Maharashtra Weather Update Today: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि विरोधी बाकांवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या फॉर्म्युल्याच्या आधारावर जागावाटप होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
pavana river become most polluted river in india
पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित; ‘हे’ आहे कारण
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Live Updates

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

19:41 (IST) 30 May 2023
धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया अटक; प्रशांत काॅर्नर कारवाई प्रकरण

ठाणे: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीस योग्य वागणूक दिली नाही म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत काॅर्नर या मिठाईच्या दुकानावर पालिकेने कारवाई केल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना महागात पडले आहे.

सविस्तर वाचा...

19:32 (IST) 30 May 2023
ठाणे : रस्ते, साफसफाई, उद्यान, मलनिस्सारण कामात आढळल्या त्रुटी; अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस तर कंत्राटदार कंपनीला ५ लाखांचा दंड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात रस्ते नुतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामांची नुकतीच पाहाणी केली. या दौऱ्यादरम्यान रस्ते साफसफाई तसेच इतर कामांबाबत त्रुटी आढळून आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

वाचा सविस्तर...

19:17 (IST) 30 May 2023
बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली असून या समित्यांची बैठक १७ जूनला मुंबईत होईल.

सविस्तर वाचा...

19:03 (IST) 30 May 2023
तीन शहरांना एकच नगररचनाकार; अंबरनाथच्या नगररचनाकारावर बदलापूर, उल्हासनगरची जबाबदारी

शहर नियोजन आणि शहर विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या नगर विकास विभागात पात्र अधिकाऱ्यांची वानवा आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांच्या नियोजनाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून एकाच नगररचनाकारावर सुरू आहे.

वाचा सविस्तर...

18:43 (IST) 30 May 2023
पुणे: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून

पुणे: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा चाकूने गळा चिरून तिचा खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील पिसोळी भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे.

सविस्तर वाचा...

18:42 (IST) 30 May 2023
पदकं विसर्जित करण्यासाठी कुस्तीपटू गंगा नदीच्या किनाऱ्यावर दाखल

कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी जाहीर केलं होतं की, ते आज त्यांची ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतली पदकं गंगेत विसर्जित करतील. त्यासाठी कुस्तीपटून हरिद्वार येथे गंगा किनारी दाखल झाले आहेत.

17:16 (IST) 30 May 2023
वैदर्भियांनो सावधान! पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाचा मारा

नागपूर: राज्यातील अनेक भागाला सोमवारी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले, पण पावसाचा कहर थांबलेला नाही. तर आणखी दोन दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सविस्तर वाचा...

16:37 (IST) 30 May 2023
भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

ठाणे: भिवंडी येथील रांजनोली नाका भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

सविस्तर वाचा...

16:33 (IST) 30 May 2023
‘टीडीएम’ जूनमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार; “एप्रिल महिन्यात चित्रपटाला राज्यात केवळ १२० शो का दिले?”- दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे

'टीडीएम' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे. एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण थिएटर न मिळाल्याने उद्विग्न होत चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी हा चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा सविस्तर...

16:24 (IST) 30 May 2023
डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा

डोंबिवली: येथील पश्चिमेतील गरीबाचापाडा भागात विकास आराखड्यातील पोहच रस्त्याच्या गल्लीमध्ये एक सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला वाहनतळाची सुविधा नसल्याने २७ सदनिका या असलेल्या इमारतीमधील सर्व वाहने मुख्य वर्दळीच्या, अंतर्गत रस्त्यावर उभी राहणार आहेत.

सविस्तर वाचा...

16:21 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: किर्तीकर नाराज नाही, मी स्वत: बोललो - गिरीश महाजन

यावेळी आम्हाला १०० टक्के यश लोकसभा निवडणुकीत येणार आहे. सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. गजानन किर्तीकरांशी मी त्याच दिवशी फोनवर बोललो. त्यांनी मला सांगितलं की त्यांचा असा कोणताही हेतू नव्हता. राज ठाकरे - देवेंद्र फडणवीसांची भेट होणं यात काही वाईट नाही. राज्यातले अनेक नेते एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे ते कुणालातरी फोडण्यासाठी भेटत असतील अशातला काही भाग नाही. यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही - गिरीश महाजन

15:55 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी मोठा निर्णय...

मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी गेल्या अनेक वर्षांपासून योजना प्रलंबित आहे. लाखो लोक घराबाहेर असून त्यांना भाडं मिळत नाहीये. या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय. मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे - एकनाथ शिंदे

15:55 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: आयटी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी प्रयत्न...

आयटी पार्कमध्ये मोठी गुंतवणूक यायला हवी, लाखोंना रोजगार मिळायला हवा यासाठी आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी निर्णय घेतले - एकनाथ शिंदे

15:54 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय...

नमो शेतकरी सन्मान योजनेत केंद्राकडून ६ हजार रुपये दिले जात होते. त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील. त्याचबरोबर पीकविम्याचा जो हिस्सा शेतकरी भरत होता, तोही त्याच्या विम्याचा हिस्सा सरकार भरणार आहे. शेतकऱ्यानं फक्त एक रुपया भरायचा - एकनाथ शिंदे

15:37 (IST) 30 May 2023
‘मेट्रो २ ब’मधील मंडाले कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण

मुंबई: ‘डी. एन. नगर, अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील मंडाले कारशेडच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

सविस्तर वाचा...

15:17 (IST) 30 May 2023
पनवेल: वीज कापण्याच्या बहाण्याने पाऊणेसात लाखांची फसवणूक

पनवेल: महावितरण कंपनीकडून बोलतोय, तूमचे वीजदेयक थकले असून महावितरण अ‍ॅपवरुन देयक न भरल्यास वीज खंडीत होईल असा बहाणा करुन कळंबोलीतील एका वीजग्राहकाची तब्बल पाऊणेसात लाखांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा...

15:06 (IST) 30 May 2023
शिळफाटा रस्त्यावर ३०० बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, ७५ हजाराचा दंड वसूल

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहन चालकांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाने पत्रीपूल ते पलावा चौक, काटई-बदलापूर रस्ता भागात विशेष वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर घटनास्थळीच दंडात्मक कारवाई केली जात आहे.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 30 May 2023
कल्याणमध्ये रिक्षाच्या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

मलंगगड रस्त्यावरील चेतन शाळेच्या जवळ सोमवारी सकाळी हा अपघात घडला. १९ वर्षाची एक विद्यार्थीनी पिसवली भागात कुटुंबासह राहते. घर दुरुस्तीचे सामान घेऊन ती मलंगगड रस्त्याने पायी चालली होती. यावेळी तिला एमएच-०५-डीझेड-८३१४ या वाहन क्रमांकाच्या रिक्षा चालकाने जोराची ठोकर दिली.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 30 May 2023
मुलांच्या प्रेमापोटी डॉक्टर दाम्पत्याचा संसार पुन्हा फुलला; ‘भरोसा सेल’च्या समुपदेशनाचा सकारात्मक परिणाम

पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि व्यवसायाने डॉक्टर. दोघांनी कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न केले. संसारात दोन फुले फुलली. काही वर्षे दोघेही अमेरिकेत वैद्यकीय सेवेत लागले. मात्र, करोनामुळे भारतात परतले आणि दोघांच्या संसारात संशयाने विष कालवले. त्यामुळे संसार विस्कटला आणि तुटण्याच्या काठावर पोहचला. प्रकरण भरोसा सेलपर्यंत पोहचले.

सविस्तर वाचा

14:20 (IST) 30 May 2023
“नागपुर की ट्रैफिक, बोलें तो सच में तकलीफ” वाहतूक व्यवस्था कोलमडली; बेशिस्त वाहतुकीमुळे नियम पाळणाऱ्यांना मनस्ताप

नागपूर: शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून याचा फटका नियम पाळून वाहने चालवणारे व पादचाऱ्यांना बसत आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत असून रस्तेही गुळगुळीत झाले आहेत. यामुळे सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे.

सविस्तर वाचा...

