Devendra Fadnavis Davos Investment Deals : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मंगळवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले होते. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी टाटा समूह महाराष्ट्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

devendra fadnavis pimpri chinchwad news in marathi
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी पहिल्यांदाच बालेकिल्ल्यात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दावोसमध्ये भारतीय कंपन्यांशीच करार; फडणवीसांनी स्पष्टच सांगितली यामागची कारणमीमांसा
devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
CM Devendra Fadnavis On Varsha Bungalow
Devendra Fadnavis : वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे?… फडणवीसांनी टाकला सगळ्या चर्चांवर पडदा
Kinetic Group president Arun Firodia Hinjewadi
हिंजवडी ‘आयटी पार्क’बाबत उद्योजक अरुण फिरोदिया यांची महत्वाची सूचना, म्हणाले…
Devendra Fadnavis on Manoj Jarange
Devendra Fadnavis : “त्या मागण्या आम्ही…”, मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित झाल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
cm Devendra fadnavis davos marathi news
Devendra Fadnavis: ९८ गुंतवणूक विदेशी, दावोसमधील करारांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा

काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन यांची त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली. या भेटीत काल्सबर्ग समूहाने ते महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी ईच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यावर राज्य सरकार त्यांना संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.

रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यात १५,००० मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा केली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.

याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई, लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची आणि कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांची भेट घेत राज्यातील उद्योगांच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा केली.

Story img Loader