Maharashtra Mumbai News Today : मीरा रोड येथे झालेल्या हत्यांकाडामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आरोपी असलेल्या मनोज साने याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात पोलीस तपास धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच, कोल्हापूर शहरात माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरानंतर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहर पूर्वपदावर येत आहे. तर, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे ४८ तासांत कर्नाटक आणि मंगळवारी ( १३ जून ) कोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. यासह राजकीय, क्रीडा आणि मनोरंजनच्या बातम्या पाहणार आहोत….




Mumbai Maharashtra News Today : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड वाचा एका क्लिकवर…
पुणे: सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात एका सोसायटीत वाहने पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महेंद्र प्रदीप भिरुड (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे: पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले.
धुळे – शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न चांगलाच गाजत असून काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ठाकरे गटातर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
कल्याण– येथील पारनाका भागातील सरकार वाड्या जवळ जलकुंभाच्या जागेत एका संस्थेने अध्यात्मिक केंद्र सुरू केल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जलकुंभ परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र असतो. याठिकाणाहून शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो.
बुलढाणा : युतीत 'छुपे वादंग' निर्माण करणाऱ्या ना भुपेंद्र यादव यांच्या जिल्ह्यात आज शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त खासदार प्रतापराव जाधव यांचा गड समजल्या जाणाऱ्या मेहकरमध्ये भाजपा नेत्यांची मांदियाळी जमल्याचे चित्र दिसून आले.
नाशिक – वाहन चालविण्याची आवड या एकमेव निकषाचा आधार घेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक मुलगी वाहन चालक होऊन प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेते. तिच्या जिद्दीला कुटूंबियांची साथ मिळाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील पहिली महिला बस चालक होण्याचा मान माधवी साळवे यांना मिळाला आहे.
महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा छळ, गैरवर्तवणूक यासर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी व्यावसायीक आस्थापनांमध्ये आणि संबंधित कार्यालयांममध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यांतील बहुतांश आस्थापनांमध्ये संबंधित कार्यालयांकडून समितीची स्थापना करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेचाच लढविणार तर, भिवंडीची जागा भाजपाच लढविणार आहे, असे विधान शिंदेच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्राची मोठी घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये महाष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा वा महाविद्यालयाचा समावेश नाही.
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद पवार यांना धमकीचे ट्विट करणारा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले.
ठाणे: भिवंडी येथील पूर्णा भागात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १२ कोटी रुपयांचा रासायनिक ज्वलनशील साठा जप्त केला आहे. हा साठा बेकायदेशीर साठवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना धमकी प्रकरणी दोन जणांचा अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. येथे गुरुवारी रात्री एका प्रवाशाचा खून झाला. यापूर्वी एका प्रवाशाच्या नातेवाईकाने बॅटरी कार चालकाला तलवार दाखवून धमकावले होते.
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.
डोंबिवली: येथील पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांनी याच भागातील एका तरुणाला बेदम मारहाण केली. नेमाडे गल्ली येथे बुधवारी रात्री साडे सात वाजता हा मारहाणीचा प्रकार घडला.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात दररोज हत्या, बलात्कार, दंगली घडत आहेत. विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून शिंदे-फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
Mira Road Murder Case Mumbai : सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र मनोज साने याचे वय जास्त असल्याने ही बाब बाहेर लपवून ठेवली होती. ती ज्या अनाथ आश्रमात वाढली तिथे सर्वांना मनोज मामा असल्याचे सांगत होती. सारस्वती वैद्यला एकूण ४ बहिणी आहेत. सर्व बहिणी अनाथ आश्रममध्ये राहात होत्या.
नागपूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा- २ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘एम. एस. ई. बी.’ सोलर अॅग्रो पॉवर मर्यादित कंपनी’ची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या पहिल्या संचालक मंडळाची बैठकही नुकतीच मुंबईत झाली.
नागपूर : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय रस्त्यावरील घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालयापर्यंतचा ३०० मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधणीचे काम सुरू केले आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मच्छर मारण्यासाठी कुणाच्या धमकीची गरज नाही. धमकी नेमकं कोणाकडून आली, हे सुनील राऊत यांना विचारा,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावरील शिवशाही मित्र मंडळ कार्यालयासमोरील सिमेंट काँक्रीटचा नवाकोरा रस्ता शुक्रवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्याने नागरिक, वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तडाखा दिला आहे. विमा कंपनीने शेतकऱ्याच्या कुटुंबीयास नुकसानभरपाईपोटी दोन लाख रुपये दावा दाखल झाल्यापासून वार्षिक सात टक्के व्याजाने द्यावे, असा आदेश आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिले.
