Maharashtra Crisis Updates in Marathi : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला.

दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

uday samant buldhana marathi news
“महायुती बुलढाण्यासह राज्यात ४५ जागा जिंकणार”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा; तुपकरांवर टीकास्त्र
no international airport pune city marathi news
पुणे : उद्योगांना पूरक पायाभूत सुविधांची बोंब!
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
loksatta analysis measures to prevent river water from pollution in maharashtra
विश्लेषण : राज्यातील नद्या केव्हा स्वच्छ होणार?

तर ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना पूर्वी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Updates, 14 September 2022: अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

19:02 (IST) 14 Sep 2022
एनएमएमटीचा पेपरलेस तिकीटांचा मानस ; बस प्रवाशांची कॅशलेस प्रवासाकडे वाटचाल

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एन.एम.एम.टी.बस ट्रॅकर ॲपद्वारे तिकीट बुकींग व ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

18:55 (IST) 14 Sep 2022
पिंपरी : ‘रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना करावी’

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी. मेट्रो, बीआरटीप्रमाणे रिक्षा, टॅक्सीलाही सार्वजनिक सेवेचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे ठराव दिल्लीत येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत मंजूर करण्यात आले.

सविस्तर वाचा

18:34 (IST) 14 Sep 2022
नवी मुंबई : प्रवासी असल्याचा बहाणा करून आरोपीने वाहन चालकाला लुटले

प्रवासी म्हणून बसून निर्जन ठिकाणी गाडी थांबवुन चाकूचा धाक दाखवून वाहन चालकास लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केले आहे. आरोपीच्या अटकेने अशाच प्रकारच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली असून त्याच्या नावावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.

सविस्तर वाचा

18:25 (IST) 14 Sep 2022
पुणे : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणे दुर्दैवी ; खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

महाराष्ट्र सोडून इतर राज्यात प्रकल्प जाणे खुप दुर्दैवीची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणाच्या नोकऱ्या जाणार आहेत. हा विषय राजकीय न करण्याची राज्य सरकारला विनंती आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

सविस्तर वाचा

18:07 (IST) 14 Sep 2022
पुणे : विद्यापीठातील वीजपुरवठा खंडित ; परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना त्रास

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जवळपास बारा तास वीजपुरवठा खंडित होता. मात्र विद्यापीठातील परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्यासह पाहुण्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याचा त्रास सहन करावा लागला.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 14 Sep 2022
पुणे : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाकडून हॅाटेलमध्ये गोळीबार ; मुंढव्यातील घटना

सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने मुंढव्यातील एका हॅाटेलमध्ये पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

17:30 (IST) 14 Sep 2022
उद्योगपतीचे अपहरण करायला दिल्लीत गेले नि अडकले! ; बुलढाण्याच्या युवकांना भोवला झटपट श्रीमंत होण्याचा नाद

बेरोजगारी व तुटपुंज्या कमाईला कंटाळून झटपट श्रीमंत होण्याच्या नाद बुलढाण्याच्या युवकांना चांगलाच भोवला. उद्योगपतीचे अपहरण करायला ते दिल्लीत गेले नि अडकले. ‘ त्या’ तिघांना दिल्लीत पोलिसांनी पकडले. ते मूळचे बुलढाण्याचे निघाल्याने त्यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सविस्तर वाचा

17:10 (IST) 14 Sep 2022
अंबरनाथ : घरात घुसनू वयोवृद्ध महिलेचे दागिने लुटले

येथील सुभाषवाडी परिसरात राहणाऱ्या एका ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेचे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने लुटल्याच्या प्रकार समोर आला आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या हाताला देखील दुखापत झाली आहे.

सविस्तर वाचा

17:04 (IST) 14 Sep 2022
नागपूर कारागृह पुन्हा चर्चेत, ड्रग्स तस्कर आबू खानला कुख्यात कैद्याने केली मारहाण

गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात गांजा, मोबाईल, बॅटरी आणि सीमकार्ड सापडत असल्यामुळे कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे. त्यात विदर्भातीस सर्वात मोठा ड्रग्स तस्कर आबू खानला एका कुख्यात कैद्याने मारहाण केल्यामुळे पुन्हा नागपूर कारागृह चर्चेत आले आहे.

सविस्तर वाचा

16:47 (IST) 14 Sep 2022
ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती.

सविस्तर वाचा

16:18 (IST) 14 Sep 2022
नवी मुंबई : पावसामुळे भाज्यांच्या दर्जावर परिणाम ; भाज्या भिजत असल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसांपासून राज्यसह नवी मुंबई शहरात पावसाची उघडझाप सुरू आहे. पावसाच्या संततधारेने भाज्यांच्या दर्जावर परिणाम होत असून पाण्याने भिजलेल्या भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा भाज्या कमी दराने विकण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढावली आहे.

सविस्तर वाचा

16:05 (IST) 14 Sep 2022
वाशीम : … अन् पंचायत समितीमध्ये भरली शाळा; जि.प.शाळेची इमारत मोडकळीस आल्याने पालक आक्रमक

मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. पावसामुळे वर्गखोल्यांना गळती लागली आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून येथे शिक्षण घ्यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी पाल्यांसह चक्क मालेगाव पंचायत समितीच्या सभागृहातच शाळा भरविली.

सविस्तर वाचा

16:03 (IST) 14 Sep 2022
लोनॲपवरील कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा केला खून ; वारजे भागातील घटना

पुणे : लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गौरी सुनील डांगे (वय.२४) हिला ताब्यात घेतले आहे. बातमी वाचा सविस्तर...

16:01 (IST) 14 Sep 2022
सिडकोच्या बोकडविरा परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच ; नागरिकांकडून संताप व्यक्त

उरण : सिडकोच्या बोकडविरा ते शिर्के वसाहत मार्गावरील पथदिवे भर दिवसा सुरू असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकदा याच मार्गावरील उड्डाणपूलावरील दिवे बंद असल्याने प्रवासी व नागरिकांना अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत असतांना दिवसाढवळ्या पथदिवे सुरू ठेवून विजेचा अपव्यय केला जात आहे. बातमी वाचा सविस्तर...

15:49 (IST) 14 Sep 2022
भिवंडीत खाद्य तेल आणि औषधांचा साठा असलेल्या गाळ्यांना आग ; आगीत गाळ्यांचे मोठे नुकसान

भिवंडीतील पूर्णा भागात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास खाद्य तेल आणि औषधांचा साठा असलेल्या तीन ते चार गाळ्यांना अचानक आग लागली होती. या आगीत गाळ्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सविस्तर वाचा

15:37 (IST) 14 Sep 2022
उरण : मोठीजुई कळंबुसरे – चिरनेर बाह्यवळण मार्ग हरवला खड्ड्यात

खोपटे ते चिरनेर मार्गावरील मोठीजुई कळंबुसरे – चिरनेर बाह्यवळण रस्त्यावर संपूर्ण वाहन अडकून पडेल इतके मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी मनसे ने सार्वजनिक बांधकाम विभागा कडे केली आहे.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 14 Sep 2022
मुंबई : अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसल्याचा महानगरपालिका प्रशासनाचा खुलासा

मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल्यांमुळे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर टीका झाल्यानंतर आता प्रशासनाने मौन सोडले आहे. प्रशासनातील वरिष्ठ पातळीवर होत असलेले फेरबदल हे पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाचे आहेत.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 14 Sep 2022
पुणे : परिवहन विभागातर्फे फर्ग्युसनमध्ये रस्ते सुरक्षा कक्ष ; राज्यातील पहिलेच महाविद्यालय

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली. याच कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकावू परवाना दिला जाणार असून, असा कक्ष सुरू झालेले फर्ग्युसन हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. 

सविस्तर वाचा

14:51 (IST) 14 Sep 2022
चंद्रपूर : बिबट्या कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् खुराड्यात अडकला; वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद

कोंबड्यांची शिकार करायला गेलेला बिबट खुराड्यात अडकल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भद्रावती शहरातील खापरी वॉर्ड येथील साई नगरात उघडकीस आली.येथील निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरातील पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केला.

सविस्तर वाचा

14:49 (IST) 14 Sep 2022
मुंबई : म्हाडा भरती परीक्षा निकाल जाहीर

म्हाडातील रिक्त ५६५ पदांच्या भरतीसाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. म्हाडाने ५६५ पैकी ५३३ पदांचा निकाल जाहीर केला.

सविस्तर वाचा

14:10 (IST) 14 Sep 2022
डोंबिवली जवळील संदप गावातील केबल व्यावसायिकाची स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून रेल्वे मार्गात आत्महत्या

डोंबिवली जवळील संदप गावातील एका ४५ वर्षाच्या केबल व्यावसायिकाने गावातील केबल व्यावसायिक १५ स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी दातिवली-निळजे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अज्ञात एक्सप्रेस समोर आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी केबल व्यावसायिकाने मोबाईलव्दारे दृश्यध्वनी चित्रफित तयार करून ती आपल्या बंधूला पाठविली होती.

सविस्तर वाचा

13:57 (IST) 14 Sep 2022
यवतमाळ : काळरुपी पुरातून ९० वर्षीय महिलेसह आठ रुग्णांची सुखरूप सुटका ; बचाव पथक ठरले देवदूत

गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे. प्रकृती खालावूनही पुरामुळे उपचारासाठी बाहेर पडू न शकणाऱ्या ९० वर्षीय वृद्धेसह आठ रुग्णांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले.

