खासगी बँकांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं काय होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती

अ‍ॅक्सिस बँकेतून सरकारी व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारनं आता खासगी बँकांसंदर्भात आणी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खासगी बँकांमधून होत होते त्यांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासगी बँकांबद्दलच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, “राज्य सरकारचा एकही पैसा खासगी बँकेत ठेवणार नाही.. मग ती अ‍ॅक्सिस असो वा आणखी कोणी…”

खासगी बँकांबद्दल घेतलेला निर्णय नेमका काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि इतर सर्व सचिवांना स्पष्ट सूचना दिली आहे. इथून पुढे राज्य सरकारचा निधी हा कुठल्याही खासगी बँकेत ठेवायचा नाही. फक्त आणि फक्त राष्ट्रीयीकृत बँका व ज्या बँकांना केंद्र सरकारचं संरक्षण आहे, तिथेच राज्य सरकारचा निधी ठेवायचं ठरवलेलं आहे. तो निर्णय झालेला आहे. कोणत्याच खासगी बँकेत आता राज्य सरकारची खाती नसतील. मग ती येस बँक असो वा अ‍ॅक्सिस असो… असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

आता कर्मचाऱ्यांच्या पगाराचं काय होणार?

२००५ मध्ये तत्कालिन सरकारने पगार वाटपासाठी राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांची निवड केली होती. यात अ‍ॅक्सिस बँकेसह १६ बँकांचा समावेश होता. फडणवीस सरकारने अ‍ॅक्सिस बँकेला फायदा व्हावा म्हणून पोलिसांचे वेतन खाते तिकडे वळवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. ठाकरे सरकार आल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेतील हे व्यवहार बंद करण्याचा निर्णय झाला. आता राज्य सरकारने कोणत्याच खासगी बँकेत राज्य सरकारने निधी ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार खासगी बँकांतून होतात, त्यांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra budget 2020 uddhav thackeray government employees salaries daily wages information vjb