14:15 (IST) 30 May 2023
मुंबई: तेजस एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधांचा अभाव; जेवणाचा दर्जा घसरल्याची प्रवाशांची तक्रार

अतिशय वेगवान, अत्याधुनिक सुविधा, पूर्णतः वातानुकूलित एक्स्प्रेस अशी ख्याती असलेल्या तेजस एक्स्प्रेसबद्दल प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मध्य आणि कोकण रेल्वेवर धावणाऱ्या मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेसचे स्वयंचलित दरवाजे अर्धवट बंद होत असून मनोरंजन स्क्रीन, वायफाय आणि यूएसबी साॅकेट आदी सुविधा बंदच आहेत. सविस्तर वाचा…

14:14 (IST) 30 May 2023
बांधकाम व्यवसायातील दलालांच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर; ४२३ पैकी ४०५ उमेदवार यशस्वी,पहिल्या परीक्षेचा ९६ टक्के निकाल

महारेरा’ने  बांधकाम व्यवसायातील दलालांसाठी परीक्षा आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले असून ‘महारेरा’ने दलालांसाठी २० मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत ९६ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला ४२३ जण बसले होते. त्यापैकी ४०५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. सविस्तर वाचा…

14:13 (IST) 30 May 2023
पुणे: तरुणांनी केला अपमान आणि ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने केली आत्महत्या…अशी घडली घटना

स्पीकरवरून निर्माण झालेला वाद एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर बेतला.  अपमानित झाल्याने एका ७० वर्षीय नागिरकाने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

14:11 (IST) 30 May 2023
पिंपरी: नणंदा-सासू यांचे केस विंचरण्यावरून टोमणे; सुनेने घेतला गळफास, सांगवी पोलिसात तक्रार दाखल…

केस विंचरण्यावरून आणि सततच्या टोमण्याला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासू आणि दोन नणंदांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. सविस्तर वाचा…

14:10 (IST) 30 May 2023
पुणे: प्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.तील गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीसीचा मोठा निर्णय…

देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये होणारी प्राध्यापकांची नियुक्ती आणि पीएच.डी. पदवी देण्याच्या प्रक्रियेवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. सविस्तर वाचा…

14:05 (IST) 30 May 2023
“लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे...’’, वनमंत्री मुनगंटीवार यांची खा. धानोरकर यांना श्रद्धांजली

चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खा. धानोरकर यांची ओळख होती.

सविस्तर वाचा

13:33 (IST) 30 May 2023
अकोला: धक्कादायक! ‘क्राईम शो’चा दुष्परिणाम; किरकोळ वादातून माहेरी आलेल्या मोठ्या बहिणीवर लहान बहिणीचे चाकूने सपासप वार

अकोला: ‘क्राईम शो’ पाहून मनावर परिणाम झालेल्या लहान बहिणीने किरकोळ वादातून मोठ्या बहिणीवर चाकूने सपासप वार करून यमसदनी धाडल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील खडका गावात घडली.

सविस्तर वाचा...

13:17 (IST) 30 May 2023
नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळली; बालिकेसह तीघांचा मृत्यू ; सात जण गंभीर

नांदगाव- जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना नाशिकच्या नांदगाव – मालेगाव रस्त्यावरील नाग्या – साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून ‘ इको कार ‘ नदीत कोसळल्याने चार वर्षीय बालिकेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. सविस्तर वाचा…

13:15 (IST) 30 May 2023
मुंबई: सागरी किनारा मार्गातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार ब्रेक थ्रू

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी दुपारी प्रियदर्शनी पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचा ‘ब्रेक थ्रू’ होणार आहे. सविस्तर वाचा…

13:14 (IST) 30 May 2023
पिंपरी: नणंदा-सासू यांचे केस विंचरण्यावरून टोमणे; सुनेने घेतला गळफास, सांगवी पोलिसात तक्रार दाखल…

केस विंचरण्यावरून आणि सततच्या टोमण्याला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासू आणि दोन नणंदांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. सविस्तर वाचा…

13:14 (IST) 30 May 2023
शेतीकामाची चिंता विसरा, यंत्रमानव आहे मदतीला – रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

जळगाव: शेतीकामे करण्यास मजूर मिळत नाही. काही ठिकाणी जास्तीचे पैसे देऊनही आहे त्या शेतातून मजूर पळविण्याचे प्रकार घडताना दिसून येतात. शेतीकामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणीही करावी लागते.

सविस्तर वाचा...

13:13 (IST) 30 May 2023
पुणे: प्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.तील गैरप्रकार रोखण्यासाठी यूजीसीचा मोठा निर्णय…

देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये होणारी प्राध्यापकांची नियुक्ती आणि पीएच.डी. पदवी देण्याच्या प्रक्रियेवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. या प्रक्रियेत होणारे उल्लंघन रोखण्यासाठी यूजीसीने एक स्थायी समिती स्थापन केली असून, प्राध्यापकांच्या नियुक्ती आणि पीएच.डी. संदर्भातील नियमांच्या उल्लंघन प्रकरणांमध्ये ही समिती लक्ष घालून कारवाई प्रस्तावित करणार आहे. सविस्तर वाचा…

13:08 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंना पाहुणचाराची सवय आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्या भेटीचा आमच्यावर परिणाम होणार नाही - संजय राऊत

13:07 (IST) 30 May 2023
Maharashtra Live News Today: संजय राऊतांचं भाजपावर टीकास्र

सर्व पक्षांना संपवणं हेच भाजपाचं धोरण - संजय राऊत

12:56 (IST) 30 May 2023
जालना मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही, सात वेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव

लागोपाठ सात निवडणुकांमध्ये काँग्रेसचा निभाव लागलेला नसल्याने जालना लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने आग्रह धरण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाचे जिल्ह्यातील एक प्रमुख पुढारी आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी कार्यकर्त्यांच्या या मागणीस दुजोरा दिला असून या अनुषंगाने पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा

12:55 (IST) 30 May 2023
यवतमाळ : पोलीस भरतीसाठी खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्य सूत्रधारास बार्शीत बेड्या

police recruitment fraud पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस प्रशासनाने केलेल्या चौकशीत बीड येथे सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रमाणपत्र बनवून देणा-या मुख्य सूत्रधारास सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 30 May 2023
नर्मदा भ्रमण करण्यास निघालेल्या साधुंना सत्काराचा गहिवर

वर्धा: तिर्थाटनास निघालेल्या साधूंची देशभर भ्रमंती होत असल्याची भारतीय संस्कृती अद्याप जिवंत असल्याचे पाहायला मिळणे दुर्मिळच. अमरकंटक ते अमरकंटक असा दीर्घ प्रवास करीत फिरणारे साधू वर्धा वास्तव्यास आले असताना त्यांना सुखद प्रत्यय आला.

हेही वाचा...

12:53 (IST) 30 May 2023
जळगाव: ऑनलाइन व्यापाराच्या नावाखाली फसविणार्‍यास भावनगरातून अटक; पाच लाखांची रोकड हस्तगत

जळगाव: ऑनलाइन व्यापारात गुंतवणूक करून दुप्पट नफ्याचे आमिष दाखवीत एकाला सुमारे साडेनऊ लाखांची फसवणूक करणार्‍या तरुणाला भावनगरमधून (गुजरात) सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली.

सविस्तर वाचा...

12:53 (IST) 30 May 2023
नाशिक: पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांवर दगडफेक

नाशिक: महानगरपालिकेच्यावतीने पंचवटी विभागात मंगळवारी सकाळी अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई सुरू असताना जमावाने मनपा पथकासह पोलिसांवर दगडफेक केल्याने एकच गोंधळ उडाला.

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 30 May 2023
मरावे परी देहरूपी उरावे! मरणोत्तर देहदानाचा वृद्ध दाम्पत्याचा संकल्प; कार्यास देणगीही दिली

वैद्यकीय शिक्षणात देहाचा अंतर्बाह्य अभ्यास केल्या जातो. त्यासाठी आवश्यक मृतदेह प्राप्त करण्यासाठी बरेच सायास करावे लागत असल्याची वैद्यकीय महाविद्यालयांची तक्रार राहते. या पार्श्वभूमीवर स्वतः मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करण्याची बाब अभिनंदनीय ठरावी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देहदान अवयवदान उपक्रम हाती घेतला आहे.

