Mumbai Maharashtra News Updates, 13 September 2024: विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. इच्छुकांकडून तिकिटासाठी वरीष्ठांकडे विचारणा केली जाऊ लागली आहे. त्याचवेळी जागावाटपाच्या चर्चांसाठीही महायुती व महाविकास आघाडी यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमधील फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी ही निवडणूक प्रचंड चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Today, 13 September 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी...
नाशिक :देवळा तालुक्यातील दहिवड येथील धबधब्याजवळ मालेगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
गोंदियाः देशातील पंतप्रधान पदाची एक गरिमा आहे. त्यामुळे पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींनी ती राखावी अशी देशाची अपेक्षा असते. न्याय व्यवस्थेला संशयात्मक पद्धतीने बघितले जात असेल तर हे देशाकरिता योग्य नाही, अशी टीका महाराष्ट्र कॉग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांनी गोंदियात केली.
सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे त्यांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा.
यवतमाळ : ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रक खाली आली. परंतु दुचाकी चालकाने समयसूचकता दाखवून चक्क मृत्यूला माघारी पाठवले.
चंद्रपूर: काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते.
नागपूर : केंद्र व राज्य शासन बेघरांसाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करते, परंतु, नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोकमुक्त झालेले, पण निवारा नसल्याने अनेक जण शासकीय रुग्णालयांतील रुग्णशय्येवरच दिवस काढत आहेत.
धाराशिव : राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. शनिवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परंडा शहरातील कोटला मैदान येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर : सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण व मांदळी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली होती. याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करुन पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालया’च्या तांत्रिक सल्लागारांनी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत, असे पवार म्हणाले.
नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच शहरातील विस्तार वाढल्याने नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचे सूतोवाच पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यानुसार पुण्यात सात नवीन पोलीस ठाणे, तसेच पिंपरी पोलीस आयुक्तालयात चार पोलीस ठाणी सुरु करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
पुणे : शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अत्यााचर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ज्येष्ठ नागरिकाने मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला धमकावले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली: आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार देऊन राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याने डोंबिवली एमआयडीसीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरक्षणविरोधी भूमिका खासदार राहुल गांधींनी विदेशात जाऊन व्यक्त केली आहे. ही खऱ्या अर्थाने काँग्रेसची भविष्यातली रणनीती राहणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला आरक्षण रद्द करण्यासाठी ४०० हून अधिक जागा हव्या आहेत असा अपप्रचार करून देशातील मागासवर्गाची मतं घ्यायची आणि विदेशात जाऊन मात्र वेगळं विधान करायचं. हे त्यांचे दोन मुखवटे समोर आले आहेत. हे निषेधार्ह आहे - अशोक चव्हाण</p>
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत या स्थितीला महापालिकेला जबाबदार धरले असताना खड्डे बुजविण्याच्या चाललेल्या कामांची मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी अकस्मात पाहणी केली.
नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले असून त्यासाठी आश्रमशाळांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नागपूर : पोलीस नोंदणीमधील नावांच्या व्यक्तींना नक्षल चकमकीत गोळीबार करणारे आरोपी ठरवण्याची किमया गडचिरोली पोलिसांनी केली आहे
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पौड रस्ता, बालेवाडी, नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.पौड रस्त्यावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
उरण : महामुंबई सेझसाठी पेण, पनवेल आणि उरणमधील शेतकऱ्यांच्या खरेदी करण्यात आलेल्या जमिनी परत करण्याच्या निर्णयाला सेझ कंपनीची हरकत घेतली आहे.
आज राहुल गांधींच्या मनातलं, त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे. खरंतर आपल्या देशाची प्रतिमा, देशाबाहेर प्रत्येक पक्षाच्या, विचाराच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने राखली पाहिजे. पण आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम त्यांनी त्या मुलाखतीत केलं आहे. भारतीय संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता. या बाबतीत त्यांनी खुलासा करायला हवा. त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का? याबाबत स्पष्ट खुलासा करायला हवा.
पुणे: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.राजकुमार शामलाल परदेशी (वय २६, रा. मोरे चाळ, बालाजीनगर, धनकवडी, सध्या रा. रामपूर, लालगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मुंबई : धारावी रिडेव्हलमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत लवकरच रेल्वेच्या जागेवर पाच प्रकारच्या नमुना सदनिका (सॅम्पल फ्लॅट) उभारणार आहे. पुनर्विकासात पात्र रहिवाशांसह अपात्र आणि पात्र लाभार्थींना नेमकी कशी घरे देण्यात येणार याची कल्पना धारावीकरांना यावी यासाठी पाच नमुना सदनिका बांधण्याचा निर्णय ‘डीआरपीपीएल’ने घेतला आहे.
अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून शहरातील भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.
पनवेल : दोन वर्षांपासून भिरा येथील टाटा वीज प्रकल्पातील वीजनिर्मितीनंतर विसर्ग होणाऱ्या पाण्यापैकी ५०० दशलक्ष लिटर पाणी दरदिवशी पनवेलकरांना मिळण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो शासनाकडे पाठविला आहे.
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच याप्रकरणी दोघांविराेधात कारवाई करण्यात आली.
बदलापूर : स्वतःच्या जनसंपर्क आणि राजकीय डावपेचांच्या कलेवर स्वतःचा प्रभाव तयार करणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खडतर असल्याची चर्चा रंगली आहे. स्वपक्षीय भाजपातून छुप्या कारवाया, महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आणि भूमिका यामुळे कथोरे यांना यंदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
वर्धा : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे मंजूर झाले. मात्र जागेचा मोठा तिढा उद्भवला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी आदेश काढून निर्णय दिला.
डोंबिवली – बदलापूरमधून गेल्या महिन्यात चोरीला गेलेली रिक्षा डोंबिवली वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली आहे.
नागपूर: महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात शोधण्यात येत आहेत.
नाशिक - गणेशोत्सवात गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांतर्गत पाच दिवसांत शहरात एकूण १७०७ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. तसेच सुमारे चार मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.