Maharashtra Budget Session, 16 March 2023: एकीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जातं.

Prakash Awades rebellion cools down Chief Minister eknath shinde courtesy succeeds
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
nagpur bhaskar jadhav marathi news, bhaskar jadhav eknath shinde marathi news
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राजकीय निवृत्ती घेतील का?”; भास्कर जाधव म्हणाले, “तीन खासदारांचे तिकीट नाकारून…”
Congress MP Ravneet Singh Bittu joined the BJP
राहुल गांधींना आणखी एक धक्का; तीन टर्म खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्याने धरली भाजपाची वाट
Live Updates

Marathi Batmya: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

18:06 (IST) 16 Mar 2023
सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार? उज्ज्वल निकम म्हणाले, “माझ्यामते संपूर्ण प्रकरणात...”

गेल्या तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी दोन्ही गटाचा युक्तिवाद आज संपला असून सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देतात, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाबरोबरच सामान्य मतदारांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या एकूण सुनावणीसंदर्भात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सविस्तव वाचा

18:01 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

जर शिंदे गटाचे आमदार भाजपात विलीन झाले असते, तर त्यांची शिवसेना म्हणून असलेली ओळख संपली असती. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्यायच नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की आमचा पक्षाध्यक्षांवर विश्वास राहिलेला नाही - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636296293130846208

17:59 (IST) 16 Mar 2023
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अडचण; सर्वोच्च न्यायालयासमोरचा पेच आणि ठाकरे गटाचा युक्तिवाद!

“तुमचं असं म्हणणंय का की आम्ही आता एका अशा व्यक्तीला पुन्हा सत्तेवर बसवावं, ज्यांनी बहुमत चाचणीऐवजी राजीनामा दिला?”

वाचा सविस्तर

17:13 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या पत्रातील ‘त्या’ मुद्द्यावर कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात आक्षेप; म्हणाले,”पक्षानं ज्या व्यक्तीला…”!

कपिल सिब्बल म्हणतात, “आसाममध्ये बसून ३९ लोकांनी सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द केली. ही कुठली प्रक्रिया आहे? ते २०१९पासून…!”

वाचा सविस्तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद!

16:53 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सरन्यायाधीशांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर टिप्पणी केली - देसाई

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी स्वत: राज्यपालांच्या भूमिकेवर टिप्पणी केली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेविषयी चित्र स्पष्ट आहे - अनिल देसाई

16:52 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ..तिथेच त्यांनी घटनात्मक चूक केली - अनिल देसाई

राजीनामा जरी दिला असला, तरी २९ ला जो व्हीप लागू होता, तोच व्हीप ३ जुलैलाही लागू होता. शिवसेनेचा उमेदवार अध्यक्षीय लढतीमध्ये होता. पण तिथे मतदान भाजपाच्या उमेदवाराला केलं गेलं. तिथेच त्यांनी घटनात्मक चूक केली - अनिल देसाई

16:51 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: आम्ही विस्तृतपणे बाजू मांडली - देसाई

आमच्या वकिलांनी विस्तृतपणे बाजू मांडली आहे. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय त्याचा विचार करून निर्णय घेईल. - अनिल देसाई

16:08 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: १५ मे च्या आत निकाल लागणार?

१५ मे रोजी न्यायमूर्ती शाह निवृत्त होत आहेत. त्याच्या आधी या सुनावणीवरचा निकाल द्यावा लागणार आहे.

16:05 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला

गेल्या तीन आठवड्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच चालू असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरचा युक्तिवाद अखेर आज संपला असून आता सगळ्यांचं लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून तो काय असेल, याची उत्सुकता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाबरोबरच सामान्य मतदारांनाही लागली आहे.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636314948564561922

15:57 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: देवदत्त कामत यांचा युक्तिवाद...

२१ जूनला फक्त एकच राजकीय पक्ष अस्तित्वात होता, तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना - देवदत्त कामत

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636312990386618368

15:54 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद संपला

अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद संपला

15:49 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

दहाव्या परिशिष्टातच विधिमंडळ पक्षाची व्याख्या राजकीय पक्षाच्या संदर्भातच केली आहे - सिंघवी

15:45 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: ...तर ठाकरे गटाच्या आमदारांवरच अपात्रतेची कारवाई होईल - सिंघवी

जर निवडणूक आयोगाचा १७ फेब्रुवारीचा निर्णय पूर्वलक्ष्यी पद्धतीने लागू केला, तर ठाकरे गटात राहिलेल्या सर्व आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. कारण निर्णयाच्या तत्वानुसार १९ जुलैपासून ते आमदार पक्षात राहिलेच नाहीत. त्यामुळे ज्यांनी दहाव्या परिशिष्टाचं उल्लंघन केलं, त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळेल आणि ज्यांनी १०व्या परिशिष्टाचं पालन केलं, त्यांच्यावर उलट अपात्रतेची कारवाई होईल - सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636307226859298817

15:34 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: राजीनाम्यामुळे राज्यपालांचं ते कृत्य अवैध कसं ठरू शकेल? - सिंघवी

फक्त उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, म्हणून त्यांना ज्या कारणामुळे राजीनामा द्यावा लागला, त्या कृत्याचं समर्थन कसं होऊ शकेल? राज्यपालांचं ते अवैध कृत्य वैध कसं ठरू शकेल?

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636306262232297474

15:24 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या अवैध कृतीमुळेच...

उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचा मुद्दाच इथे गैरलागू आहे. राज्यपालांच्या अवैध आदेशांमुळेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला - सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636305486315425793

15:20 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

न्यायालय अशा सरकारला पुन्हा सत्तेत कसं आणू शकतं, ज्या सरकारने बहुमत चाचणीचा सामनाच केला नाही. आमची समस्या ही आहे की तुम्हाला सत्तेतून बाहेर काढलेलं नाही. तुम्ही पायउतार झालेला आहात - सर्वोच्च न्यायालय

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636303707561394176

15:18 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

तुम्ही न्यायालयाला सांगत आहात की आम्ही असं सरकार पुन्हा सत्तेत आणावं, ज्यांनी राजीनामा दिला आहे - सरन्यायाधीश

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636303841951088640

15:17 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांकडे कोणतेही वैध पुरावे नव्हते - सरन्यायाधीश

राज्यपालांकडे कोणतेही वैध पुरावे नव्हते, ज्यावर अवलंबून त्यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले - सरन्यायाधीश

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636303044483911680

15:16 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing:

राज्यपालांच्या बहुमत चाचणीचा पर्यायही शिंदे गटाच्या यादीत असायला हवा - सरन्यायाधीश

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636302634457124866

15:00 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: फक्त मतभेद आहेत म्हणून तुम्ही सरकार पाडाल? - सिंघवी

प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी पुरेशी प्रणाली उपलब्ध आहे. जर तोडगा निघाला नाही तर तुम्ही राजीनामा द्या. पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की फक्त मतभेद आहेत म्हणून तुम्ही सरकार पाडाल? - सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636297579402248193

14:51 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाला सवाल

जर शिंदे गटाचे आमदार भाजपात विलीन झाले असते, तर त्यांची शिवसेना म्हणून असलेली ओळख संपली असती. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्यायच नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की आमचा पक्षाध्यक्षांवर विश्वास राहिलेला नाही - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636296293130846208

14:41 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ...म्हणून शिंदे गट गुवाहाटीला गेला - सिंघवी

अपात्रतेची भीती असल्यामुळेच ते २१ जूनला निवडणूक आयोगाकडे न जाता गुवाहाटीला गेले - सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636293984665600002

14:39 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: सिंघवींचं शिंदे गटाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह

सुरत आणि गुवाहाटीऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेला नाहीत? तुम्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक का लढवली नाही? तुम्ही भाजपात विलीन का झाला नाहीत? - सिंघवींचे शिंदे गटाला सवाल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636293233440612352

14:38 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: मग भाजपात विलीन व्हायला काय अडचण होती? - सिंघवी

तुम्ही राजीनामा दिला नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीनही झाला नाहीत. तुम्ही त्यांच्या मांडीवर बसला आहात. ते तुम्हाला पाठिंबा देत आहात. तुम्ही मुख्यमंत्री झालात. मग पक्षात विलीन व्हायला काय अडचण होती? - सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636293233440612352

14:35 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: तुम्ही पक्षाचा एवढाच तिरस्कार करत असाल, तर... - सिंघवी

तुमच्या पक्षाचा तुम्ही इतका तिरस्कार करत असाल, तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन सांगा की तुम्हीच मूळ पक्ष आहात. तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नका. पण त्यांनी १०व्या परिशिष्टाकडेच दुर्लक्ष केलं - अभिषेक मनू सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636292201104932865

14:33 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ...म्हणून हे आमदार निवडून आले - सिंघवी

पक्षानं तिकीट दिलं, म्हणून हे आमदार निवडून आले - अभिषेक मनू सिंघवी

14:32 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा - सिंघवी

देशात पक्षाधारित लोकशाही आहे. दहाव्या परिशिष्टाचा आधारच राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा असा आहे - सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636291728499183617

14:31 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: व्हीपचं उल्लंघन म्हणजे सदस्यत्वाचा त्याग - सिंघवी

व्हीपचं उल्लंघन करणं म्हणजे पक्षाचं सदस्यत्व स्वत:हून सोडणं असाच अर्थ होतो - सिंघवी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636290869606375425

14:28 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: अभिषेक मनु सिंघवींच्या युक्तिवादाला सुरुवात

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवींनी फेरयुक्तिवादाला केली सुरुवात...

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636290298409259009

14:27 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला पुन्हा सुरुवात

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

13:13 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: लंच ब्रेकनंतर अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार

लंचब्रेकनंतर २ वाजता ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636269849524711426

13:12 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला

या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे काही वेगळे प्रसंग आले. पण त्याच प्रकरणाइतकंच हे प्रकरण महत्त्वाचं आणि प्रभाव पाडणारं आहे. हा या न्यायालयाच्या इतिहासातला एक असा क्षण आहे, जेव्हा लोकशाहीचं भवितव्य ठरवलं जाणार आहे. मला याची खात्री आहे, की या न्यायालयानं जर मध्यस्थी केली नाही, तर आपण, आपली लोकशाही धोक्यात येईल. कारण कोणतंच सरकार अशा प्रकारे टिकू दिलं जाणार नाही. या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636269625234305025

13:06 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

आणि राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात पक्षानं ज्या व्यक्तीला पदावरून दूर केलं आहे, त्या व्यक्तीला मान्यता दिली आहे - कपिल सिब्बल

13:05 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

आसाममध्ये बसून ३९ लोकांनी सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द केली. ही कुठली प्रतिक्रिया आहे? ते २०१९पासून प्रतोदपदी आहेत - कपिल सिब्बल

13:04 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

२१ तारखेला जर ते पत्र पाठवलं असेल, तर त्या पत्रात एकनाथ शिंदे गटनेतेपदावर कायम असल्याचा का उल्लेख करण्यात आला? ते तर पदावर कायम होतेच ना? - कपिल सिब्बल

13:03 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

त्यांना विधिमंडळ पदावरून काढलेलं असताना अशा वेळी त्यांनी आसाममध्ये भाजपाच्या मांडीवर बसून लिहिलेल्या या पत्राची काय विश्वासार्हता राहते? - कपिल सिब्बल

13:02 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचं २१ जूनचं पत्र..

हा गट आसाममध्ये बसलेला असताना हे पत्र लिहिलं गेलं. त्यंना हे माहिती होतं की २१ जूनला एकनाथ शिंदेंना पदावरून हटवलं आहे. त्यामुळे हे स्वत:हून पाठवलेलं पत्र आहे. २१ जूनच्या आधी हे पत्र अस्तित्वातच नव्हतं. त्याआधीच्या परिस्थितीवर हे पत्र काही बोलतच नाहीये. या पत्रात अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही ज्यात त्यांनी जाहीरपणे त्यांची नाराजी किंवा मतभेद बोलून दाखवली असेल. त्यामुळे भाजपाबरोबर जाण्याच्या कृतीचं समर्थन करण्यासाठीचं हे पत्र आहे - कपिल सिब्बल

13:00 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: उपाध्यक्षांवर कोणत्या आधारावर अविश्वास ठराव आणला - कपिल सिब्बल

त्यांनी नबम रेबिया प्रकरणाचा चुकीचा अर्थ लावला. हे नबम रेबियामध्ये नाहीये. कोणताही अविश्वास प्रस्ताव नव्हता. याचे गंभीर नागरी परिणाम होतात. उपाध्यक्ष एका संसदीय पदावर होते. त्यांना त्या पदावरून काढलं. त्यांना हेही सांगितलं नाही की त्यांना का काढलं. त्यामुळेच राज्यघटना म्हणते की जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतं, तेव्हा जर अविश्वास ठराव आला आणि तो गृहीत धरला, तरच त्या परिस्थितीत उपाध्यक्ष खुर्चीवर बसू शकत नाही. ते सभागृहात बसून त्यांची बाजू मांडतील. प्रक्रिया हेच सांगते - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636266835468509184

12:57 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ही कसली नोटीस आहे? उपाध्यक्षांच्या हकालपट्टीची? - कपिल सिब्बल

२१ जूनची तारीख असलेलं हे पत्र २२ जूनला सकाळी ७.३३ वाजता सचिवालयाला प्राप्त झालं. या पत्रात म्हटलं होतं की तुम्हाला २०१९मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. पण २०२१ फेब्रुवारीमध्ये अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. आम्हाला असं वाटतंय की तुम्हाला आता उपाध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नाही. ही कसली नोटीस आहे? उपाध्यक्षांच्या हकालपट्टीची? - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636266835468509184

12:48 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा नबम रेबिया प्रकरणाचा दाखला

कपिल सिब्बल यांनी दिला नबम रेबिया प्रकरणाचा दाखला

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636265400580345856

12:44 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis:

एकनाथ शिंदेंनी दावा केला की ते विधिमंडळ पक्षनेते आहेत. कशाच्या आधारावर? तुम्हाला २२ जून रोजीच पदावरून दूर केलं होतं - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636264096596369409

12:43 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: ..मग तुम्ही आसाममध्ये काय करत होतात? - कपिल सिब्बल

त्यांनी काल युक्तिवाद केला की व्हीप फक्त सभागृहातच बजावला जाऊ शकतो. सभागृहाबाहेर व्हीप काम करू शकत नाही. मग ते आसाममध्ये काय करत होते? तुम्ही आसाममध्ये भाजपाच्या मांडीवर बसला आहात आणि तुम्ही एका अशा प्रतोदला पदावरून दूर करत आहात जो राजकीय पक्षानं नियुक्त केला होता - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636263959006412800

12:41 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: .. म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं - सिब्बल

एकनाथ शिंदेंनी विश्वासघात केल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636261777041412096

12:39 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राजकीय पक्षच प्रतोद, गटनेत्याची नियुक्ती करतो - सिब्बल

विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजे राजकीय पक्षानं, सदस्यांनी त्यांचा नेता म्हणून निवडलेला असतो. राजकीय पक्षानं त्यासंदर्भातले अधिकार दिलेले असतात. त्यामुळे राजकीय पक्षच गटनेता आणि प्रतोद यांची नियुक्ती करत असतो - कपिल सिब्बल

12:30 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: हे सगळंच घटनाविरोधी आहे - सिब्बल

हे सगळं प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाण्याआधी म्हणजे १९ जुलैपूर्वी घडलं. त्यामुळे हे सगळंच घटनाविरोधी आहे. कारण राज्यपालंनी निवडणूक आयोगाच्या मान्यतेआधीच एका विधिमंडळ गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली - कपिल सिब्बल

12:28 (IST) 16 Mar 2023
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाच्या भूमिका बदलत राहिल्या - कपिल सिब्बल

आधी शिंदे गट म्हणाले की ते बाहेर पडले आहेत. नंतर ते म्हणाले की आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत. आता ते म्हणतात आम्ही पक्षातच आहोत. त्यामुळे शिंदे गटाकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636260552111722496

12:25 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: हा कसला राजकीय पक्ष - सिब्बल

निवडणूक आयोग किंवा कोणत्याही घटनात्मक आधाराशिवाय विधिमंडळ गटातला एक गट असा दावा करत होता की तेच शिवसेना राजकीय पक्ष आहेत. हा कसला राजकीय पक्ष - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636259735975628805

12:21 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: त्यांना सरकार पाडायचं होतं, म्हणून... - सिब्बल

सरकार कोसळलं तेव्हा अधिवेशन होऊ घातलं होतं. त्यात अर्थसंकल्पीय विधेयकांवर मतदान होणार होतं. त्याच्या विरोधात मतदान करायला हवं होतं. सरकार पडलं असतं. पण यांना सरकार पाडायचं होतं. मुख्यमंत्री बनायचं होतं. त्याचवेळी स्वत:ची आमदारकी घालवायची नव्हती - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1636256977885212672

12:14 (IST) 16 Mar 2023
Supreme Court Hearing: आम्ही बहुमत चाचणीच्या विरोधात नाही, पण... - सिब्बल

आम्ही बहुमत चाचणीच्या विरोधात नाही. पण ज्या आधारावर बहुमत चाचणीचे आदेश दिले गेले, त्याविरोधात आम्ही आहोत - कपिल सिब्बल

Maharashtra Live News Today

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi Batmya: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!