ही पार पाडू," असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

18:42 (IST) 13 May 2026

एसटीच्या भाडे तत्वावरील १,३१० बस प्रकरणी चौकशी नाहीच; शासनाचे तात्काळ माहितीचे निर्देश

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देऊनही कार्यवाही न झाल्याने आता गृह विभागाने कडक पावले उचलली आहेत. ...अधिक वाचा
18:36 (IST) 13 May 2026

सौर ग्राहकांसाठी मोठी बातमी… ९९ टक्के ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही, नेमका कोणाला लागू होतो?

राज्यातील ९९ टक्के सौर ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्जमधून दिलासा मिळाला असून, केवळ १० किलोवॅटपेक्षा जास्त वीजभार असलेल्या मोठ्या ग्राहकांनाच हा अधिभार लागू होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. ...सविस्तर बातमी
18:30 (IST) 13 May 2026

ठाणे शहरात पेट्रोल पंप सुरळीत

ठाणे शहरात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नये, असे आवाहन पेट्रोल पंप मालकांनी केले आहे. ...सविस्तर बातमी
18:26 (IST) 13 May 2026

भाईंदर ते विरार मेट्रो १३ मार्गिकेचा सुधारित आराखडा, वसई ते नालासोपारादरम्यान मेट्रो मार्ग भूमिगत

या नव्या आराखड्यानुसार, भाईंदर ते विरार दरम्यानच्या २४.९०० किमी मार्गिकेत वसई ते नालासोपारा दरम्यानचा ३.२५ किमीचा टप्पा आता भूमिगत असणार आहे. ...सविस्तर बातमी
18:24 (IST) 13 May 2026

राज्यातील यंत्रमागधारकांच्या वीज सवलत नोंदणीस आणखी एकदा मुदतवाढ; शेवटची संधी...

दरवर्षी १२०० कोटींचा भार सोसणाऱ्या या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ देण्यात आली असून, ही नोंदणी करण्याची ही शेवटची संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
18:20 (IST) 13 May 2026

धारावी पुनर्विकास प्रकल्प; प्रलंबित आणि अनिर्णित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी उद्यापासून शिबिरे, डीआरपीकडून १४ ते २६ मेदरम्यान शिबिरांचे आयोजन

ही समस्या सोडवण्यासाठी १४ ते २६ मे या कालावधीत धारावीतील पाचही सेक्टरमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
18:15 (IST) 13 May 2026

India's Nuclear Push : महत्त्वाकांक्षा मोठी, पण अणुऊर्जा प्रकल्प अंमलबजावणीतील कासवगतीने प्रगतीला ब्रेक!

भारताने २०४७ पर्यंत १०० गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचे ध्येय ठेवले असले तरी, प्रकल्प अंमलबजावणीतील कासवगती आणि पुरवठा साखळीतील अडथळे प्रगतीला ब्रेक लावत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ...सविस्तर बातमी
18:13 (IST) 13 May 2026

Video: रस्त्याने चालता-चालता पाच फूट खोलीच्या पाईपमध्ये महिलेचा पाय अडकला अन् दोन तास…

स्मिता भागवत कासारे (वय ६५) यांची अग्निशामक दलाने सुखरुप सुटका केली. कासारे या काळेवाडीतील रस्त्याने चालत जात होत्या. पाचपीर चौकातून जाताना पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हच्या पाच फूट खोलीच्या पाईपमध्ये त्यांचा पाय अडकला. ...सविस्तर वाचा
18:12 (IST) 13 May 2026

आता राज्यातील मंत्री, अधिकारीही करणार मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर; इंधनाची बचत अन् काटकसर

इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. ...अधिक वाचा
18:02 (IST) 13 May 2026

खळबळजनक! एकाच दोरीने गळफास घेऊन दोघांची आत्महत्या; पोलीस तपासात आले धक्कादायक कारण पुढे…

किशोर बळीराम सोनटक्के (वय ४० रा. कानडी ता. मुर्तिजापुर जि. अकोला), किशोर मारोती बोडखे (वय ६० रा. वरुड ता. मंगरुपीर जि. वाशीम) अशी मृतकांची नावे आहेत. ...सविस्तर वाचा
17:52 (IST) 13 May 2026

राज्यात मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात कपात; मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध

परदेशी चलन वाचवण्यासाठी सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा असे आवाहन मोदी यांनी केले आहे. ...सविस्तर बातमी
17:51 (IST) 13 May 2026
नीट (NEET) पेपर फुटीच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

बुधवारी पुण्यातील गुडलक चौक येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'नीट' (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपावरून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करून आपला निषेध व्यक्त केला. (छायाचित्र : अरुल होरायझन)

17:21 (IST) 13 May 2026

ठाणे महापालिकेतील डाॅक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या

एका तरुण आणि सेवाभावी डॉक्टरने अशा प्रकारे मृत्यूला कवटाळल्यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनासह मुंब्रा परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे. ...सविस्तर बातमी
17:15 (IST) 13 May 2026

ठाण्यातील विहिरी पुनर्जीवित, ठाणेकरांना मिळाले शुद्ध पाणी...

