Maharashtra Politics Updates : अहिल्यानगर यथील दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगर येथे गेले चार दिवस माती आणि गादी विभागताल वेगवेगळ्या गटातल्या कुस्तीचा थरार रंगला होता. या थरारात मॅट विभागातील अंतिम फेरी पृथ्वीराज मोहोळ याने जिंकून तो यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. मात्र, उपांत्य फेरीत शिवराज राक्षेचं पंचांबरोबर भांडण झाल्याने त्याला निलंबित करण्यात आलं. यावरून राज्यात बरीच चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शनिवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरून राज्यातील विरोधी पक्षांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे.

Live Updates

Marathi News Live Update Today :  महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा

19:58 (IST) 3 Feb 2025

राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधी एक पोस्ट केली असून ज्यामध्ये त्यांनी “ही कुस्ती फिक्स होती”, असा खळबळजनक दावा केला आहे. याबरोबरच त्यांनी “एवढं ‘मोहोळ” का उठले? कारण… राजकारण”, असंही म्हटलं आहे.

वाचा सविस्तर...

18:42 (IST) 3 Feb 2025

नाशिक : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वादात गोळीबार, वाढत्या गुन्हेगारीने रहिवासी त्रस्त

पोलिसांवरील हल्ले, तडीपार गुंडाकडून खंडणीसाठी गोळीबाराची धमकी, वाहन जाळपोळ, किरकोळ वादातून चाकू किंवा कोयते बाहेर काढणे, वाहन चोरी, भाविकांची लूट यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत.

सविस्तर वाचा...

18:28 (IST) 3 Feb 2025

कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”

कल्याण पूर्व चक्कीनाका भागात गेल्या वर्षी बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या विशाल गवळी यानी केली होती.

सविस्तर वाचा...

18:28 (IST) 3 Feb 2025

घोडबंदर मार्गावर मद्यपी वाहन चालकाची तीन ते चार वाहनांना धडक, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाहनाने एका महागड्या मोटारीसह तीन ते चार रिक्षांना धडक दिली. घटनेची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 3 Feb 2025

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात न्यायालयाचे जिल्हाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्स

मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ अनधिकृत बांधकामे मत्स्य व्यवसाय विभागाने जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली.

सविस्तर वाचा...

17:49 (IST) 3 Feb 2025
महाराष्ट्राच्या निवडणुकीत ७६ लाख मते कशी वाढली? हायकोर्टाने मागवलं स्पष्टीकरण; राऊत म्हणाले आम्ही स्वागत करतो

"उच्च न्यायालयाने EVM बाबत अतिशय कठोर शब्दात काही प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ७६ लाख मते कशी वाढली? याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे... हा एक मोठा घोटाळा आहे. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारच्या विजयाचे हे सर्वात मोठे कारण आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, जर उच्च न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो" - संजय राऊत

https://platform.twitter.com/widgets.js


17:34 (IST) 3 Feb 2025

बुलढाणा : दिराने विधवा वहिनीचे लग्न जुळविले…पित्याच्या भूमिकेत कन्यादानही केले…

वसंत निकम यांचे लहाने बंधू विजय यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे कमी वयात त्यांच्या वहिनी संजना यांच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला.

सविस्तर वाचा...

17:23 (IST) 3 Feb 2025

राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…

राज्यभरात खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम राबविण्यात आली असून एकूण १९ हजार ३८८ शुश्रूषागृहांची तपासणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली.

सविस्तर वाचा...

16:59 (IST) 3 Feb 2025

गोध्रा हत्याकांडातील आरोपीकडून लुटमारीचे गुन्हे, पुणे, नाशिक जिल्ह्यात १६ गुन्हे; १४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त

या टोळीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात १६ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 3 Feb 2025

भंडारा : स्कूल व्हॅन चालकाचे चिमुकलीसोबत गैरकृत्य, पालकांची पोलिसांकडे तक्रार

पोलिसांनी व्हॅन चालकाविरोधत पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. व्हॅन चालक फरार आहे.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 3 Feb 2025
"लाडकी बहीणसारख्या योजनेमुळे सरकारवर एक हजार कोटींचा भार"; शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे ६० हजार कोटींचा भार आला आहे. पण काम बंद होणार नाही. प्रत्येक बिलाचं वाटप होणार आहे- संजय शिरसाट, मंत्री, शिवसेना (एकनाथ शिंदे)

16:15 (IST) 3 Feb 2025

नाशिक : सिडकोत पाण्यासाठी आंदोलन, महापालिकेचा निषेध

अनेक दिवसांपासून सिडकोतील रायगड चौक परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अशी परिस्थिती सिडकोत ठिकठिकाणी आहे.

