Maharashtra Budget 2026 Key Announcements: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (६ मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पामधून राज्यातील जनतेसाठी कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येतात? याकडे जनतेचं लक्ष लागलं होतं.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काही घोषणा होणार? लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये देण्याची घोषणा होणार का? यासह सरकार विकासाच्या आणखी कोणत्या घोषणा करणार? याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं होतं. अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. यासह आदी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करण्यात आल्या? यासह सर्व राजकीय घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Budget 2026 Live Updates : अर्थसंकल्पाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.
अहिल्यानगरमधील प्रत्येक गावात ८ ते २२ दरम्यान 'जल उत्सव'
लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ९ कामगार जखमी
Maharashtra Politics: 'आश्वासन पूर्ण केलं', सत्ताधाऱ्यांचा दावा तर शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा विरोधकांचा आरोप; अर्थसंकल्पावरुन कोण काय म्हणाले? वाचा
देवेंद्र फडणवीस सरकारची तकलादू कर्जमाफी; शेतकऱ्यांचा विश्वासघात, राजू शेट्टी यांचा आरोप
फ्लाईट लेफ्टनंट दुरुगकर यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली
"नागपूरचे सुपुत्र असलेल्या फ्लाईट लेफ्टनंट दुरुगकर यांच्यासह वायुसेनेच्या अन्य एका अधिकाऱ्याने देशसेवेच्या कर्तव्यात प्राण अर्पण केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो", अशा शब्दात फडणवीसांनी श्रद्धांजली अर्पण केली.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/2029883956330709287?s=20
‘यूपीएससी’च्या निकालात राज्यातील उमेदवारांचा डंका; किती मराठी उमेदवारांची निवड?
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात डॉ. अतुल अग्निहोत्री यांनी देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. एकूण ९५८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यात राज्यातील उमेदवारांच्या यशाचा डंका वाजला आहे.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी सादर केला राज्याचा अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या. यावेळी राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी काही धोषणा करण्यात आल्या आहेत. सर्व स्तरावरील नागरिकांसाठी सुलभ, किफायतशीर आणि गुणवत्तापू्र्ण आरोग्य सेवेची सुनिश्चिती करणे आणि त्याद्वारे राज्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढवणे यासाठी आरोग्य सेवांचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व नागरिकांना पोहचवण्याचे उद्दीष्ट आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दोन लाखांपर्यंत कर्जमाफी म्हणजे फक्त ‘सलाईन’, रविकांत तुपकर यांची कर्जमुक्तीची मागणी
"राज्य सरकारने आज कर्जमाफीची घोषणा केली. परंतु या गोष्टीला आम्ही समाधानी नाही. मुळामध्ये विधानसभा होऊन दीड वर्ष झालं. दीड वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते. तीही शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे ही कर्जमाफीची गोष्ट सरकारला करावी लागली आणि दोन लाखापर्यंत कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला. किमान पाच लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांच कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे", असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.
"कर्जमाफी किती तारखेपर्यंत होईल हे सांगा...", उद्धव ठाकरेंची मागणी
"राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित पीक कर्ज असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. ही कर्जमाफी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली", अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत म्हटलं आहे. पण ही कर्जमाफी आता किती तारखेपर्यंत होईल हे सांगावं. अर्थसंकल्पात २०४७ चा अनेकदा उल्लेख करण्यात आला. मग ही कर्जमाफी २०४७ पर्यंत तरी करणार का? याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार कक्षाच्या बाहेर भेट झाली आहे. यावेळी काहीवेळ दोघांत संवाद देखील झाला.
कृषी क्षेत्रावर घोषणांचा पाऊस; पुन्हा नैसर्गिक शेती, मत्स्य शेती, पशूपालनाला बळ
कृषी क्षेत्राच्या मंदावलेल्या विकास दराला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात कृषी विकासाच्या योजनांवर भर देण्यात आला. मुख्यमंत्री नैसर्गिक शेती अभियान, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजनेची घोषणा मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली.
Ajit Pawar : राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भव्य स्मारकाची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे २८ फेब्रुवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले. या भीषण दुर्घटनेनंतर राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी भाषणासाठी उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढली. इतकेच नाही थर अजित पवार यांच्या स्मारकाची घोषणा देखील केली.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती नाहीच ? कर्जमाफीसाठी 'ही' अट ठरणार अडचणीची
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा, कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "आम्ही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत पीक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. ही कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे."
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मोटर वाहन करात ३० टक्के सूट, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी मोटर वाहन करात ३० टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : खेळाडूंसाठी मिशन अॅथलेटिक्स योजना, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
-खेळाडूंसाठी मिशन अॅथलेटिक्स योजना सुरू करण्यात येणार
-१२ खेळांचे राज्यस्तरावर केंद्र उभारणार
-सायबर सुरक्षा धोरण राबवलं जाणार
-साताऱ्याच्या दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार
-साताऱ्यातील कटगुणमध्ये महात्मा फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार
कृषी क्षेत्रावर घोषणांचा पाऊस; पुन्हा नैसर्गिक शेती, मत्स्य शेती, पशूपालनाला बळ
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : 'राज्यात आणखी ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : "महायुती सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत १ लाख २० हजार कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली असून पुढील कालावधीत टप्प्याटप्प्याने एमपीएससी आणि इतर यंत्रणाच्या माध्यमातून आणखी ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे", अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
-३२ हजार ७५६ कोटी रुपये मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेसाठी खर्ज
-लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
-सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार
-छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाचं काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
Ajit Pawar : राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भव्य स्मारकाची घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "आम्ही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत पीक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. ही कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी कर्ज घेऊन कर्जाची परत फेड करतात, त्या शेतकऱ्यांसाठी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे.
Maharashtra Budget Live 2026 : मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
-गडचिरोलीत ७० हजार रोजगाराची निर्मिती करणार
-परवडणाऱ्या १० लाख नवीन घरांचा विकास आराखडा तयार केला जाणार
-मुंबई पुण्यात ३० लाखांहून अधिक रोजगाराची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न
-मस्य व्यवसायासाठी १ हजार २४० कोटींचा निधी
-मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार
Maharashtra Budget Live 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
-मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात वाढ होईल.
-स्थानिक स्वराज्य अधिक सक्षण करण्यात येणार
-१० ते १५ पिंकासाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाणार
-अजित पवार यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार
-२०३० पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत जण्यासाठी प्रयत्न
Maharashtra Budget Live 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
-वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित करण्याचं लक्ष्य
-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील तीन स्थानकांचं काम २०२७ पर्यंत पूर्ण होणार
-शहरांच्या विकासाठी १० शहर विकास प्राधिकरण तयार करणार
-परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल
-मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार
Maharashtra Budget Live 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चार नवीन योजनांची घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी चार योजनांची घोषणा केली. महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनांची घोषणा करण्यात आली.
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
https://www.youtube.com/live/ZVc4Zv-MeNA?si=eAUn1IftLuCSkTPN
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
२०४७ पर्यंत राज्याचा कृषी निधी ट्रिलीयन डॉलरवर नेणार
पुढील पाच वर्षात राज्याला भरीव निधी देणार
राज्याचा कृषी जीडीपी वाढवण्यावर भर देण्यात येणार
Maharashtra Budget 2026-27 Live : अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Maharashtra Budget 2026-27 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची आठवण काढली. तसेच अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात मांडला जाणार आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