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विहीर पुनरुज्जीवन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले असून नैसर्गिक जलस्रोतांचे जतन करणारा हा उपक्रम राज्यासाठी एक नवा आदर्श ठरणार आहे. ...अधिक वाचा
17:08 (IST) 13 May 2026

आरबीआयकडून सरकारी तिजोरीला यंदा पुन्हा बंपर योगदान; विक्रमी लाभांशाचे संकेत

RBI Dividend : सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि परकीय चलन साठ्यावरील गुंतवणुकीतून मिळालेल्या नफ्यामुळे रिझर्व्ह बँक यंदा केंद्र सरकारला आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी लाभांश देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...अधिक वाचा
17:05 (IST) 13 May 2026

Gold Silver Import Tax Hike: आयात शुल्क वाढीनंतर सुवर्ण व्यवसायाला हादरे… सोने, चांदी लवकरच नवीन उच्चांक गाठणार?

दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाल्याने सुवर्ण व्यवसायावरही या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...सविस्तर बातमी
17:02 (IST) 13 May 2026

राज ठाकरे ठाणे न्यायालयात... रेल्वे भरतीत बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण...

रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या बिहारी तरुणांना २००८ मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे बुधवारी ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर झाले आहेत. ...सविस्तर वाचा
16:58 (IST) 13 May 2026

मुंबई पुणे जुन्या महामार्गावर मिनी बस उलटली…

मुरबाडहून जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेली मिनी बस मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर उलटल्याने १७ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ८ भाविकांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ...सविस्तर बातमी
16:50 (IST) 13 May 2026

मुंबई गोवा महामार्गावरील धामणीजवळ लक्झरी बस-रिक्षा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी, २३ प्रवासी बचावले

रात्रीच्या वेळी संगमेश्वर परिसरात बस दरडीवर आदळून झालेल्या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून जखमींवर सध्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. ...सविस्तर बातमी
16:49 (IST) 13 May 2026

चुकून दुसऱ्याच्या खात्यावर पैसे गेले, व्हिडिओ कॉलद्वारे मोबाईल हॅक अन् ओटीपी…

पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ...सविस्तर वाचा
16:43 (IST) 13 May 2026

पिंपरी-चिंचवड क्राइम! १२ रुपयांचे थकीत गॅस बील अन् दीड लाखांची फसवणूक, वाचा नेमका काय आहे प्रकार?

१२ रुपयांचे बिल, बनावट गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड हॅकिंगमुळे पुणे परिसरात लाखो रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. ...अधिक वाचा
16:35 (IST) 13 May 2026

आईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खून; काळेपडळ पोलिसांकडून सहा जण गजाआड

प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाब आणि धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. ...वाचा सविस्तर
16:32 (IST) 13 May 2026

तीव्र पाणीटंचाईची टांगती तलवार; बारवी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने घट, धरण अवघ्या ३५ टक्क्यांवर…

वाढती उष्णता, बाष्पीभवन आणि वाढलेला वापर यामुळे बारवी धरणातील जलसाठा झपाट्याने घटत असून पाणीटंचाईची भीती वाढली आहे. ...अधिक वाचा
16:30 (IST) 13 May 2026

Video: वाहनाला कट मारला; बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला गोळी…

गोंदिया तिरोडा महामार्गावर वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांत एवढा चिघळला की, एका बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल बाहेर काढून गोळीबार केला. ...वाचा सविस्तर
16:27 (IST) 13 May 2026

नागपूर विमानतळ आता 'वर्ल्ड क्लास' होणार! केंद्राची मोठी मंजुरी; ३ कोटी प्रवाशांच्या क्षमतेचा भव्य प्लॅन काय?

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नागपूर विमानतळाच्या उन्नतीकरणासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरील दीर्घकालीन परवानगी प्रस्तावाला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...सविस्तर वाचा
16:18 (IST) 13 May 2026

मुंबईतील ३५० हून अधिक शाळांचे शिक्षकांच्या पीएफ कडे दुर्लक्ष; २० हजार कर्मचारी लाभापासून वंचित, १ जूनपासून आंदोलनाचा इशारा

यामुळे जवळपास १५ ते २० हजार कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, या अन्यायाविरोधात १ जूनपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने दिला आहे. ...वाचा सविस्तर
16:03 (IST) 13 May 2026

कांजूरमार्ग ते बदलापूर सुधारित आराखड्यासाठी लवकरच सल्लागाराची निवड ; तीन कंपन्या उत्सुक

कांजूरमार्ग ते बदलापूर या ३९ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, यामध्ये टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्ससह तीन बड्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. ...सविस्तर बातमी
15:53 (IST) 13 May 2026

रणरणत्या उन्हात तैनात पोलिसांना आता ‘कुलिंग जॅकेट’चा दिलासा; ‘हिट स्ट्रोक’चा धोका टाळण्यासाठी…

विदर्भातील रणरणत्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक त्रस्त झाले असताना रस्त्यावर दिवसभर भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना दिलासा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकले आहे. ...सविस्तर वाचा

NEET ची परिक्षा कधी? पेपर कसा फुटला? NTA ची महत्वाची पत्रकार परिषद LIVE

Today’s Latest Marathi News Live , 13 May 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा