scorecardresearch

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपाकडून मोठी जबाबदारी

फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर पक्षाने दिली नवी जबाबदारी

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपाकडून मोठी जबाबदारी

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचं संसदीय मंडळ (Parliamentary Board) आणि केंद्रीय निवडणूक समिती (Central Election Committee) नव्याने तयार केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान आणि नितीन गडकरी यांना यामधून वगळण्यात आलं आहे. जे पी नड्डा संसदीय मंडळाचे आणि भाजपाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. विशेष बाब म्हणजे निवडणूक समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

“दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण…”, आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांसमोर ठेवली अट; म्हणाले “त्यांचा गेम केला”

भाजपाच्या संसदीय मंडळात काही नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपूरा, सर्बानंद सोनेवाल, के लक्ष्मण आणि सत्यनारायण जातिया यांचा समावेश आहे.

दरम्यान निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भूपेंद्र यादव आणि ओम माथूर या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शाहनवाज हुसेन यांना निवडणूक समितीमध्ये स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे सोनेवाल आणि येडियुरप्पा यांना दोन्ही ठिकाणी स्थान मिळालं आहे.

येडियुरप्पा, सत्यनारायण जातिया आणि के लक्ष्मण यांना संधी देत भाजपाने आपण आपले जुने कार्यकर्ते आणि त्यांच्या अनुभवाचा किती आदर करतो हे दाखवून दिल्याचं भाजपा सूत्रांचं म्हणणं आहे. यासोबतच भाजपाने फेरबदल करताना विविधतेवर भर दिला असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. ईशान्येतून सर्बानंद सोनेवाल यांना संधी देण्यात आली असून, एल लक्ष्मण आणि बीएस येडियुरप्पा हे दक्षिणेतील आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra deputy cm devendra fadnavis included in bjp central election committee sgy