राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहेत. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या देखील कमी होत आहे. शिवाय, करोनामधून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार १३९ रुग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.  

राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ११ हजार ०७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३८% एवढे झाले आहे. 

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ८३ हजार ८९६ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २९ हजार ५५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०५,४६,५७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८३,८९६ (१०.८७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३२,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,१२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.