शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत या म्हणाले होते असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी बंडामागचं कारणदेखील सांगितलं. तसंच सरकारचा रिमोट कंट्रोल नेमका कोणाच्या हाती आहे याचं उत्तरही दिलं. हा बंड देशभरातील मोठी घटना आहे सांगताना सभागृहातील माझं भाषण उत्स्फूर्तपणे होतं. लोकांच्या मनातील भावना आणि जे काही माझ्या मनात साचलं होतं ते सगळं बोलून मन मोकळं केलं असंही त्यांनी सांगितलं.

सूरतला जाण्याआधी उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं होतं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी त्यांच्याशी बोललो आणि चाललो आहे असं सांगितलं. त्यांनी परत या म्हटलं. पण मी त्यांना परत येईन की नाही माहित नाही सांगितलं. कारण मी जेव्हा प्रयत्न केले तेव्हाच विचार केला असता, निर्णय बदलला असता तर ही वेळ आली नसती”. आम्ही पाच वेळा त्यांच्याकडे भूमिका मांडली. पण त्यात यश आलं नाही असंही त्यांनी सांगितलं.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”
What Piyush Goyal Said?
भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’बाबत प्रश्न विचारताच पियूष गोयल यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ

“हा निर्णय मी फक्त माझ्या खच्चीकरणामुळे घेतलेला नाही. जे २५-३० आमदार होते त्यांना रोज येणारा अनुभव, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न यामुळे पुन्हा निवडून येण्याची चिंता सतावत होती. कारण पडलेल्या उमेदवाराला घटक पक्ष ताकद देऊ लागले आणि आमच्या लोकांचं खच्चीकरण करु लागले. आमच्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपार करण्यात आलं. निर्दोष असतानाही मोक्कासाऱख्या कारवाईंना सामोरं जावं लागलं,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

शिंदे गटातील बंडखोर आमदार शंभूराजे देसाई संजय राऊतांवर संतापले; पवारांवरही टीका करत म्हणाले, “ते बोलले म्हणून…”

“शिवसेनेला, शिवसैनिकांना काय मिळालं? शिवसैनिकाला या सत्तेचा काय फायदा झाला? त्यांची फरफट सुरुच होती. आम्ही आमच्या प्रमुखांना यात बदल झाला पाहिजे असं सांगितलं होतं. शेवटी जी आघाडी केली आहे ही फायदेशीर नाही. मुख्यमंत्री आमचा असताना नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. असंच सुरु राहिलं तर या ३०-४० आमदारांचं भवितव्य १०० टक्के धोक्यात आलं असतं. यामुळेच आमदारांना मला निर्णय घ्या अन्यथा आम्ही वेडावेकडा निर्णय घेऊ सांगितलं,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

“हा एका दिवसात झालेला प्रकार नाही. आमदारांचा त्रास रोज वाढत होता. आम्ही हे सांगण्याचा प्रयत्नही केला. पुन्हा भाजपासोबत युती करु शकतो का यासंबंधी विचारणाही केली. पण त्यात आम्हाला यश आलं नाही,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. नाईलाज म्हणून हा निर्णय घेतला, पण आम्ही भाजपाशी युती करुन चुकीचा निर्णय घेतला नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

“आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. ठाण्यात पाऊस कोसळत असतानाही हजारोंच्या संख्येने लोक वाट पाहत उभे होते. चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे शिवसैनिक आमच्यासोबत उभे राहिले नसते,” असं एकनाथ शिदेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्या प्रकारे आमच्यावर आरोप करत आहेत, पक्षातून काढलं आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले, बदनामी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असं वाटत नाही”.

सरकारचा रिमोट तुमच्या हातात असणार की फडणवीसांच्या असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही दोघे चांगले मित्र असून एकमेकाला विश्वासात घेऊन काम करु. आमच्या दोघांचा पर्सनल अजेंडा काही नसून राज्याचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा आहे”.