बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यं तसंच सडेतोड भूमिकेमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील नेपोटिझम ते राजकारणातील विषयांवर अनेकदा तिने जाहीरपणे भूमिका मांडली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कंगनाने अनेक मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तिने रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदाच्या प्रवासाचं कौतुक केलं होतं. त्यातच आता कंगना एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याने चर्चा रंगली आहे. या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनीही या भेटीवर भाष्य केलं आहे.

मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Sambhaji Bhide
संभाजी भिडेंना पोलीस संरक्षण देण्याची आमदार गाडगीळांची मागणी
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस का म्हणाले, मी पुन्हा येईन…
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ajit pawar
फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला अजितदादांचा बूस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ५जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी पनवेल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मनपा शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ५जी मुळे मोठी क्रांती होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी पनवेलमधील शाळा निवडली असल्याचा अभिमान असल्याचंही ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसंच जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करायच्या असून ५ जी सेवेचा मोठा फायदा होईल असंही ते म्हणाले.

एकनाथ शिदेंनी कंगना भेटीवर केलं भाष्य

एकनाथ शिंदे यांनी कंगना रणौत भेट घेण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं आहे. कंगना आपली भेट घेणार आहे असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले “मुख्यमंत्री या नात्याने मला अनेकजण भेटत असतात. पण अद्याप तरी त्यांच्या भेटीची माहिती नाही. मी काही लपवून ठेवत नाही. आपला सगळा कारभार पारदर्शक आहे. पोटात एक, ओठात एक असं नसतं”.

एकनाथ शिंदेंना यावेळी राजकीय प्रश्न विचारले असता त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वारंवार विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या याबाबत काहीच माहिती नसल्याचं स्पष्ट सांगितलं. एक दिवस तरी राजकीय विषय सोडा असंही ते मिश्कीलपणे प्रसारमाध्यमांना म्हणाले.