scorecardresearch

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी कोण आहे?

अनिक्षा जयसिंघानीचे वडील अनिल जयसिंघानी फरार आहेत.

maharashtra deputy cm devendra fadnavis wife amruta case against designer aniksha know who is she?
कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या एका डिझायनरच्या विरोधात FIR दाखल केला आहे. तिला काही वेळापूर्वीच अटकही करण्यात आली आहे. अमृता फडणवीस मागच्या १६ महिन्यांपासून अमृता फडणवीस या अनिक्षाला ओळखतात. अमृता फडणवीस यांच्या घरीही अनिक्षा गेली होती.अनिक्षा ही सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. काही वेळापूर्वी तिला अटक करण्यात आली आहे. तसंच तिचा भाऊ अक्षय जयसिंघानीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. हे सगळं प्रकरण राजकीय आहे का यावर आपण लवकरच भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपण जाणून घेऊ की अनिक्षा जयसिंघानी नेमकी कोण आहे?

कोण आहे अनिक्षा?

अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिलल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, फसवणूक करणं असे गुन्हे नोंद आहेत. अनिक्षाने कायद्याच्या विषयात पदवी घेतली. स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे. अनिक्षा जयसिंघानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. ती कपडे, ज्वेलरी, शूज हे डिझाईन करते. २०२१ मध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ती भेटली होती. तिने फॅशन विश्वातल्या विविध गोष्टी सांगितल्या आणि अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या विरोधात जो FIR केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनिक्षाशी पहिली भेट २०२१ मध्ये झाली होती. अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की अनिक्षाने त्यांना हे सांगितलं होतं की ती डिझायनर आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना हे सांगितलं की पब्लिक इव्हेंटमध्ये तुम्ही मी डिझाइन केलेले ड्रेसेस आणि ज्वेलरी परिधान करा. त्यामुळे मला माझ्या ब्रांडचं प्रमोशन करता येईल. अमृता फडणवीस यांनी ही बाब मान्य केली. मात्र अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात IPC च्या कलम १२० बी नुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता फडणवीस यांनी हा एफआयआर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला दाखल केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला ही माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जो एफआयआर दाखल केला आहे त्याचीही माहिती दिली. या प्रकरणाची योग्य प्रकारे तपासणी केली जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं की अमृता फडणवीस यांना अनिक्षा ने धमकी दिली होती की जर सरकारने अनिल जयसिंघानी यांच्या विरोधातली प्रकरणं मागे घेतली नाही तर मी तुम्हाला लाच घेतल्याच्या प्रकरणात अडकवू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी ही माहितीही दिली की अनिक्षा १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तसंच तिचं सागर या बंगल्यावरही येणं-जाणं होतं. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात १४-१५ केसेस आहेत. २०१५-१६ ला पहिल्यांदा ती अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर तिने अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला.

अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर दिली गेली

देवेंद्र फडणवीस यांनी हेदेखील सांगितलं की अनिक्षाकडून अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचं आमीष देण्यात आलं होतं. तसंच या मुलीने माझे संपर्क विविध पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी आहेत असंही सांगितलं. आता या अनिक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून काय काय माहिती मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 20:58 IST
ताज्या बातम्या