मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल; तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा घेणार आढावा

कोकणासाठी किती मदत जाहीर होणार ?

संग्रहीत छायाचित्र

तौते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. तौते चक्रीवादळात कोकणातील घरं, झाडं, फळबागा तसंच इतर गोष्टींचं नुकसान झालं आहे. राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकसानाची पाहणी करत आहेत. फडणवीस दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री कधी घऱाबाहेर पडणार अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गस भेट देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार असून प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातची पाहणी करुन मदत जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असताना कोकणासाठी मुख्यमंत्री किती मदत जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कसा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी ८.३५ वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
८.४० वा. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण
सकाळी १०.१० – वायरी, ता.मालवण येथे “तौते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी १०.२५ – मोटारीने मालवण येथे आगमन व “तौते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी ११.०५ – निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
या पाहणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण
दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray konkan visit after cyclone tauktae sgy

ताज्या बातम्या