महाराष्ट्र सीआयडीची वेबसाइट शुक्रवारी हॅक करण्यात आली. लिजन नावाच्या एका ग्रुपने वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. दिल्ली हिंसाचाराचा हा बदला असल्याचे या ग्रुपकडून सांगण्यात आले आहे. दिल्ली हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

“भारतात मुस्लीम कुटुंबांना हिंदू जमावाकडून ठार मारण्यात येत आहे. शेकडो मुस्लिमांनी त्यांचे नातेवाईक गमावले आहेत. मुस्लिमांविरोधात निर्माण झालेल्या द्वेषाला मोदी सरकार कारणीभूत आहे” असे हॅकर्सनी लिहिले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले त्यादिवशी दिल्लीत हिंसाचाराला सुरुवात झाली होती. तीन दिवस चाललेल्या या हिंसाचारात दिल्लीत ५३ जणांचा मृत्यू झाला. १५० पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले.

वेबसाइटवर हातात झेंडा घेतलेल्या एका घोडेस्वाराचा फोटो होता. ‘इमाम माहदीचे सरकार आहे’ असा संदेश त्यावर होता. मुस्लिमांना त्रास देणे थांबवा असा इशारा पोलीस आणि सरकारला हॅकर्सनी दिला आहे.