वाई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून मंगळवारी सायंकाळी त्यांचे मूळ गाव दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे विश्रांतीसाठी हेलिकॉप्टरने आगमन झाले. कांदाटी खोऱ्यातील मुख्यमंत्र्यांच्या कोयना पुनर्वसन भागात मोठ्या प्रमाणात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत, इको सेन्सिटिव्ह झोन व बफर झोन मध्ये आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी शासन आपल्या जागा फुकट बळकवणार आहे असे खोटे सांगून जागा खरेदी केल्या बाबत ते आपले मत व्यक्त करणार का याची प्रतीक्षा निसर्गप्रेमींना आहे. त्यांनी या विषयी आपले मत व्यक्त करणे गरजेचे असल्याचे वन संवर्धनात काम करणाऱ्या संस्थाचालकांनी म्हटले आहे.

लोकसत्ता’ ने या विषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सातारा सह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार झाल्यानंतर वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना चौकशी अधिकारी नेमले आहे. त्यांनी महाबळेश्वर तहसीलदारांकडून एक हजार पानी चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यावर मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतील व पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त करतील असे सूत्रांनी लोकसत्ता’ला सांगितले. मात्र मुख्यमंत्री याविषयी काय मत व्यक्त करतात हे सुद्धा औसुक्याचे ठरणार आहे.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Satara, stone pelting, Karad,
सातारा : मशिदीला येण्या – जाण्याच्या रस्त्यावरून किरकोळ दगडफेक
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

हेही वाचा…Maharashtra Breaking News Live : “मनुस्मृतीतील काही श्लोक पाठ्यपुस्तकात देणार”, केसरकरांच्या विधानावर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत दरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी सरपंच रणजीत शिंदे, बंधू नगरसेवक प्रकाश शिंदे, अजित सपकाळ, संजय मोरे, महेश शिंदे, विजय शिंदे यांच्यासह दरे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांचे हेलिपॅडवरच स्वागत केले. गावी विश्रांतीसाठी आणि शांततेसाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ते तीन दिवस गावी राहणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. विश्रांतीच्या काळात ते आपल्या शेतीलाही आवर्जून भेट देणार आहेत.

दरे व कोयना भाग १०५ गावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची ते माहिती घेणार आहेत. गुरुवार दि. ३० मे रोजी दरे गावचे ग्रामदैवत श्री जननी देवीची वार्षिक सत्यनारायण महापूजा असल्याने यावेळी ते सहकुटुंब मंदिरात उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा…सांगली : तासगावात भीषण अपघात, कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यांसह सहा जण ठार

गावच्या आणि गावातल्या सामुदायिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा त्यांचा पायंडा आहे तो त्यांनी पाळला आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर पुनश्च मुख्यमंत्री मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. ते बुलढाणा ला लग्नालाही जाणार आहेत.

हेही वाचा…“अनियमित बदल्या-बढत्या आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल…”, आरोग्य विभागाबाबत ठाकरे गटाचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री शिंदे गावी येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून जागा वाटपाची रस्सीखेच सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री दरे (ता महाबळेश्वर) गावी येऊन प्रत्येक वेळी येथून काहीतरी नवीन विचार घेऊन जातात त्यामुळे विधानसभेसाठी ते अजून शांत आहेत मात्र इथून गेल्यानंतर ते काय भूमिका घेतात लवकर लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तीन दिवसाच्या मुक्कामावर गावी सहकुटुंब आले आहेत.