scorecardresearch

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार लोकार्पण

Samruddhi Highway Inauguration: पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार

पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाला मुहूर्त अखेर ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आज महामार्गाचा दौरा करणार असून यावेळी यासंबंधी अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी याआधी वैजापूरमधील कार्यक्रमात बोलताना २ मे रोजी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असं सांगितलं होतं. पण २६ टोलनाक्यांवरील टोलवसुलीसाठीची निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रद्द करण्यात आली होती आहे. निविदा रद्द केल्यानंतर गुरुवारी टोलवसुलीसाठी नव्याने निविदा मागविण्यात आली होती. त्यामुळे २ मे रोजी होणारे नागपूर ते शेलू बाजार, वाशीम अशा २१० किमीच्या मार्गाचे उद्घाटन अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत होती.

“कुणी कितीही प्रयत्न केला, तरी माझं नाव…”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला!

समृद्धी महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाचे काम विलंबाने सुरू आहे. असे असताना नागपूर ते सेलू बाजार, वाशीम या २१० किमीच्या टप्प्यातील १०० टक्के काम पूर्ण झालं आहे. निविदा सादर करण्यासाठी २५ एप्रिल अंतिम तारीख असून २ मेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून टोल यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण कऱण्याचं आव्हान सध्या आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हे ७०० किमी अंतर केवळ सात तासांमध्ये पार करता येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray will inaugurate samruddhi highway on 2nd may sgy

ताज्या बातम्या