दिवसाआड पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिलेले असताना पाण्यासाठी धुळेकरांचे होणारे हाल पाहून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बीजेपी क्या हुआ तेरा वादा ?, सत्ता तुमची, हाल जनतेचे, पाणी द्या नाहीतर राजीनामा द्या, अशा आशयाचे फलक महानगर पालिकेसमोर लावले.
नागपूर : शरद पवार यांच्याशी आमचा वैचारिक विरोध असला तरी त्यांना राज्यात काहीही त्रास होणार नाही. एवढी काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. हे उद्धव ठाकरेंचे सरकार किंवा महाविकास आघाडीचे सरकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी येथे केली.
दिवसाआड पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिलेले असताना पाण्यासाठी धुळेकरांचे होणारे हाल पाहून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बीजेपी क्या हुआ तेरा वादा ?, सत्ता तुमची, हाल जनतेचे, पाणी द्या नाहीतर राजीनामा द्या, अशा आशयाचे फलक महानगर पालिकेसमोर लावले. २० जूनपर्यंत दिवसाआड पाणी न दिल्यास महापालिकेला हंड्यांचे तोरण बांधण्याचा इशारा दिला.
नागपूर : ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ या अमेरिकेतील हवामान अभ्यासक संस्थेने ‘एल निनो’च्या आगमनाची वर्दी दिली आहे. दर महिन्याच्या नऊ तारखेला या संस्थेकडून ‘एल निनो’ बाबत माहिती दिली जाते. आगमनाची माहिती देतानाच हिवाळ्यात ‘एल निनो’ आणखी मजबूत होण्याची शक्यताही या संस्थेने वर्तवली आहे.
नागपूर : कधीकाळी संघटितपणे काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला विदर्भातील बहुजन समाज कालांतराने शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपकडे वळला. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच (विदर्भ) भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वर्षभराने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने आपल्या दुरावलेल्या पारंपरिक मतपेढीला पुन्हा पक्षाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
नागपूर : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर देशात इतर ठिकाणीही मान्सूनच्या हालचालींना वेग आला आहे. तर त्याचवेळी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका देशाच्या किनारपट्टीवर येऊन ठेपला आहे. येत्या ४८ तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
“सुधीर मुनगंटीवार, पडळकर आणि निलेश राणे यांची चौकशी झाली पाहिजे. हे लोक खालच्या पातळीवर बोलत असून, यांची याला फूस आहे का? हे देवेंद्र फडणवीसांनी कबूल करावे,” असं राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. याला आता खासदार धनंजय महाडिका यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अमोल मिटकरांची चौकशी झाली पाहिजे, कारण त्यांच्याएवढी प्रक्षोभक व्यक्तव्य कोणी केली असेल. सत्तेविना हे सर्वजण तडफडत आहेत,” अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली आहे.
वर्धा: आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटप केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी तसेच लोकांना कमी किमतीत तृणधान्य उपलब्ध व्हावे म्हणून उत्पादन क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय झाला.
बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरून जिल्ह्यातील महाविकास आघाडीत उघडपणे जुंपली असतानाच आता युतीमध्ये “शीत युद्ध”सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मिशन ४५ ने डोकेदुखी वाढविली असतानाच लोकसभा निवडणूक प्रमुखपदी कट्टर पारंपरिक विरोधकाची नियुक्ती केल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.
भंडारा : “तुमच्या पत्नीने कोतवाल भरती परीक्षा दिली होती ना, निकाल लागायला अजून वेळ आहे, गजभिये बाई तुमच्या पुढे आहेत, तुमचं नाव पुढे करायचं का? किती देता लवकर सांगा,” असा एका एजंटचा कॉल तुमसर तालुक्यातील एका महिला परीक्षार्थीच्या नवऱ्याला आला. हा अज्ञात एजंट कोण ? याचा मुख्य सूत्रधार कोण? तालुक्यात आणि जिल्ह्यात अशाप्रकारे आर्थिक व्यवहारातून किती जणांची नियुक्ती करण्यात आली, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
राज्यातील अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी २०२३) निकाल १२ जूनला सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबवण्यात येणार असून, प्रथमच मोबाइल ॲपद्वारे उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती, सूचना आणि जागा वाटपाबाबतची माहिती मिळेल.
