Corona Update : महाराष्ट्रात करोनाचा वेग मंदावला; नव्या बाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली

बुधवारच्या तुलनेत राज्यात १०००० पेक्षा अधिक कमी रुग्ण आढळले आहेत

Maharashtra corona update

महाराष्ट्रात करोनाचा वेग हळूहळू कमी होत आहे. गुरुवारी राज्यात करोनाचे २५,४२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय गेल्या २४ तासांत ४२ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत राज्यात १०००० पेक्षा अधिक कमी रुग्ण आढळले आहेत. तर ओमायक्रॉनच्या ७२ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे महाराष्ट्राती एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या २९३० झाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण कमी होत आहेत. बुधवारी राज्यात करोना विषाणू संसर्गाचे ३५,७५६ रुग्ण आढळून आले होते. तर  ७९ रुग्णांचा या साथीमुळे मृत्यू झाला होता. गुरुवारी, राज्यात ३६,७०८ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. आतापर्यंत ७१,९७,००१ बाधितांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९४.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात १५,३१,१०८ रुग्ण हे होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३२५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

त्याचवेळी मुंबईत गुरुवारी कोविड-१९ चे १३८४ नवीन रुग्ण आढळले, जे बुधवारपेक्षा १,८५८ पेक्षा कमी आहे. त्याच वेळी, करोनामुळे आणखी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली. तर ५६८६ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. करोनाच्या शिरकावानंतर, मुंबईत आतापर्यंत एकूण बरे झालेल्या लोकांची संख्या १,००४,३८४ वर पोहोचली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra corona update 25425 new corona patients in the state abn

Next Story
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली; ८६ विद्यार्थ्यांच्या याचिकेवरील न्यायालयाच्या आदेशामुळे आयोगाचा निर्णय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी