Maharashtra News, 09 March 2023: सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली होती.

शिवाय, राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईचीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.

Live Updates

Maharashtra Budget 2023-2024 Live, 09 March 2023: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

18:24 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget : “राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला आणि…” अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका

६ हजार रूपये प्रोत्साहनात्मक अनुदान अर्थमंत्र्यांनी जाहीर केले, परंतू शेतकऱ्यांना जी रासायनिक खते विकत घ्यावी लागतात त्या खतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये झालेली वाढ आणि त्या खर्चामध्ये जवळपास १७ ते १८ हजार रूपयांनी वाढ झालेली आहे.

सविस्तर वाचा

18:18 (IST) 9 Mar 2023
Maha Budget 2023: जातींच्या अस्मिता सुखावल्या, पण निधीचं काय? गिरीश कुबेरांचं विश्लेषण

“या अर्थसंकल्पावरून सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची आठवण येते. त्यांनीही अशीच छोट्या छोट्या समाजांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला.”

वाचा सविस्तर

17:56 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024 : पीकविम्याबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार केवळ ‘एवढे’ रुपये

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीकविम्याबाबत मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना आता केवळी १ रुपयांत पीकविमा काढता येईल, असे ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार, अशी माहितीही त्यांनी दिली. सविस्तर वाचा

17:54 (IST) 9 Mar 2023
PHOTOS : बसच्या तिकीटात ५० टक्के सवलत ते अंगणवाडी सेविकांचं मानधन; शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय तरतुदी? वाचा…

PHOTOS : बसच्या तिकीटात ५० टक्के सवलत ते अंगणवाडी सेविकांचं मानधन; शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय तरतुदी?

सविस्तर वाचा

17:53 (IST) 9 Mar 2023
महिलांसाठी आनंदाची बातमी! राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात मिळणार ५० टक्के सवलत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023-2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याच्या प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात आल. तसेच, महिला आणि शेतकऱ्यांसाठीही या अर्थसंकल्पाद्वारे अनेक महत्त्वाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

सविस्तर वाचा

17:52 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024 : अजितदादांच्या पंचसूत्रीवर टीका करणाऱ्या फडणवीसांनी… – रोहित पवार

मविआ सरकारच्या काळात गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी याचा उत्तम दाखला दिला होता. त्याच संकल्पनेचा संदर्भ घेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात सप्तर्षी संकल्पना वापरली आणि गेल्या वर्षी अजितदादांच्या पंचसूत्रीवर टीका करणाऱ्या फडणवीस साहेबांनी आज त्याच संकल्पनेचा आधार घेतला – रोहित पवार

17:52 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023 : “शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प हा अर्थहीन अन्…”; नाना पटोलेंचा हल्लाबोल!

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाद्वारे महिला, तरुण आणि शेतकऱ्यांसाठीही अनेक महत्त्वाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. शिंदे-फडणवीस सरकारच्या या अर्थसंकल्पावर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यारून शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस आहे, असं ते म्हणाले. विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

17:51 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024 : हा अर्थ नसलेला संकल्प – आव्हाड

हा अर्थ नसलेला संकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

17:45 (IST) 9 Mar 2023
“मला तर अर्थसंकल्प वाचताना १४ मार्च तारीख दिसत होती”, अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले, “बहुतेक रात्री कळलंय की…!”

अजित पवार म्हणतात, “अर्थसंकल्प वाचताना मला वाटलं की यांना बहुतेक रात्री कळलंय की १४ मार्चला…!”

वाचा सविस्तर

17:05 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024 : स्मारकाचे पैसे आधीच्या सरकारनं दिलेत – आदित्य ठाकरे

मुंबईच्या सुशोभिकरणाचा पैसा सगळा महानगर पालिकेचा आहे. स्मारकाचे पैसे आधीच्या सरकारने दिले आहेत. त्यात नवीन काय? – आदित्य ठाकरे

17:04 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024 : हे तर हसवा-फसवी बजेट – आदित्य ठाकरे

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचा उल्लेख हसवा-फसवी बजेट असा केला आहे.

17:03 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024 : अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करणाऱ्यांवर लोकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

आम्ही पर्यटन विभागाला दिलेल्या निधीला अजूनही स्थगिती दिलेली आहे. गेल्या ६ महिन्यांत अनेक घोषणा झाल्या. तरी एकाही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. ज्या सरकारमध्ये गद्दार बसले आहेत. ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला, अशा सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. संतांबद्दल, धर्माबद्दल बोलणं हे यांच्या तोंडी शोभत नाही – आदित्य ठाकरे

16:57 (IST) 9 Mar 2023
अजित पवारांनी फडणवीसांना करून दिली ७ वर्षांपूर्वीच्या घोषणेची आठवण; म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीसाठी…!”

तेव्हा फडणवीस म्हणाले होते, “पाच वर्षांनंतर फक्त घोषणा करण्यासाठी नव्हे तर कल्याण-डोंबिवलीची सुंदर नगरी केली म्हणून आपल्या टाळ्या घेण्यासाठी येईन”

वाचा सविस्तर

16:55 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024 : मुंबई महानगरसाठी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भरीव तरतूद

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई या प्रमुख महापालिकांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच मुंबई महानगर भागातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

16:43 (IST) 9 Mar 2023
मुंबई : दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणारा आरोपी अटकेत

सहा दिवसांपूर्वी गोवंडी परिसरातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी उत्तर प्रदेशातून एका व्यक्तीला अटक करून या मुलाची सुटका केली. दरम्यान, मूल होत नसल्यामुळे या मुलाचे अपहरण केल्याचे आरोपीने चौकशीत कबुल केले. सविस्तर वाचा…

16:42 (IST) 9 Mar 2023
कल्याण, डोंबिवलीत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

कल्याण- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी कल्याण, डोंबिवली शहरातील विविध सरकारी कार्यालये, पालिका कार्यालये, पोलीस ठाणी, महाविद्यालयांमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.

सविस्तर वाचा…

16:41 (IST) 9 Mar 2023
टिटवाळ्यात आरक्षित भूखंडावरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

कल्याण- टिटवाळा येथील इंदिरानगर भागात उद्यान, बगिचा आरक्षणावर उभारण्यात येणाऱ्या बेकायदा चाळींची बांधकामे सोमवारी अ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. आरक्षित भूखंडांवरील सहा चाळींची बांधकामे तोडल्याने माफियांना मोठा तडाखा बसला आहे. सविस्तर वाचा…

15:41 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

होतं नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढे बघू या दृष्टीने मांडलेला हा अर्थसंकल्प आहे – अजित पवार</p>

15:40 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: अजित पवारांचं टीकास्र

अर्थसंकल्प मांडला जात असताना मला १४ मार्च डोळ्यांसमोर येत होता. १४ मार्चला निकाल विरोधी जाणार असं यांना कळलंय असं वाटत होतं. त्यामुळे जेवढ्या आपल्या बाजूने घोषणा करता येतील तेवढ्या करून घ्या असं असेल. किंवा कसबा, शिक्षक-पदवीधर मतदारसंघात जो झटका बसलाय, ते पाहाता ९ महिन्यांपूर्वीच सरकारमध्ये येताना जनता आपल्यासोबत नाही हे खेडच्या सभेत सगळ्यांनी पाहिलं – अजित पवार

15:38 (IST) 9 Mar 2023
नागपूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर : मावशीच्या घरी राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नाझिया परवीन मीर हुसैन (वय २२) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. नाझिया ही मूळची गसनगर, बर्रा, बोकारो स्टील सिटी (झारखंड) येथील रहिवासी होती.

सविस्तर वाचा…

15:37 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: कर्जबाजारी होण्याच्या दिशेनं राज्याची वाटचाल – अजित पवार

जरा दोन दिवस थांबा.. मी अर्थसंकल्पावर आमची भूमिका मांडणारच आहे. राज्याची सध्याची परिस्थिती पाहाता राज्य कर्जबाजारी होण्याकडे चाललंय. साडे सहा लाख कोटींवर कर्जाचा आकडा गेला आहे – अजित पवार

15:34 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: १ एप्रिलपासून वीज दरवाढीचा झटका बसणार आहे – अजित पवार

मला माहिती मिळालीये की २५ ला अधिवेशन संपलं की १ एप्रिलला झटका आहे. ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ आहे. फक्त ते आत्ता सांगत नाहीयेत. अर्थसंकल्प संपल्यानंतर सांगणार आहेत – अजित पवार

15:32 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: भरीव तरतूद म्हणजे नेमकं काय?

