Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation: मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीच्या करोनाकाळात झालेल्या सुशोभीकरणामुळे राज्यात नवा वाद पेटला आहे. सुशोभीकरणास महाविकास आघाडी सरकारची अलिखित परवानगी होती, असा आरोप करत भाजपाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यावर मेमनचा मृतदेह दफनविधीसाठी का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करीत भाजपावरच पलटवार केला आहे. दरम्यान या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी कारवाईसाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले “महापालिकेला सूचना दिल्या आहेत. याकूब हा स्फोटातील आरोपी असून त्याला फाशी दिली आहे. त्याचं उदात्तीकरण महाराष्ट्र खपवून घेऊ शकत नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत”.

Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

Yakub Memon: ‘तुमच्या सरकारमध्ये याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण’ झाल्याचं विचारताच अजित पवार संतापले; म्हणाले “उद्या तू मुख्यमंत्री…”

नेमकं काय झालं आहे?

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली होती. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, एलईडी लाईट्स काढून टाकल्या.

आशिष शेलार यांचे शिवसेनेवर आरोप

पेंग्विन सेना वानखेडे मैदान उखडायला गेली होती. मग आता याकूब मेमनची कबर उखडून दाखवावी, असे आव्हान मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलं आहे. मैदानं, उद्यानं, स्मशानभूमीच्या सुशोभीकरण, देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची असते. महापौर शिवसेनेचा होता व मुख्यमंत्रीपदी ठाकरे होते. मग कबरीच्या सुशोभीकरणासाठी ठाकरे यांनी परवानगी कशी दिली, असा प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला. नवाब मलिक, अस्लम शेख व तुकडे तुकडे टोळीला खूश करण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला.

Yakub Memon: ‘याकुबचा मृतदेह कुटुंबाकडे का सोपवला?’, काँग्रेसची विचारणा, भाजपा म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे, इतकी निर्लज्ज…”

आदित्य ठाकरे यांचे प्रत्त्युत्तर

याकूब मेमनच्या कबरीवरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यास आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. मेमनची कबर असलेली दफनभूमी ही खासगी ट्रस्टची आहे. मेमनचा दफनविधी झाला तेव्हा राज्यात भाजपचे सरकार होते. त्या वेळी दहशतवाद्याच्या दफनविधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. याउलट देशात व राज्यात पूर्वीच्या सरकारने कसाब व अफजल गुरू या दहशतवाद्यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी दफन केले. कुटुंबीयांना दफनविधीसाठी दिले नव्हते. भाजप सरकारने मेमनला दहशतवाद्यासारखी वागणूक का दिली नाही. मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.