Corona Update : राज्यात ऑक्टोबरनंतर सर्वाधिक करोना मृत्यू; दिवसभरात २४,९४८ नवीन रुग्णांची नोंद

राज्यातील संसर्ग दर १०.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.

Maharashtra corona update

शुक्रवारी महाराष्ट्रात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे गेल्या वर्षीच्या ६ ऑक्टोबरनंतरचे सर्वाधिक आहेत. याशिवाय, राज्यातील संसर्ग दर १०.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा (१५.८८ टक्के) कमी आहे. राज्यात दिवसभरात २४,९४८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात राज्यात २४ हजार ९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्यातील काही शहरात अजूनही मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आज २४,९४८ रुग्ण आढळून आले असले, तरी बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ४५,६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात ७२,४२,६४९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

राज्यात दिवसभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०३ आहे. राज्याचा करोना मृत्यूदर १.८६ टक्के इतका असून, रिकव्हरी रेट ९४.६१ टक्के इतका आहे. आजपर्यंत राज्यात ७,४१,६३,८५८ नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ७६,५५,५५४ म्हणजेच १०.३२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासह महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३,०४० वर पोहोचली आहे. राज्यात २.६६ लाखांहून अधिक सक्रिय कोविड रुग्ण असून पुण्यात सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यात १४,६१,३७० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३ हजार २०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात १,३१२ रुग्ण आढळून आले आहेत. तर १० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. गुरुवारी मुंबईत १,३८४ रुग्ण आढळून आले होते. तर शुक्रवारी १,३१२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या १,०८९ इतकी आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra corona update 24948 new corona patients in state 28 january 2022 abn

Next Story
“असले न्यायाधीश त्या जागेवरून संपवले पाहिजे, माझ्यावर गुन्हे…”, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य
फोटो गॅलरी