महापुरुषांच्या स्मारकांना निधीची घोषणा केली. पण ठोस किती निधी देणार याची काही घोषणा केलेली नाही. अनेक महामंडळांचा विकास करण्याच्या घोषणा केल्या. भरीव तरतुदीची घोषणा केली. पण म्हणजे नेमकं काय? – अजित पवार

15:31 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

अर्थसंकल्पातला निधी फक्त ५१ टक्के झालाय. अजून २० दिवसंमध्ये फारतर २० टक्के खर्च होईल. तरी ३० टक्के खर्च होणारच नाहीये. त्यामुळे फक्त घोषणा करायच्या अशी ही परिस्थिती आहे. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला – अजित पवार

15:31 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: विकास खर्च फक्त ३५ टक्के झालाय – अजित पवार

आज मी सकाळचे आकडे घेतले. आपल्या डीपीसीचा खर्च फक्त ३५ टक्के झालाय. या महिन्यातले २१-२२ दिवसच राहिलेत. काही जिल्ह्यात तर ४ टक्के, ५ टक्के असा खर्च झालाय – अजित पवार

15:30 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: अजित पवारांची अर्थसंकल्पावर टीका

सरकारनं गेल्या ८-९ महिन्यात केलेल्या घोषणांचीच पुनरावृत्ती या अर्थसंकल्पात करण्यात आली. गेल्या अर्थसंकल्पात आम्ही विकासाची पंचसूत्री आणली होती. यांनी विकासाचं पंचामृत आणलं आहे. अमृताप्रमाणेच विकासाचं पंचामृतही कुठे दिसणार नाही – अजित पवार

15:28 (IST) 9 Mar 2023
महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क

– वस्तु व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर

– ही नवीन अभय योजना 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत

– दि. 1 मे 2023 रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागू

– कोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापार्‍यांना लाभ

– कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ, सुमारे 80,000 मध्यम व्यापार्‍यांना लाभ

15:28 (IST) 9 Mar 2023
हवाई वाहतुकीला चालना…

एटीएफ मूल्यवर्धित कर 18 टक्के

अर्थकारणाला चालना

– हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पाऊल

– बृहन्मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि रायगड जिल्हा या तीन क्षेत्रात विमानचालन चक्की इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कराचा दर 25 टक्क्यांहून आता 18 टक्के

– असे करुन हा कर बंगळुरु आणि गोव्याच्या समकक्ष

15:28 (IST) 9 Mar 2023
अन्य विभागांसाठी आर्थिक तरतूद…

– गृह विभाग : 2187 कोटी रुपये

– महसूल विभाग : 434 कोटी रुपये

– वित्त विभाग : 190 कोटी रुपये

– सांस्कृतिक कार्य विभाग : 1085 कोटी रुपये

– मराठी भाषा विभाग : 65 कोटी रुपये

– विधी व न्याय विभाग : 694 कोटी रुपये

– माहिती तंत्रज्ञान व माहिती जनसंपर्क विभाग : 1342 कोटी रुपये

– महाराष्ट्र विधान मंडळ : 500 कोटी रुपये

15:28 (IST) 9 Mar 2023
पंचम अमृत : पर्यावरणपूरक विकास विभागांसाठी तरतूद

– वन विभाग : 2294 कोटी रुपये

– पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : 224 कोटी रुपये

– उर्जा विभाग : 10,919 कोटी रुपये

………..

पंचम अमृत एकूण : 13,437 कोटी रुपये

15:27 (IST) 9 Mar 2023
चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा विभागांसाठी

– उद्योग विभाग : 934 कोटी

– वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी

– कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये

– शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये

– उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये

– वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये

– क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये

– पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये

……….

चतुर्थ अमृत एकूण : 11,658 कोटी रुपये

15:27 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून

पायाभूत सुविधा विकास

विभागांसाठी तरतूद

– सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये

– ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये

– नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये

– नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये

– परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये

– सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

……………..

तृतीय अमृत एकूण : 53,058 कोटी रुपये

15:24 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

दिव्यांग व्यक्तीची व्याख्या सुधारित केली जाईल. यासाठी जास्त व्यक्तींना व्यवसाय करातून सूट प्राप्त होईल.

15:24 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक १० हजारपेक्षा जास्त उत्पन्नासाठी व्यवसाय कर भरावा लागतो. ही मर्यादा २५ हजार वाढवण्यात येईल.

15:23 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: करमहसूलाचा अंदाज २ लाख ७५ हजार ७८६ कोटी

करमहसूलाचा अंदाज २ लाख ७५ हजार ७८६ कोटी इतका आहे. त्यात वस्तू व सेवा कर, मूल्यवर्धित कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी या करांचा वाटा २ लाख ४३ हजार ४११ कोटी आहे. या आर्थिक वर्षासाठी करमहसुलाचे आर्थसंकल्पीय उद्दिष्ट २ लाख ९८ हजार १८१ कोटी निश्चित करण्यात आले आहे. आर्थिक उपयोजनांमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल याची खात्री…

15:22 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: अर्थसंकल्पावर ७ दिवसांत ४० हजाराहून जास्त सूचना प्राप्त झाल्या.

अर्थसंकल्पावर ७ दिवसांत ४० हजाराहून जास्त सूचना प्राप्त झाल्या.

15:21 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: जनभागीदारीचा अर्थसंकल्प

या वर्षी राजकोषीय तूट ९५ हजार ५८० कोटी एवढी असेल. यंदाचा अर्थसंकल्प जनभागीदारी असणारा अर्थसंकल्प आहे.

15:21 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: १६ हजार १२२ कोटी महसुली तुटीचा अर्थसंकल्प

२०२३-२४मध्ये महसूली खर्च १ लाख ७२ हजार कोटी निश्चित करण्यात आली होती. त्यात अनुसूचित जाती उपयोजनेच्या १३ हजार ८२० कोटी तर आदिवासी विकास उपयोजनेचे १२६५५ कोटींचा समावेश आहे. या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसुली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी रुपये अंदाजित आहे. परिणामी १६ हजार १२२ कोटी रुपये महसुली तूट येत आहे.

15:18 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: स्मारकांसाठीची तरतूद

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार

– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी

– भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये

– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये

– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये

– स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये

– विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी

– स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये

15:17 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना

अमरावतीच्या रिद्धिपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होणार.

15:17 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: नाट्यगृहांच्या संवर्धनासाठी ५० लाखांचा निधी

नाट्यगृहांच्या संवर्धनासाठी ५० लाखांचा निधी

15:16 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: शेतकऱ्यांसाठी फक्त १ रुपयात पीकविमा

शेतकऱ्यांसाठी फक्त १ रुपयात पीकविमा

15:16 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार

मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार

15:15 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाची घोषणा

भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यात गंजपेठेत तयार करण्यात आली. तिथे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी

15:12 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन केंद्र स्थापन करून त्यासाठी ५० लाखांचा निधी.

15:11 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: ५ ज्योतिर्लिंगांच्या परिसर विकासासाठी ३०० कोटींची तरतूद

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेतली जातील. यासाठी ३०० कोटींची तरतूद

– भिमाशंकर, पुणे

– त्र्यंबकेश्वर, नाशिक

– घृष्णेश्वर, संभाजीनगर

– औंढ्या नागनाथ, हिंगोली

– वैजनाथ, बीड

15:04 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान

– डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

– शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती

– कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे

– गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर

– डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

– मुंबई विद्यापीठ

– लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन

– वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान

– महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

15:03 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मला सावधानतेनं बोलावं लागतं, नाहीतर… फडणवीसांची टोलेबाजी!

अर्थसंकल्पातील पाचवे अमृत अर्थात पंचअमृताकडे वळतो असं फडणवीसांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर फडणवीसांनी विरोधकांना कोपरखळी मारली!

मला सावधानतेनं बोलावं लागतं. नाहीतर अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढायचात – देवेंद्र फडणवीस

15:02 (IST) 9 Mar 2023
शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

15:02 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ

विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये

– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२०२४ लाइव्ह (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra Budget 2023-2024 Live, 09 March 2023: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!