कुलगुरु डॉ. कानिटकर यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यस्तरावर सहा विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात नॅक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लवकरच विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र कौशल्य विकासच्या सहकार्याने इनक्युबेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
यवतमाळ : ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ ही अविश्वसनीय योजना राज्य शासनाने जाहीर केली. राज्यातील महामार्ग गुळगुळीत असताना राज्य, जिल्हा आणि गाव पातळीवरील मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना प्रचंड कसरत करावी लागते. कदाचित नागरिकांच्या या ‘वेदना’ राज्य शासनापर्यंत पोहोचल्या आणि खड्डेमुक्त महाराष्ट्राचा आव्हानात्मक ‘टास्क’ शासनाने स्वीकारला.
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ही मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत मे महिन्यात रेल्वे सुरक्षा दलाने १६३ मुलांना शोधून त्यांना कुटुंबीयांच्या हवाली केले. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. याचबरोबर दलाकडून ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची मोहीम राबविली जात आहे.
रिझर्व्ह बँकेने बुडीत कर्जांबाबतची नियमावली आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहकारी बँकांना बुडीत कर्जे निर्लेखित करता येतील. याचबरोबर कर्ज बुडवणाऱ्या खातेदारांशी सहकारी बँकांना तडजोड करता येईल. सध्या अशा सुविधा केवळ शेड्यूल्ड कमर्शियल बँका आणि काही निवडक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना आहेत.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अजूनही ताळमेळ नसताना आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीकरिता मतदारसंघनिहाय प्रमुख नेमून भाजपने पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपने वर्षभर आधीच मतदारसंघनिहाय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक: अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने १० आणि ११ जून रोजी येथे ‘नाशिकॉन २०२३’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल ग्रेप काउंटी रिसॉर्ट येथे होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातून ४०० हून अधिक बालरोग तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत् गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पुणे शहरातून १२ आणि १३ जूनला होणार असल्याने या दिवशी होणाऱ्या परीक्षांचे फेरनियोजन करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्यासाठी देवस्थानची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, दर्शनबारी, सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. आषाढीवारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दहा जूनला देहूतून, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या भुसार मालाचे पैसे न देता चार कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शमीत शशिकांत बंब (वय ३५, रा. मार्केट यार्ड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील बेलापूर मधील सेक्टर १५ मधील एका पडीक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एका १९ वर्षीय तरुणीची पडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. ही घटना कळताच एनआरआय पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले.
डोंबिवली – पालिकेच्या डोंबिवली विभागाअंतर्गत पाणीपुरवठा आणि जल-मलनिस्सारण विभागात उपअभियंत्यांच्याअंतर्गत काम करण्यासाठी मागील सात ते आठ महिन्यांपासून कनिष्ठ अभियंते नाहीत. उपअभियंत्यालाच स्वतासह कनिष्ठ अभियंत्यांची कामे करावी लागत असल्याने डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांमध्ये पाणीपुरवठा, मल-जलनिस्सारण विभागात नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत.
अमरावती: विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथील स्काय वॉकच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला केंद्रीय वन्यजीव मंडळाने काही अटी व शर्तींवर स्काय वॉकच्या उभारणीला परवानगी दिली आहे.
संघटनेतील आंदोलनाची धग संपत जाऊ लागली आहे. प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात पाय रोऊन उभे ठाकण्याची ‘शिवसेना स्टाईल’ नेते आणि कार्यकर्ते ३८ वर्षांनंतर विविध पातळ्यांवर चाचपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपाचे नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपाच्या उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो,” असा आरोप करत संजय राऊतांनी राणेंना खडसावलं.
मुंबई आणि ठाण्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांचा शासन पुनर्विकास करील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचा प्रारंभ करताना केली. राजकारणी मंडळी अशा घोषणा नेहमीच करीत असतात. प्रत्यक्षात या योजना अमलात येतातच असे नाही. त्यामुळे ही केवळ येऊ घातलेल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील सवंग लोकप्रियतेसाठी केलेली घोषणा आहे की, प्रत्यक्षात ते शक्य आहे? त्यात अडचणी आहेत का? याचा हा आढावा.
लोकसभेच्या ४५, तर विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपने राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूकप्रमुखांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपने निवडणूक प्रमुख नेमले असले तरी ते शिवसेनेसाठीही काम करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.