महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रीमंडळाची पहिली बैठक संपल्यावर रात्री उशीरा थेट गोवा गाठले. शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार गोव्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्रीनंतर पोहोचले. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं.

नक्की वाचा >> मोदींचा फोन, फडणवीस अन् उपमुख्यमंत्रीपद; शपथविधीच्या काही मिनिटं आधी नेमकं घडलं काय?

त्यापूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलवरुन शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांसोबत चर्चा केली होती. या व्हिडीओ कॉलवरील चर्चेदरम्यानचे काही फोटो शिंदे यांनी ट्विटरवरुन शेअर केले होते.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

नक्की वाचा >> “…मग तेव्हा युती का तोडली?”; शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा थेट सवाल

गुरुवारी एकनाथ शिंदे हे दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाने शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. सायंकाळी साडेसात वाजता राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला शिवसनेच्या बंडखोर आमदारांपैकी कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळेच शपथविधीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी थेट गोव्याला पोहोचले.

नक्की वाचा >> “…तर उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या त्या १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येईल”; बंडखोर आमदारांकडून इशारा

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी राजभवनात पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपाचा उद्देश स्पष्ट झाला असला तरी फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने पक्षनेते बुचकळ्यात पडले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेत येईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, दिवसभरात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या विविध नाट्यमय घडामोडी घडल्या.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> “आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे…” शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट

फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आणि रात्री शपथ घेणार, असेच चित्र होते. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मात्र एकनाथ शिंदे हे रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे जाहीर केले.  त्यावेळी नाट्यमय घडामोडींचा पहिला अंक पाहायला मिळाला. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, पण सरकार योग्यपणे चालेल ही जबाबदारी माझी असेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

नक्की वाचा >> “फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा…”; नव्या सरकारच्या शपथविधीवरुन पवारांचा टोला

राजभवनात शपथविधी सोहळय़ाची तयारी सुरू असतानाच नाटयमय घडामोडींचा दुसरा अंक घडला. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी सहभागी व्हावे, असा पक्षाचा आदेश असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. फडणवीस हे नव्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यानंतर थोड्याच वेळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२”

शिवसेना नेते अनुपस्थित
नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला मावळते मुख्यमंत्री उपस्थित राहतात. परंतु, शिवसेनेतील बंडामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्याची उद्विग्नता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच होते. यामुळेच मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मावळत्या मंत्रिमंडळातील कोणीही यावेळी उपस्थित नव्हते.

नक्की वाचा >> शपथ घेण्याआधीच देवेंद्र फडणवीस झाले मुख्यमंत्री; पण…

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही फिरकले नाहीत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते, पण त्यांच्यात उत्साह अजिबात दिसत नव्हता.