जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाले आहेत. एकही हंगाम साथ देत नसल्यामुळे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतातील कापूस काढण्याची वेळ आली असता ऐनवेळी अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रोहिदास पाटील यांनी आपल्या पाच एकर जमिनीवर लावलेल्या कापसाच्या शेतावर रोटर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पाहणी केली नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने ठोस मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.