Mumbai Maharashtra News Updates, 13 September 2024: विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. इच्छुकांकडून तिकिटासाठी वरीष्ठांकडे विचारणा केली जाऊ लागली आहे. त्याचवेळी जागावाटपाच्या चर्चांसाठीही महायुती व महाविकास आघाडी यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमधील फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी ही निवडणूक प्रचंड चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Today, 13 September 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी…

20:56 (IST) 13 Sep 2024
नाशिक : चोरचावडी धबधब्याजवळ बुडून युवकाचा मृ़त्यू

नाशिक :देवळा तालुक्यातील दहिवड येथील धबधब्याजवळ मालेगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

सविस्तर वाचा…

20:40 (IST) 13 Sep 2024
गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’

गोंदियाः देशातील पंतप्रधान पदाची एक गरिमा आहे. त्यामुळे पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींनी ती राखावी अशी देशाची अपेक्षा असते. न्याय व्यवस्थेला संशयात्मक पद्धतीने बघितले जात असेल तर हे देशाकरिता योग्य नाही, अशी टीका महाराष्ट्र कॉग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांनी गोंदियात केली.

सविस्तर वाचा…

20:18 (IST) 13 Sep 2024
मालवणमध्ये शिवसृष्टी उभारावी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे त्यांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा.

सविस्तर वाचा…

19:52 (IST) 13 Sep 2024
यवतमाळ : ट्रकची धडक , दुचाकी चाकाखाली…पण, चालकाने चक्क बोनेटला पकडून…

यवतमाळ : ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रक खाली आली. परंतु दुचाकी चालकाने समयसूचकता दाखवून चक्क मृत्यूला माघारी पाठवले.

सविस्तर वाचा…

19:15 (IST) 13 Sep 2024
चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……

चंद्रपूर: काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते.

सविस्तर वाचा…

18:49 (IST) 13 Sep 2024
नागपूर : रोगमुक्तीनंतरही मुक्काम खाटेवरच ,शासकीय रुग्णालयात ……

नागपूर : केंद्र व राज्य शासन बेघरांसाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करते, परंतु, नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोकमुक्त झालेले, पण निवारा नसल्याने अनेक जण शासकीय रुग्णालयांतील रुग्णशय्येवरच दिवस काढत आहेत.

सविस्तर वाचा…

18:30 (IST) 13 Sep 2024
महिला सशक्तीकरण अभियान, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात

धाराशिव : राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. शनिवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परंडा शहरातील कोटला मैदान येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

18:29 (IST) 13 Sep 2024
नगर सोलापूर महामार्गावर स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळणार, आमदार रोहित पवार यांची माहिती

नगर : सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण व मांदळी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली होती. याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करुन पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालया’च्या तांत्रिक सल्लागारांनी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत, असे पवार म्हणाले.

17:54 (IST) 13 Sep 2024
राहुल गांधींना भाजप घाबरते का ? कॉंग्रेसचा सवाल, नागपुरात आंदोलन

नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.

सविस्तर वाचा…

17:50 (IST) 13 Sep 2024
पुणे, पिंपरीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती; चाकणमधील कार्यक्रमात अजित पवार यांचे सुतोवाच

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच शहरातील विस्तार वाढल्याने नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचे सूतोवाच पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यानुसार पुण्यात सात नवीन पोलीस ठाणे, तसेच पिंपरी पोलीस आयुक्तालयात चार पोलीस ठाणी सुरु करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

17:03 (IST) 13 Sep 2024
नागपूर: एसटीने निघाले अन् पुरात अडकले

नागपूर: नागपूरसह पूर्व विदर्भात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. भंडारा, गोंदियात, गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती विविध आगारातून एसटी बसने गडचिरोली अथवा इतर जिल्ह्यात निघालेले प्रवासी पुरामुळे अडकून पडत आहे.

सविस्तर वाचा…

17:00 (IST) 13 Sep 2024
pune crime: शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ज्येष्ठाकडून अत्याचार

पुणे : शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अत्यााचर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ज्येष्ठ नागरिकाने मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला धमकावले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

16:34 (IST) 13 Sep 2024
डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरुध्द गुन्हा,विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी देण्यास दिला होता नकार

डोंबिवली: आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार देऊन राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याने डोंबिवली एमआयडीसीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

16:16 (IST) 13 Sep 2024
Ashok Chavan on Rahul Gandhi: अशोक चव्हाणांची राहुल गांधींवर टीका

आरक्षणविरोधी भूमिका खासदार राहुल गांधींनी विदेशात जाऊन व्यक्त केली आहे. ही खऱ्या अर्थाने काँग्रेसची भविष्यातली रणनीती राहणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला आरक्षण रद्द करण्यासाठी ४०० हून अधिक जागा हव्या आहेत असा अपप्रचार करून देशातील मागासवर्गाची मतं घ्यायची आणि विदेशात जाऊन मात्र वेगळं विधान करायचं. हे त्यांचे दोन मुखवटे समोर आले आहेत. हे निषेधार्ह आहे – अशोक चव्हाण</p>

15:42 (IST) 13 Sep 2024
नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत या स्थितीला महापालिकेला जबाबदार धरले असताना खड्डे बुजविण्याच्या चाललेल्या कामांची मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी अकस्मात पाहणी केली.

