Maharashtra Mayor Post Reservation List: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी काही महानगरपालिकांमध्ये भाजपाला सहाकारी पक्ष किंवा प्रसंगी विरोधी पक्षातील काही गटांचा पाठिंबा घेण्याची तजवीज करावी लागली. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या पक्षांना स्थानिक पातळीवर आपल्याच मित्रपक्षाविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक नेत्यांवर देण्याची वेळ ओढवली. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्तास्थापनेबाबत जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये राजकीय नाट्य रंगत असताना दुसरीकडे महापौरपदाची सोडत हादेखील चर्चेचा विषय ठरला होता. ही सोडत अखेर जाहीर झाली आहे.

कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?

२९ महानगरपालिकांमधील आरक्षणाचं गणित

अनुसूचित जमाती – १
अनुसूचित जाती – ३
ओबीसी – ८
सर्वसाधारण प्रवर्ग – १७

याशिवाय, २९ पैकी १५ महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित असणार आहे.

कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिक – अनुसूचित जमाती

ठाणे महानगरपालिका – अनुसूचित जाती

जालना महानगरपालिका – अनुसूचित जाती (महिला)

लातूर महानगरपालिका – अनुसूचित जाती (महिला)

इचलकरंजी महानगरपालिका – ओबीसी

पनवेल महानगरपालिका – ओबीसी

अहिल्यानगर महानगरपालिका – ओबीसी (महिला)

अकोला महानगरपालिका – ओबीसी (महिला)

उल्हासनगर महानगरपालिका – ओबीसी

कोल्हापूर महानगरपालिका – ओबीसी

चंद्रपूर महानगरपालिका – ओबीसी (महिला)

जळगाव महानगरपालिका – ओबीसी (महिला)

मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – खुला प्रवर्ग

धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

अमरावती महानगरपालिका – खुला प्रवर्ग

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका – खुला प्रवर्ग

मालेगाव महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

मीरा-भाईंदर महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

नागपूर महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

नांदेड-वाघाळा महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका – खुला प्रवर्ग

नाशिक महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

नवी मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

परभणी महानगरपालिका – खुला प्रवर्ग

सांगली-मिरज महानगरपालिका – खुला प्रवर्ग

वसई-विरार महानगरपालिका – खुला प्रवर्ग

सोलापूर महानगरपालिका – खुला प्रवर्ग

महिलांसाठी महापौरपद राखीव झालेल्या महानगरपालिका कोणत्या?

मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग

जालना महानगरपालिका – अनुसूचित जाती

लातूर महानगरपालिका – अनुसूचित जाती

अहिल्यानगर महानगरपालिका – ओबीसी

अकोला महानगरपालिका– ओबीसी

चंद्रपूर महानगरपालिका – ओबीसी

जळगाव महानगरपालिका – ओबीसी

धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग

पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग

नागपूर महानगरपालिका – खुला प्रवर्ग

नांदेड-वाघाळा महानगरपालिका – खुला प्रवर्ग

नवी मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग

मीरा-भाईंदर महानगरपालिका – खुला प्रवर्ग

नाशिक महानगरपालिका – खुला प्रवर्ग

मालेगाव महानगरपालिका – खुला प्रवर्ग

कोणत्या महानगरपालिकांमध्ये महापौरपद OBC वर्गासाठी राखीव?

इचलकरंजी महानगरपालिका – ओबीसी

पनवेल महानगरपालिका – ओबीसी

अहिल्यानगर महानगरपालिका– ओबीसी (महिला)

अकोला महानगरपालिका – ओबीसी (महिला)

उल्हासनगर महानगरपालिका – ओबीसी

कोल्हापूर महानगरपालिका– ओबीसी

चंद्रपूर महानगरपालिका– ओबीसी (महिला)

जळगाव महानगरपालिका – ओबीसी (महिला)