मुंबईः भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण( एसआयआर) मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या आज प्रसिध्द कर आल्या असून दोन कोटी मतदारांची नावे कमी झाली आहेत. या सर्व मतदारांना पुन्हा आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी पुढील महिनाभर संधी देण्यात आली आहे.
विशेष सखोल पुनरिक्षणापूर्वी महाराष्ट्रात एकूण ९कोटी ७८ लाख ५४ हजार०४९ इतके मतदार होते. प्रारुप मतदार यादीत यापैकी ७ कोटी.७१ लाख ६५ हजार ५६२ (७८.८६%) मतदार समाविष्ट करण्यात आले असुन त्यामध्ये ३.कोटी ९५. लाख ८९. हजार ९०५ पुरुष मतदार आणि ३ कोटी,७५ लाख,७२, हजार ५७० महिला मतदार आणि ३०८७ तृतीयपंथी मतदार आहेत. तर प्रारुप मतदार यादीमध्ये जुन्या मतदार यादीतील २ कोटी ०६,लाख ८८ हजार ४८७ (२१.१४%) मतदारांचा समावेश होऊ शकलेला नाही.
यामध्ये ३४ लाख मयत मतदारांची नावे रद्द करण्यात आली असून१७ लाख मतदारांची नावे दोन मतदार संघात होती. ती एका मतदार संघातून रद्द करण्यात आली आहेत.पुनरिक्षणापवीच्या मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांची नावे या प्रारुप मतदार याद समाविष्ट करता आलेली नाहीत अशा मतदारांच्या नावाच्या याद्या (गैरहजर / स्थलांतरित/मृत/द्वार/ASDDO) त्याबाबतच्या कारणासह उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसे याद्या जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या सुचना फलकावर सुध्दा प्रदर्शित करण्यात येत आहेत.
मतदार यादीतील निवासाच्या ठिकाणी गैरहजर असणे/ न सापडणे,त्या ठिकाणाहुन स्थलांतरित झालेले असणे, मतदार मृत झालेले असणे,अन्यत्र नोंदणी झालेली असणे / दुबार असणे आणि मतदारांनी गणना प्रपत्र भरुन देण्यास नकार देणे आदी कारणांमुळे दोन कोटी मतदारांची नाव प्रारुप मतदार यादीतून वगळण्या आली आहेत.
ज्या पात्र मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली नसतील तसेच ०१.१०.२०२६ या दिनांकास किंवा त्यापुर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी प्रपत्र-६ त्यासोबतच्या घोषणापत्रासह भरता येईल, ज्यायोगे योग्य पडताळणीनंतर संबंधित म नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) सदर प्रपत्रावर उचित निर्णय घेतील व पात्र मतदारांच अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील अशी माहीती आयोगाच्या अधिकाऱ्या्ंनी दिली.
मतदार यादीमधील एखाद्या नावाबाबत आक्षेप असल्यास, संबंधित मतदार संघातील मतदार असलेली प्रपत्र- ७ मध्ये आक्षेप नोंदवू शकेल. तसेच मतदार यादीमधील नोंदीमध्ये काही सुधारणा करावयाच्या असल्यास (उदा. मतदाराचे नाव, पत्ता, वय, लिंक संबंधित मतदार प्रपत्र- ८ द्वारे अशी विनंती करु शकेल.
दावे व हरकतीच्या कालावधीत विधानसभा मतदारसंघ निहाय दाखल करण्यात आलेल्या दावे व हरकतींच्या याद्या मतदान नोंदणी अधिकारी यांच्याकडून प्रत्येक आठवड्यास तयार करण्यात येतील व अशा याद्या जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध येतील.
राज्यामध्ये एकूण २८८ विधानसभा मतदारसंघाकरिता २८८ मतदार नोंदणी अधिकारी असून ७००० पेक्षा जास्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी अधिसुचित करण्यात आलेले आहेत. दावे व हरकती तरीव नौटिर्जीच्या अनुषंगाने कार्यवाही त्यांच्या स्तरावरून दि. ३१-०८-२०२६ ते दि. २९-१०-२०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात करण्यात येईल. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार दि. ४.११.२०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.
मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी आलेला अर्ज विहित कागदपत्राच्या पुर्ततेअभावी नाकारल्यास संबंधित मतदारास विहित कागदपत्राची पुर्तता करुन नव्याने अर्ज करता येईल किंवा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मधील कलम २४ मधील तरतुदीनुसार अपिल दाखल करता येईल. या प्रारुप मतदारयाद्या भारत निवडणूक आयोगाचे Voter Service P (https://voters.eci.gov.in/), मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेत (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/) तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकार संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. या प्रारुप मतदार याद्या सॉफ्ट तसेच हार्ड प्रतिमध्ये मान्यत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हास्तरावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षणाअंतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणापूर्वी एकुण मतदान केंद्राची संख्या १,००, २५३ इतकी होती. त्यामध्ये ३९४ नवीन मतदान केंद्रांची भर पडली व मतदार कमी झाल्यामुळे ४३१ मतदान केंद्रे कमी झाली. त्यामुळे आता एकुण मतदान केंद्रांची संख्या १,००,२१६ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे एकुण १४०३ मतदान केंद्रांचे स्थळ बदल (Location Change) करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये तात्पुरत्या स्वरुपामध्ये (Temporary Structure) स्थापित करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांना त्याच मतदान केंद्र क्षेत्रात पक्क्या जागेमध्ये/ इमारतीमध्ये स्थलांतरित केलेल्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदान केंद्रे कायमस्वरुपी जागेवर स्थलांतरित करण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या स्थायी सुचना विचारात घेऊन हि कार्यवाही करण्यात आलेली आहे.
