मागच्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. खरंतर करोनाचे रूग्ण कमी झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र शनिवारी राज्यात ४३७ नवे करोना बाधित आढळले आहेत. तसंच दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सक्रिय रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या १९५६ सक्रिय रूग्ण आहेत.

शनिवारी राज्यात ४३७ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाचे सर्वाधिक रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात ५७१ करोना रूग्ण सध्याच्या घडीला आहेत. तर त्यानंतर मुंबई आणि ठाण्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात शनिवारी करोनामुळे दोन रूग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाचा वाढता धोका पाहता करोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या भारतात कोरोनाच्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी ‘लोपीनाविर-रिटोनावीर’, ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’, ‘आयव्हरमेक्टिन’, ‘मोलनुपिराविर’, ‘फॅविपिरावीर’, ‘अझिथ्रोमायसिन’ आणि ‘डॉक्सीसायक्लिन’ यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.

मास्क वापरण्याचं आवाहन

गेल्या काही दिवसांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्णही वाढू लागले आहेत. तसंच आता करोनाचे रूग्णही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे. देशात ज्या ज्या राज्यांमध्ये इन्फ्लुएंझाचे रूग्ण आणि करोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या राज्यांना मार्गदर्शक सूचना केंद्रातर्फे जारी करण्यात आल्या आहेत. मास्क वापरण्याचं आवाहन त्या सूचनांमध्येही करण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला पाच दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं असंही सांगण्यात आलं आहे.