Maharashtra Politics LIVE Updates : अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया नाहीत तर त्या अंजली बदनामिया आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. हे सगळं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर आहेत. तर वर्षा पाडणार, वर्षा बंगल्याच्या आवारात मंतरलेली शिंग या चर्चा म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून असणार आहे.
Maharashtra News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडेंचं काय होणार? यासह महत्त्वाच्या घडामोडी
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे लिलाव, सर्व व्यवहार बंद
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीड, नगर, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी आणतात.
उरणचे उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, मंजुरी आणि भूमिपूजनानंतरही इमारतीचे काम रखडलेलेच
उरण : प्रस्तावित शंभर खाटांचे रुग्णालय नव्या आराखड्यामुळे पुन्हा एकदा रखडले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांच्या मंजुरीनंतर पुन्हा उरणच्या नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वसई : अनधिकृत इमारतीवर कारवाईच्या वेळी तणाव, शेकडो नागरिक रस्त्यावर; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात
वसई विरार महापालिकेतर्फे नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू आहे. २३ जानेवारी पासून या कारवाईला सुरवात झाली आहे.
माजी आमदार सुभाष झांबड यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकपूर्व जामिनासाठीचा विशेष अर्ज मागे
माजी आमदार सुभाष झांबड अजिंठा अर्बन बँकेचे अध्यक्ष असून, बँकेमधील ९८ कोटी ४१ लाख व २१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
हिंगोलीतही १८१४ बोगस पीक विमा अर्ज आले समोर; बेचीराख, शासकीय जमिनीवरही काढला विमा
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, आर्थिक मदत व्हावी, या हेतुने शासनाने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
देवनार पशुवधगृहातील प्राण्यांच्या दहनवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात, मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस
मुंबई : मृत पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांवर दहनसंस्कार करण्यासाठी देवनार पशुवधगृहात प्राण्यांची दहनवाहिनी उभारण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. संबंधित दहनवाहिनीचे काम अंतिम टप्य्यात आले असून उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. महिनाभरात ही सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस आहे.
Shilphata Traffic : शिळफाटा मार्गावरील पहिला दिवस कसा होता? वाहतूक कोंडी झाली का?
निळजे रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शिळफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याच्या पहिल्याच दिवशी या रस्त्यावर बुधवारी सकाळी अभूतपूर्व कोंडी झाली.
कर्जत: शहरामध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर एक लोखंडी पिस्तूल व तीन जिवंत काडतूस असा सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विकास दत्तू सकट (रा. टाकळी खंडेश्वरी ता. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर) यास पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर एक व्यक्ती पिस्तूलसह थांबला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवून खात्री करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव विकास सकट असल्याचे सांगितले. पोलिसांनी विनापरवाना पिस्तूलसह त्याला ताब्यात घेतले आहे.
रोहित पवार यांच्याकडून गंभीर दखल
दरम्यान, या घटनेची आमदार रोहित पवार यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. ते म्हणाले की, गावठी कट्टे बाळगण्याचे लोन आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. मतदार संघातील महिला, विद्यार्थिनी यांच्यासाठी सुरक्षित आणि निर्भय वातावरणासोबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणं महत्त्वाचं आहे. अशाप्रकारे गावठी कट्टा बाळगण्याचा प्रकार यापूर्वीही निदर्शनास आला असून महाविद्यालयाच्या परिसरात कोणताही प्रकारचा गैरप्रकार पोलीस प्रशासनाने खपवून घेऊ नये असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईकरांना यंदाही ‘करदिलासा’? आगामी पालिका निवडणुकांमुळे अर्थसंकल्पात करवाढ नसण्याची शक्यता
नवी मुंबई : महापालिका निवडणुकांचे बिगुल नजीकच्या भविष्यात कधीही वाजू शकते, याची पुरेपूर जाण ठेवूनच यंदाचा नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर करवाढीची घोषणा कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणारी नसल्याने यंदाचा अर्थसंकल्पही कोणतीही करवाढ नसलेलाच असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
‘एसटी’चा प्रवास महागला, सुरक्षिततेचे काय? दोन वर्षांत ३०१ अपघात, ३५ जणांचा मृत्यू
दोन वर्षांच्या तुलनेत गंभीर अपघातांमध्ये वाढ झाली असून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे.
वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील टपाल तिकीट प्रदर्शनात मराठी बोलल्याने डोंबिवलीकराबरोबर अरेरावी
आपणास मराठी येत नाही का, असा प्रश्न पारखे यांनी केला. त्यावेळी संतप्त झालेल्या सेवकाने पारखे यांच्याशी अरेरावीची भाषा करून ‘तुम्ही माझी कोणाकडेही तक्रार करा. माझे कोणी काही करणार नाही,’ अशी उद्दाम भाषा वापरली.
पुणे : ‘पीएमपी’ची पाच नवीन आगारे
पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत सार्वजनिक वाहतूक सुविधा आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
भंडारा : कंत्राटदराने केले शेतातून रस्त्याचे बांधकाम
भंडारा : वादग्रस्त शेत जमिनीवर कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे बांधकाम करण्यात येऊ नये असे न्यायालयाचे लेखी आदेश असताना कंत्राटदाराने शेतातून रस्त्याचे बांधकाम सुरू केले. कंत्राटदाराने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करीत स्वमर्जिने रस्त्याचे बांधकाम केल्यामुळे कंत्राटदाराविरोधात वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे : उड्डाणे पुष्कळ; पण ‘उडान’ दूरच
पुणे विमानतळावरून ३५ शहरे विमानसेवेने जोडली गेली आहेत. त्यात दुबई, सिंगापूर आणि बँकॉक अशा तीन आंतरराष्ट्रीय शहरांचा समावेश आहे.
ठाणे : एका चेंडूत दोन धावा, अन् आयोजक सिद्धू अभंंगेसोबत संघाचा राडा, चाकू भिरकावल्याचा दोन्ही गटांकडून दावा, व्हिडीओ वायरल
ठाणे : कोपरी येथील संत तुकाराम मैदानात सिद्धेश अभंगे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्या दरम्यान तुफान राडा झाला होता.
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे अपहरण, हडपसर पोलिसांकडून अपहृत वडिलांची १२ तासांत सुटका
हडपसर भागातील एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध होते. तरुणी वाघोली भागात राहायला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांचा प्रेमप्रकरणास विरोध होता.
Video : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाची धिंड
मारहाणीचा बदला घेण्यासाठी तिघे जण बुधवारी मध्यरात्री बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात आले. त्यांच्याकडे दांडके आणि शस्त्रे होती.
क्रिकेट सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीपासूनच तिकिटांचा काळाबाजार…
नागपूर : तब्बल सहा वर्षांनंतर विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर भारतविरुद्ध इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. मात्र, क्रिकेट सामन्यांची तिकीटविक्री अवघ्या काही मिनिटांतच संपल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. याचाच गैरफायदा काहींनी घेतला.
फुटाळा तलावातील जागतिक दर्जाचे संगीत कारंजे धुळखात, कोट्यवधी पाण्यात
नागपूर : लोकापयोगी आणि पर्यावरणाशी संबंधित एखादा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी सर्व बाबी तपासून आणि संबंधित घटकांशी चर्चा न करण्याच्या प्रवृतीचा शहरातील फटका फुटाळा तलावातील जागतिक दर्जाच्या संगीत कारंजी प्रकल्प बसला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्चानंतर आता कामे ठप्प झाले असून अर्धवट झालेला प्रकल्प धुळखात आहे.
गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात… ३५ जनावरे दगावली…
गोंदिया : गोवंशाची तस्करी करणारा ट्रक रस्त्यावर उलटला. यामुळे घडलेल्या अपघातात ३५ जनावरे ठार झाली. ही घटना आज बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोरची – चिचगड मार्गावरील डासगड घाटावर मध्य रात्री सुमारास घडली
म्हाडाचे घर मिळवून देण्याची बतावणी करत फसवणूक
ठाणे : म्हाडा योजनेत ३५ लाख रुपयांचे घर २१ लाख रुपयांत मिळवून देतो असे सांगून महिलेची ७ लाख ६० हजार रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गणपत गायकवाड यांचे तुरुंगातून विकास कामांसाठी कडोंमपा आयुक्तांना पत्र
कल्याण : कल्याण पूर्वचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते विकास काम मार्गी लावण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंगाधिकाऱ्यांच्या मान्यतेने गेल्या वर्षी एक पत्र लिहिले होते. या पत्राच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने आता कार्यवाही सुरू केली आहे.
नागपूरहून कुंभमेळासाठी चार विशेष गाड्या धावणार
नागपूर : मध्य रेल्वेने कुंभमेळासाठी नागपूर येथून चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली गाडी उद्या, बुधवारी नागपूरहून दानापूरकडे निघणार आहे. प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. नागपूर-दानापूर दरम्यान चार विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहे.
‘जीबीएस’ची चंद्रपूर जिल्ह्यात धडक, १२ वर्षीय मुलीला लागण; आरोग्य यंत्रणेकडून लपवाछपवी
चंद्रपूर : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात ‘जीबीएस’ने चंद्रपूर जिल्ह्यात धडक दिली आहे. जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना गावात एक जीबीएसचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘डामा’चा प्रयोग, नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घ्या…
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून रुग्ण केस पेपर न घेताच इतरत्र उपचारासाठी परस्पर निघून जात असल्याने ‘डामा’चा हा प्रयोग रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. हा प्रकार पुसद येथील एका रुग्णाच्या निमित्ताने चर्चेत आला.
नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री ११.३० पर्यंत
नागपूर : नागपूरच्या क्रिकेट चाहत्यांसाठी नागपूर मेट्रो ६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजेपर्यंत धावणार आहे. ऐरवी मेट्रोसेवा सकाळी ६ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहते. क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने ती रात्री ११:३० पर्यंत सुरू राहणार, असे महामेट्रोकडून कळवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा वाढदिवस…शहरभर बॅनरबाजी अन् कार्यक्रमांची जंत्री
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शहरभर मोठे बॅनरबाजी करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरवर ‘आमच दैवत’, डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू काॅमन मॅन असा उल्लेख करण्यात आला आहे.
शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसांची गस्त वाढली, जड, अवजड वाहनांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना
कल्याण : शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्यावर, पर्यायी रस्ते मार्गावर १५० वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात होण्यास सुरूवात झाली आहे. जागोजागी वाहतूक पोलीस, सुरक्षा जवानांनी जड, अवजड वाहन चालकांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यास सुरुवात केली आहे.
Solapur Leopard Attack : वेळापूरजवळ वाहनांची धडक बसून बिबट्याचा मृत्यू; जखमी अवस्थेत दोघांवर केला हल्ला
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळी तीन बिबटे रस्ता ओलांडत होते. त्यातील एका बिबट्याला वाहनाची धडक बसली.
टिटवाळा बल्याणी टेकडीवरील बेकायदा चाळींवर कारवाई; सलग तीन दिवस कारवाई, मुख्य जलवाहिनीवरील नळजोडण्या तोडल्या
कल्याण : टिटवाळ्यातील बल्याणी टेकडी बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जात होते. सरकारी, वन विभागाच्या, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर या भागात बांधकामधारकांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या भागातील नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व बेकायदा चाळी भुईसपाट करण्याची तीन दिवसांची मोहीम अ प्रभागाचे नवनियुक्त साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुरू केली आहे.
अंजली दमानिया,धनंजय मुंडे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया नाहीत तर त्या अंजली बदनामिया आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. हे सगळं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर आहेत.