सविस्तर वाचा

12:31 (IST) 30 May 2023
नागपूर : प्रिन्स तुलीला पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

वादग्रस्त हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली याने एका महिलेशी अश्लील चाळे करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अटक केली. मात्र, सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रिन्स तुलीला अंबाझरी पोलीस ठाण्यात ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’ दिल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा

12:15 (IST) 30 May 2023
कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाला स्थानिकांचे समर्थन, पर्यावरणवाद्यांचा विरोध!; भाजप नेते म्हणतात…

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन संचाबाबत सोमवारी जनसुनावणी झाली. यावेळी बहुसंख्य स्थानिक नागरिकांसह १३ ग्रामपंचायतींनी प्रकल्पाला समर्थन दिले. परंतु पर्यावरणवादी, काँग्रेस, आप, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मात्र प्रकल्पाला विरोध केला.

सविस्तर वाचा

12:12 (IST) 30 May 2023
कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास

बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असा केवळ १७ वर्षाचा राजकीय प्रवास दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा राहिला आहे. या सतरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत धानोरकर यांनी अनेक चढउतार पाहिले.

सविस्तर वाचा

12:11 (IST) 30 May 2023
यवतमाळ : बंद फ्लॅटमध्ये युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आत्महत्या की हत्या? चर्चांना उधाण

वणी येथील जैन लेआऊट परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये युवतीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या. प्रिया रेवानंद बागेसर (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

12:04 (IST) 30 May 2023
अलिबाग: कमी किमतीत सोने देतो सांगून फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई

शेतात नांगरणी दरम्यान जुने सोनं सापडले आहे, ते बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे, असे सांगून अनेकांची फसवणूक करून पसार होणाऱ्या टोळीचा रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने पर्दाफाश केला आहे. यातील तीन आरोपींनी ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरु आहे. सविस्तर वाचा…

12:03 (IST) 30 May 2023
राज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण

आगामी काळात राज्यात नवीन रिक्षांना परवाना देणे थांबवले जाणार आहे. रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने यासाठी परिवहन विभागाने पावले उचलली आहेत. याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला पाठवला आहे.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 30 May 2023
पुणे: शाळकरी मुलीवर बलात्काराचा प्रकार चार वर्षांनी उघड

शाळकरी मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने चार वर्षांपूवी एकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळकरी मुलीची काढलेली छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सविस्तर वाचा…

12:01 (IST) 30 May 2023
‘एमपीएससी’त काळानुरूप बदलासाठी अभ्यास गट अत्यावश्यक; आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये (एमपीएससी) असलेल्या अनेक उणिवांबाबत उमेदवारांच्या तक्रारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘एमपीएससी’मध्ये काळानुरूप बदल करायचे असतील तर राज्य शासनाने अथवा आयोगाने स्वत:हून अभ्यास गटाची स्थापना करणे अत्यंत आवश्यक आहे.

सविस्तर वाचा

12:01 (IST) 30 May 2023
कोराडीत काँग्रेस-भाजप समर्थक समोरासमोरच; प्रस्तावित वीज प्रकल्प जनसुनावणीत तणाव, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी

कोराडीत प्रस्तावित नवीन वीज प्रकल्पाबाबत सोमवारी आयोजित जनसुनावणीत काँग्रेस-भाजप समर्थक समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही पक्षांकडून सुनावणीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सविस्तर वाचा…

11:59 (IST) 30 May 2023
जळगावात अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका; पाच ट्रॅक्टरभर माल जप्त

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरात राबविलेल्या मोहिमेत पाच-सहा ट्रॅक्टरभर लोखंडी पेट्यांसह विक्रेत्यांच्या हातगाड्या, तसेच विविध फळे, कापडाचे गठ्ठे, असा सुमारे आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यापुढेही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू राहणार असल्याचे उपायुक्त गणेश चाटे यांनी सांगितले.   सविस्तर वाचा…

Maharashtra Marathi News Updates

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर