मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कडक लॉकडाउनचा इशारा; म्हणाले…

पुढील दोन दिवसात निर्णयाची शक्यता

प्रातिनिधिक

राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी जेजे रुग्णालयात जाऊन करोनाची लस घेतली. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. लस घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी लोकांना लसीबद्दल कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मोठी बातमी! नागपूर शहरात लॉकडाउनची घोषणा

“लसीकरणाबाबत कोणतीही भीती किंवा संभ्रम ठेवण्याची गरज नाही. लस घेताना अजिबात कळतही नाही, इतक्या सहज पद्धतीने ती दिली जात आहे. करोनाचा वाढत असल्याने लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या सर्वांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली करोनाची लस

पुढे बोलताना ते म्हणाले की, “कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा”.

“कदाचित आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधन पाळणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. औरंगाबादमध्ये निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत असल्याचं सांगण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावा लागेल. येत्या एक दोन दिवसांत आम्ही निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray lockdown jj hospital corona vaccine sgy

ताज्या बातम्या