सविस्तर वाचा

13:39 (IST) 14 Sep 2022
नवी मुंबई : राडारोड्यातुन ४ लाखाहून अधिक पेव्हरब्लॉक निर्मिती ; आतापर्यंत ३० हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया

शहरातील , खारफुटी, कांदळवन , मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'डेब्रिज ऑन कॉल' तसेच 'भरारी पथक कारवाईच्या माध्यमातून तुर्भे येथे राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

13:31 (IST) 14 Sep 2022
मुंबई किनारपट्टीलगत डॉल्फिनची गणना करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा येत्या दीड वर्षात अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पॉर्पोईज या प्रजातींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सहयाद्री अतिथीगृहात कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बातमी वाचा सविस्तर...

13:23 (IST) 14 Sep 2022
नवी मुंबईतील उच्च विद्युत वाहिन्याखालील नर्सरीच्या आडून बेकायदा कारभाराचे चांगभले

देशात स्वच्छ शहराच्या यादीत मागील अनेक वर्ष वरचे स्थान प्राप्त करण्याचा नावलौकीक मिळवलेल्या नवी मुंबई शहरात होऊ घातलेल विमानतळ , शिवडी नाव्हाशेवा सागरी मार्ग,तसेच वाढती जलवाहतूक , विस्तारत असलेली रेल्वेसेवा यामुळे झपाट्याने विकसित झालेल्या व तसेच आगामी काळात मोठी मागणी असलेल्या महामुंबई परिसरात जागांचे दर कोट्यावधींची उड्डाणे घेत आहे.

सविस्तर वाचा

13:19 (IST) 14 Sep 2022
माथेरानच्या मिनी ट्रेनमधून दीड लाख प्रवाशांनी केली सफर

मुंबई : पर्यटकांसाठी कायमच आकर्षण ठरलेल्या आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरान मिनी ट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. बातमी वाचा सविस्तर...

13:06 (IST) 14 Sep 2022
ठाणे : विद्युत मनोरा हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक

घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागात असलेल्या विद्युत मनोऱ्यावर मंगळवारी रात्री झालेल्या दुर्घटनेनंतर येथील रहिवासी महावितरण कंपनी विरोधात आक्रमक झाले आहेत. बुधवारी सकाळी येथील रहिवाशांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे हा मनोरा हटविण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

12:53 (IST) 14 Sep 2022
डोंबिवली : शिळफाटा रस्ता बाधितांचे मंगळवार पासून काटई येथे बेमुदत धरणे आंदोलन

कल्याण शिळफाटा रस्त्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे. या मागणीसाठी भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ते बांधित शेतकरी संघटनेतर्फे येत्या मंगळवार पासून (ता.२०) काटई जकात नाका (आंगण ढाबा) येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे, अशी माहिती या संघटनेचे गजानन पाटील यांनी दिली.

सविस्तर वाचा

12:50 (IST) 14 Sep 2022
बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने व्यवस्थापकाची तरुणाला मारहाण

उल्हासनगर : बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने एका २५ वर्षीय तरुणाला बार व्यवस्थापकाने लोखंडी सळीने जबर मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. बातमी वाचा सविस्तर...

12:48 (IST) 14 Sep 2022
नागपूर : जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव ; पाच किलोमीटर परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहे. पशुसंवर्धन विभागाने पाच किलोमीटर परिसरातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बातमी वाचा सविस्तर...

12:14 (IST) 14 Sep 2022
डोंबिवली : पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांकडून एक लाखाचे सामान जप्त

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील ग प्रभाग हद्दीतील राजाजी रस्ता, रामनगर, उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पथ, मानपाडा रस्ता भागातून ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी फेरीवाल्यांविरुध्द आक्रमक कारवाई करुन फेरीवाल्यांच्या हातगाड्या, विक्री मंच, सामान असे एकूण सुमारे एक लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. बातमी वाचा सविस्तर...

12:13 (IST) 14 Sep 2022
नवनीत राणांच्या आरोपांवर आरती सिंग यांचं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध पोलीस आयुक्त आरती सिंग असा वाद पाहायला मिळत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आरती सिंग यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला. यानंतर नवनीत राणा यांनी आरती सिंग यांच्यावर वर्दीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आपण त्यांना घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. नवनीत बोलताना आता पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सविस्तर वाचा -

12:12 (IST) 14 Sep 2022
भाजपा-मनसे युतीबाबत संदीप देशपांडे यांचं सुचक वक्तव्य

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. भाजपा नेते राज ठाकरेंची भेट घेत असल्याने ही वाढती जवळीक पाहता लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त होती होती. पण यादरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

सविस्तर वाचा -

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमुळे वाढणार आहेत. सोमवारी रात्री झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारने केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेला म्हणजेच सीबीआयला देशमुखांविरोधात खटला चालवण्यास हिरवा कंदील दिला आहे.