“गांजा ओढा अन् तहान लागली की…”; सदाभाऊ खोत यांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटीत कपात केली

Sadabhau Khot criticizes Thackeray government

महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटीत कपात केल्यानंतर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. विरोधक ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. राज्य सरकारने विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी ५० टक्क्यांनी कमी केले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. तसेच यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे.

“महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साइज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली. हरबल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा, असा महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार सुरु आहे. एक्साइज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम हातात घेतले आहे”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे,” असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे. 

अधिकाऱ्याने सांगितले की, “आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cuts excise duty on imported liquor sadabhau khot criticizes thackeray government srk

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या