सविस्तर वाचा...

16:14 (IST) 3 Feb 2025

“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका

नागपूर : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपींची पाठराखण कोणीही करू नये. गुन्हेगाराला जात, धर्म, पंथ नसतो त्यामुळे साधू, संत महंतांनी देखील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली तर त्यांचे श्रेष्ठत्व दिसले असते अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

वाचा सविस्तर...

16:13 (IST) 3 Feb 2025

पोलीस निरीक्षकाला दिला कर्मचाऱ्याने चोप

नागपूर : पोलीस विभागात शिस्तीला खूप महत्व आहे. वरिष्ठांच्या आदेश पाळणे किंवा वरिष्ठांना मान-सन्मान कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असते. मात्र, वाडी पोलीस ठाण्यातील एका बीट मार्शलने एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला रात्रीच्या सुमारास भररस्त्यात चांगला चोप दिला.

वाचा सविस्तर...

14:08 (IST) 3 Feb 2025

Samriddhi Highway : समृध्दी महामार्गावरील टोल नाके बंद, काय आहे कारण? प्रवाशांना भुर्दंड का?

Samriddhi Highway Toll Booths Closure : मुंबई समृध्दी महामार्गावरील चार टोल नाक्यांवरील सुमारे दोनशे कर्मचारी संपावर गेल्याने नाक्यावरील फास्टटॅग स्कॅनिंग थांबले आहे. त्याचा फटका या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना बसतो आहे.त्यांना अधिकचा टोल द्यावा लागतो आहे.

वाचा सविस्तर...

14:07 (IST) 3 Feb 2025

खेकडा कढी, बटेर हंडी… शासनाच्या प्रदर्शनात चक्क मांसाहाराचा ‘सरस’ तडका…

यवतमाळ : जिल्ह्यातील असंख्य महिला बचत गट पारंपरिक शेवया, पापड, कुरडई या व्यवसायात रमल्या असताना, काही स्वयंसहायता बचत गटांनी ग्राहकांच्या जीभेचे लाड पुरविण्यासाठी वेगळी वाट चोखाळली आहे.

वाचा सविस्तर...

14:06 (IST) 3 Feb 2025

होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ

पुणे : अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली. त्या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला.

वाचा सविस्तर...

12:58 (IST) 3 Feb 2025

डोंबिवलीतील रुणवाल गार्डन ते वाशी, डोंबिवली रेल्वे स्थानक बस फेऱ्या सुरू

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील रुग्णवाल गार्ड माय सिटी ते डोंबिवली रेल्वे स्थानक आणि रुणवाल गार्डन ते वाशी नवी मुंबई अशा बस फेऱ्या कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्या आहेत.

वाचा सविस्तर...

12:57 (IST) 3 Feb 2025

अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…

नागपूर : परीक्षेची भीती, अभ्यासाचा तणाव, घरातील ताणतणावाचे वातावरण, आई-वडिलांचे रागावणे, मोबाईलचे व्यसन, मैत्री आणि प्रेमसंबंध या मुख्य कारणावरुन गेल्या चार वर्षांत नागपुरात १११ अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

वाचा सविस्तर...

12:56 (IST) 3 Feb 2025

‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…

बुलढाणा: जानेवारी अखेरीस बुलढाणा शहरात दुर्मिळ वैद्यकीय घटनेची नोंद झाली. ‘आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ’, असलेल्या ‘त्या’ महिलेची ‘प्रसुती’ झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघे मायलेक सुखरूप आहे. लवकरच या नवजात बाळाच्या पोटातील अर्भक काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर...