सविस्तर वाचा

15:28 (IST) 13 Sep 2024
आश्रमशाळांना सीसीटीव्हीसाठी १५ दिवसांची मुदत; आदिवासी विकास विभागाचा निर्णय

नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले असून त्यासाठी आश्रमशाळांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

15:26 (IST) 13 Sep 2024
नागपूर : नक्षलवादाच्या प्रकरणात अडवलेल्या महिलेची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका… पोलीस कारवाईवर प्रश्न

नागपूर : पोलीस नोंदणीमधील नावांच्या व्यक्तींना नक्षल चकमकीत गोळीबार करणारे आरोपी ठरवण्याची किमया गडचिरोली पोलिसांनी केली आहे

सविस्तर वाचा…

15:12 (IST) 13 Sep 2024
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पौड रस्ता, बालेवाडी, नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.पौड रस्त्यावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा

14:59 (IST) 13 Sep 2024
उरण : जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यास सेझ कंपनीची हरकत,पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली

उरण : महामुंबई सेझसाठी पेण, पनवेल आणि उरणमधील शेतकऱ्यांच्या खरेदी करण्यात आलेल्या जमिनी परत करण्याच्या निर्णयाला सेझ कंपनीची हरकत घेतली आहे.

सविस्तर वाचा…

14:53 (IST) 13 Sep 2024
Pankaja Munde on Rahul Gandhi: पंकजा मुंडेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

आज राहुल गांधींच्या मनातलं, त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे. खरंतर आपल्या देशाची प्रतिमा, देशाबाहेर प्रत्येक पक्षाच्या, विचाराच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने राखली पाहिजे. पण आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम त्यांनी त्या मुलाखतीत केलं आहे. भारतीय संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता. या बाबतीत त्यांनी खुलासा करायला हवा. त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का? याबाबत स्पष्ट खुलासा करायला हवा.

14:34 (IST) 13 Sep 2024
मोक्का कारवाईनंतर पसार झालेला सराइत गजाआड

पुणे: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.राजकुमार शामलाल परदेशी (वय २६, रा. मोरे चाळ, बालाजीनगर, धनकवडी, सध्या रा. रामपूर, लालगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

14:28 (IST) 13 Sep 2024
धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती

मुंबई : धारावी रिडेव्हलमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत लवकरच रेल्वेच्या जागेवर पाच प्रकारच्या नमुना सदनिका (सॅम्पल फ्लॅट) उभारणार आहे. पुनर्विकासात पात्र रहिवाशांसह अपात्र आणि पात्र लाभार्थींना नेमकी कशी घरे देण्यात येणार याची कल्पना धारावीकरांना यावी यासाठी पाच नमुना सदनिका बांधण्याचा निर्णय ‘डीआरपीपीएल’ने घेतला आहे.

सविस्तर वाचा

14:25 (IST) 13 Sep 2024
राहुल गांधी विरुद्ध भाजप आक्रमक,अमरावतीत पुतळा जाळला

अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्‍या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून शहरातील भाजपच्‍या नेत्‍यांनी राहुल गांधी यांच्‍या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमा जाळून निषेध व्‍यक्‍त केला.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 13 Sep 2024
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च

पनवेल : दोन वर्षांपासून भिरा येथील टाटा वीज प्रकल्पातील वीजनिर्मितीनंतर विसर्ग होणाऱ्या पाण्यापैकी ५०० दशलक्ष लिटर पाणी दरदिवशी पनवेलकरांना मिळण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो शासनाकडे पाठविला आहे.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 13 Sep 2024
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच याप्रकरणी दोघांविराेधात कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा

13:44 (IST) 13 Sep 2024
कथोरेंना कोंडीत पकडण्याचे सर्वपक्षीय प्रयत्न ?

बदलापूर : स्वतःच्या जनसंपर्क आणि राजकीय डावपेचांच्या कलेवर स्वतःचा प्रभाव तयार करणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खडतर असल्याची चर्चा रंगली आहे. स्वपक्षीय भाजपातून छुप्या कारवाया, महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आणि भूमिका यामुळे कथोरे यांना यंदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

सविस्तर वाचा

13:19 (IST) 13 Sep 2024
वर्धा : हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा अखेर ठरली, प्रवेशाबाबत ..

वर्धा : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे मंजूर झाले. मात्र जागेचा मोठा तिढा उद्भवला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी आदेश काढून निर्णय दिला.

हे ही वाचा…

12:53 (IST) 13 Sep 2024
डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे,बदलापूरमधील चोरीची रिक्षा सापडली

डोंबिवली – बदलापूरमधून गेल्या महिन्यात चोरीला गेलेली रिक्षा डोंबिवली वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली आहे.

सविस्तर वाचा…

12:27 (IST) 13 Sep 2024
विधानसभा निवडणुकीत स्पर्धा परीक्षार्थींचा कौल, या पक्षाला मोठा धक्का…

नागपूर: महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात शोधण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 13 Sep 2024
पाच दिवसांत १७०७ गणेश मूर्ती संकलित; नाशिक महापालिकेचा मूर्ती दान उपक्रम

नाशिक – गणेशोत्सवात गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांतर्गत पाच दिवसांत शहरात एकूण १७०७ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. तसेच सुमारे चार मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

सविस्तर वाचा

'लोकपोल'नं सर्व्हेच्या निष्कर्षांचे आकडे केले जाहीर! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra News Live Today, 13 September 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर