Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन देखील पार पडलं. या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. मात्र, आता सरकार स्थापन होऊन पाच दिवस होऊन गेले आहेत. मात्र, तरीही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत विरोधकांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

तसेच एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही आहेत. पण गृहखात शिवसेनेला देण्यास भाजपा तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी यावर भाष्य करत मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही? मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास वेळ का लागत आहे? या मागची कारणं संजय शिरसाट यांनी सांगितली आहेत.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
dharmaraobaba atram reaction on getting minister post
मी शंभर टक्के मंत्री होणार, पण अडीच वर्षाने, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…

हेही वाचा : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

संजय शिरसाट काय म्हणाले?

मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर यादी दिल्लीत फायनल होणार असल्याची चर्चा आहे. मग नेमकं मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपर्यंत होईल? आणि आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? या मागचं कारण काय? असं संजय शिरसाट यांना विचारलं असता ते म्हणाले की, “राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष. मग या तीनही पक्षांमध्ये खाते वाटप असेल किंवा कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं? हे ठरवण्याचा प्रश्न महायुतीमधील तिन्ही नेत्यांचा आहे. अनेक आमदार असतात, मग त्यामधून काहींची निवड करणं हे अवघड काम असतं. तसेच पक्षातील नेत्याला पाहावं लागतं की, एखाद्या आमदाराला नाराज करायचं का? एखाद्याला मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही. असे प्रश्न असतात. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला वेळ लागतो”, असं कारण संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?

“तसेच मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत गेली आहे की नाही? याची माहिती मला नाही. मात्र, पुढील तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं की, हिवाळी अधिवेशनाच्या आधी होईल. त्यामुळे १३ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागेल. कारण १५ डिसेंबरला नागपूरला जावं लागेल. कारण १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन सुरु होईल. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार १३ डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Story img Loader