12:56 (IST) 3 Feb 2025

महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा, बांगलादेशी, रोहिंग्याना परत पाठवू – नितेश राणे

चंद्रपूर : आम्ही धर्मांतर खपवून घेणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू, बांगलादेशी व रोहिंग्याचा शोध घेऊन त्यांना परत पाठवू, हिरवा रंग धारण करणाऱ्यां सापानी वळवळ थांबवावी, गो हत्या बंद करा, अन्यथा आम्हाला प्रत्येक वॉर्डातील वराह जयंती साजरी करावी लागेल.

वाचा सविस्तर...

12:54 (IST) 3 Feb 2025

टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम

कल्याण : बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा-मांडा परिसरातील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील नवनियुक्त साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पदभार स्वीकारताच जोरदार मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी टिटवाळा गणेशवाडी परिसरातील पंधराहून अधिक चाळी बांधण्यासाठीचे जोते तोडकाम पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले.

वाचा सविस्तर...

12:54 (IST) 3 Feb 2025

डोंबिवली पूर्वेत ब्राह्मण सभेमागील रस्त्यावरील भिंतीमुळे वाहतुकीला अडथळा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पालिका शाळेच्या प्रवेशव्दारावर महावितरणचे अनेक वर्षापासून रोहीत्र होते. महावितरणने हे रोहीत्र काढून नेले. पण रोहित्राच्या सभोवती असलेली संरक्षित भिंत आहे त्या स्थितीत ठेवली. ही भिंत आता वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे.

वाचा सविस्तर...

12:53 (IST) 3 Feb 2025

मुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद

जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

12:53 (IST) 3 Feb 2025

सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २५ डिसेंबरपासून एमबीए/एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली होती.

सविस्तर वाचा...

12:52 (IST) 3 Feb 2025

म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थींची हजारो कागदपत्रे वाळवी, उंदरांनी केली फस्त

उंदरांचाही सुळसुळाट झाला असून महत्वाच्या कागदपत्रांनी उंदराचे पोट भरले आहे. त्यात हजारो संक्रमण शिबिरार्थींची मूळ कागदपत्रे नष्ट झाली आहेत.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 3 Feb 2025

Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?

पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यानी पंचांशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील घातली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. यावरून शिवराज राक्षे याने प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा सविस्तर वृत्त

11:04 (IST) 3 Feb 2025

वैद्यकीय अधिकारी २४ वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत, अनेकजण पदोन्नतीशिवायच निवृत्त

आरोग्य विभागात ‘गट ब’ मधील पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास ७५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारने मागील अनेक वर्षांपासून पदोन्नती दिलेली नाही.

सविस्तर वाचा...

11:04 (IST) 3 Feb 2025

पुणे : ज्येष्ठ नागरिक चोरट्यांचे ‘लक्ष्य’, मोफत साडी, धान्य वाटपाचे आमिष

भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा सोसायटी रस्त्यावर ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन त्यांच्याकडील ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा...

10:45 (IST) 3 Feb 2025

"देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब 'वर्षा'वर राहायला का घाबरत आहेत?" संजय राऊतांचा थेट प्रश्न

काळी जादू ही अंधश्रद्धा आहे. यावर जर कोणी बोलत असेल, तर त्यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने कारवाई केली पाहिजे. माझा प्रश्न इतकाच आहे की देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? याचं उत्तर एकनाथ शिंदे किंवा रामदास कदमांनी द्यावं किंवा भाजपाच्या प्रवक्त्यांनी द्यावं. वर्षावर जायला त्यांचं कुटुंब का घाबरत आहेत? त्यांनी जायला हवं. मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला आहे तो. तुम्ही तिथे रात्री झोपायला घाबरता. तिथे काय घडलंय? हा चिंतेचा प्रश्न आहे. लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात. पण मी हे प्रथमच पाहतोय की त्यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर. आमच्या अमृता वहिनींना जावंसं वाटत नाही. अनामिक भीतीमुळे त्यांना जावंस वाटत नाही. असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नव्याने उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे - संजय राऊत</p>

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह

Marathi News Live Update Today :  महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा

Story img Loader