Maharashtra Weather Update Today: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि विरोधी बाकांवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या फॉर्म्युल्याच्या आधारावर जागावाटप होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
ऐन उन्हाळ्यात मनमाड शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. वाघदर्डी धरणातील जलसाठा खालावत चालल्याने शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर करंजवण धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे.
निश्चलनीकरणापासून जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आलेली आहे. बँक ठेवीदारांना दरमहा पाच हजार रुपये रोख रक्कमही देऊ शकत नाही. बँकेची अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) १३४२ कोटींवर गेली आहे. बँकेवर आरबीआयकडून कारवाईची टांगती तलवार आहे.
अकरावीचा समीर आणि दहावीची स्मिता (काल्पनिक नाव) दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम. दोघेही फुटाळ्यावर भेटले. भावी संसाराच्या गप्पाटप्पा रंगल्या आणि सायंकाळ झाली. काळजीपोटी भावाने बहिणीला फोन केला. बहिणीने फोन कट करण्याऐवजी चुकून उचलल्या गेला.
लोकसभा अध्यक्ष संसदेत येताना सेंगोल घेऊन येणार की अशोकस्तंभ घेऊन येणार? तटस्थ सभागृह धार्मिक करण्याचा हा प्रयत्न झालाय. उत्तर आणि दक्षिणेतला वाद हा वैदिक धर्मातला जुना वाद आहे. हा वर्चस्वाचा वाद आहे. कुठेतरी समतोल व्हायला हवा होता, पण ते झालं नाही. अलाहाबाद, वाराणसी वैदिक विद्यापीठाचं अग्रस्थान मानलं जात. अशावेळी त्यांना डावलून तुम्ही दक्षिणेतील बाबींना महत्त्व देताय, यात राजकारण आहे – प्रकाश आंबेडकर
शिवसेना किंवा एनसीपी असेल त्यांना माहित आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्यं केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो – देवेंद्र फडणवीस<
संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे. तीन-चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे त्याच ठाकरे गटातल्या की त्याच संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल – देवेंद्र फडणवीस
खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत काल दिल्लीत जे घडलं ते नींदनीय आहे. शांततामय मार्गाने विरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱ्या आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार असो! देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने अपल्या तरूण खेळाडूंच्या पाठी ठाम उभं रहायला हवं आणि न्यायाची मागणी करायला हवी! – आदित्य ठाकरे<
खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत काल दिल्लीत जे घडलं ते नींदनीय आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 30, 2023
शांततामय मार्गाने विरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱ्या आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार असो!
देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने अपल्या… pic.twitter.com/VJaJiVcwSk
महाराष्ट् न्यूज लाइव्ह
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर