Maharashtra Anant Chaturdashi 2026 Updates, 25 September 2026 : गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सांगता झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यभरातील गणेश मंडळांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला. मुंबई आणि पुण्यात अद्यापही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकजण भावूक होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राज्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Ganpati Visarjan Live Today, 26 September 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
'लालबागच्या राजा'चं विसर्जन संपन्न
लाडक्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाने यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. तब्बल २४ तासांहून अधिक काळ चाललेल्या अथांग विसर्जन मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे अत्यंत भावुक वातावरणात विसर्जन संपन्न झाले. राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटला होता.
चिंचपोकळीच्या चिंतामणींचं विसर्जन, तर लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात विसर्जन
मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल २२ ते २३ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा समुद्रकिनारी दाखल झाला आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने हा तराफा आता गिरगाव समुद्रकिनाऱ्यावरून खोल समुद्रात नेण्यात आला आहे. काहीच वेळात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
मंत्री गिरीश महाजनांचा ढोल-ताशांच्या तालावर ठेका
जळगाव शहरात लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शहरातील प्रमुख मार्गांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी टॉवर चौकातील आपल्या स्टेजजवळ येऊन गणेशभक्तांना गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी आग्रह केल्यानंतर गिरीश महाजन यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन
आज चौपाटीवर गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे. आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. देवाला निरोप देताना लोक भावूक होत आहेत. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन झालं आहे.
लालबागचा राजा समुद्रकिनारी दाखल; कोळी बांधवांच्या मदतीने थोड्याच वेळात विसर्जन
मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल २२ ते २३ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव समुद्रकिनारी दाखल झाला आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने हा तराफा आता गिरगाव समुद्रकिनाऱ्यावरून खोल समुद्रात नेण्यात येणार आहे. त्यानंतर विधिवत लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल. काहीच वेळात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणपती मूर्ती विसर्जन सुरू
लालबागचा राजा गिरगांव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला आहे. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणपती मूर्ती विसर्जन सुरू आहे.
रायगडात दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
रायगड जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विविध विसर्जन घाटांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळी ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण रायगड भक्तिमय झाला. रायगड जिल्ह्यात एकूण १८ हजार ५४४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १६६ सार्वजनिक आणि १८ हजार ३७८ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे.
लालबागचा राजा गिरगांव चौपाटीवर दाखल
मुंबईतील लालबागच्या राजाची शुक्रवारी विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी लालबागचा राजा गिरगांव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला आहे. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक आणि 'वंतारा'चे संस्थापक अनंत अंबानी देखील या विसर्जन सोहळ्यात सहभागी होत आहेत.
; सर्व काही आपोआप घडेल अशी अपेक्षा आपण करू नये - दिविजा फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या, दिविजा फडणवीस स्वच्छता अभियानाविषयी म्हणाली, "मला वाटतं की हे एक खूप महत्त्वाचं कार्य आहे, आणि माझा विश्वास आहे की आपल्या शहराचं आणि महासागरांचं कल्याण ही आपली स्वतःची जबाबदारी आहे; सर्व काही आपोआप घडेल अशी अपेक्षा आपण करू नये. आज अनेक विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था जे करत आहेत, त्याचप्रमाणे आपणही सक्रियपणे सहभागी झालं पाहिजे. त्यामुळे, हे एक अद्भुत कार्य आहे, आणि मला वाटतं की जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपल्या सर्वांसाठी ही एक सुरुवात असायला हवी..."
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सांगता झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यभरातील गणेश मंडळांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. मुंबईत सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ६, २३५ गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं आहे. तसेच विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
सार्वजनिक ६, २३५
घरगुती – २७६१५
गौरी – ५५३
एकूण = ३४४०३
लालबागचा राजा गिरगांव चौपाटीवर दाखल; थोड्याच वेळात विसर्जन होणार
मुंबईतील लालबागच्या राजाची शुक्रवारी दुपारी विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पहाटे ४ वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक २ री सुतार गल्ली या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी हार घालून लालबागच्या राजाचं स्वागत करण्यात आलं. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून लालबागचा राजा गिरगांव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला आहे. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि पुण्यात अद्यापही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरूच
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सांगता झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यभरातील गणेश मंडळांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला. मुंबई आणि पुण्यात अद्यापही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.
चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीवर दाखल
आज चौपाटीवर गणपतीचं विसर्जन करण्यात येतं आहे. आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. देवाला निरोप देताना लोक भावूक होत आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून थोड्याच वेळात विसर्जन करण्यात येणार आहे.
लालबागचा राजा कुठे पोहचला? विसर्जन कधी होणार? बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगांव चौपाटीवर गणेशभक्तांचा महासागर
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी, विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर भाविकांचा अथांग सागर लोटला आहे. काल संध्याकाळपासूनच हजारो भाविक लालबाग परिसरात दाखल झाले असून, रात्रभर भाविकांची गर्दी कायम आहे. राजाची एक झलक आणि शेवटचं दर्शन मिळावं, यासाठी भाविक तासन्तास एकाच जागेवर पाय रोवून उभे आहेत. भक्ती आणि भावनेने वातावरण भारावून गेलं असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर भाविकांचा अथांग सागर
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर भाविकांचा अथांग सागर लोटला आहे. काल संध्याकाळपासूनच हजारो भाविक लालबाग परिसरात दाखल झाले असून, रात्रभर भाविकांची गर्दी कायम आहे. राजाची एक झलक आणि शेवटचं दर्शन मिळावं, यासाठी भाविक तासन्तास एकाच जागेवर पाय रोवून उभे आहेत. भक्ती आणि भावनेने वातावरण भारावून गेलं असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन
पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन पार पडले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाऊसाहेब रंगारी गणपती अलका चौकात दाखल झाला होता. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
मुंबईत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर
मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी ५ हजार ४७१ घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. गणपती बाप्पा मोरयाचा, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करत गणरायाला निरोप देण्यात आला.
मुंबईकरांसाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते-महापौर रितू तावडे
मुंबईत अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने वेगळा उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो आहे. गणपती बाप्पा विघ्न घेऊन जातील आणि सुख देऊन जातील. आता गणपती बाप्पा चालले असले तरी पुढच्या वर्षी लवकर येतील हा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे असं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे. मी मुंबईकरांसाठी बाप्पाकडे प्रार्थना करते असंही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव साजरा होतो. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरूवात केली होती. या उत्सवात सगळ्या जाती धर्माचे लोक सहभागी होतात. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव आनंद पसरवणारा आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांना आर्थिक मदत केली जाईल असं म्हणत रामदास आठवले यांनी गणेश उत्सवाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
लालबागचा राजा गणपतीच्या मिरवणुकीत भाविकांची अलोट गर्दी
मुंबईतील लालबागचा राजा हा प्रसिद्ध गणपती पहाटे ४ वाजता २ री सुतार गल्ली या ठिकाणी पोहचला आहे. या ठिकाणी हार घालून लालबागच्या राजाचं स्वागत करण्यात आलं. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची अलोट गर्दी पाहण्यास मिळते आहे.
विरोधकांना सुबुद्धी मिळो एवढंच मी म्हणेन-एकनाथ शिंदे
आज चौपाटीवर गणपतीचं विसर्जन करण्यात येतं आहे. आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. देवाला निरोप देताना लोक भावूक होत आहेत. पोलिसांनी उत्तम नियोजन केलं आहे, मुंबई महापालिकेने चांगलं नियोजन केलं आहे. लाखो लोक या ठिकाणी आले होते. नियोजन चांगलं आहे. विरोधकांबाबत मी इतकंच म्हणेन की सगळ्यांना सुबुद्धी मिळो आणि दुर्बुद्धीचं विसर्जन होवो असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
मुंबईत उत्साहाचं आणि श्रद्धेचं वातावरण पाहून मन भरून आलं-जुही चावला
मुंबईत अत्यंत उत्साहाचं आणि श्रद्धेचं वातावरण आहे. लोक गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जात आहेत ते किती उत्साहाने जात आहेत. सगळे लोक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि आनंदाने चालले आहेत. खूप छान वातावरण आहे. ही मुंबईची खरी शान आहे असं मला वाटतं असं अभिनेत्री जुही चावलाने म्हटलं आहे. आज प्रत्यक्ष हे सगळं पाहून मला भरून आलं आहे असंही जुही चावलाने म्हटलं आहे.
विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो, देवेंद्र फडणवीस यांचं बाप्पाकडे मागणं
मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शिस्तीने सुरु आहेत. गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो असा आशीवार्द बाप्पाकडे मागितल्याचे त्यांनी सांगितले. गणेश भक्तांचा गर्दीचा पूर असला तरी अगदी शिस्तीने गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. या क्षणी आनंद एका डोळ्यात तर दुसऱ्या डोळ्यात दु:ख असते. लाखो गणेश भक्त हा सोहळा पाहात आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
लालबागचा राजा भायखळा फायर स्टेशनजवळ येताच अग्निशमन दलाकडून सलामी
लालबागचा राजा भायखळा फायर स्टेशन जवळ दाखल होताच भायखळा अग्निशमन केंद्राकडून लालबागचा राजाला सलामी दिली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीचे सायरन वाजून राजाला सलामी दिली. यावेळी लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन
गेले बारा दिवस मनापासून बाप्पाची पूजा आणि सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला. त्यामुळे भक्तांच्या मनात एकीकडे उत्साह तर दुसरीकडे बाप्पाला निरोप देताना डोळ्यांत अश्रू असं भावनिक वातावरण पाहायला मिळालं. मुंबईसह देशभरात आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात निघाल्यात. आर्थिक राजधानी मुंबईत मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, करी रोडचा कैवारी, तेजुकाया असे अनेक मोठ्या मंडळाच्या गणपतींचे विसर्जन पार पडलं.
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास पोस्ट
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास पोस्ट. मुंबईतल्या विविध सार्वजनिक उत्सवांतील गणरायांचे फोटो पोस्ट करत लिहिला खास संदेश.
आनंद, जल्लोष आणि बाप्पाचा गजर! गणरायाच्या विविध रूपांत, भक्तीचा एकच रंग असा संदेश लिहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो पोस्ट केले आहेत.
मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी जनसागर
मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान भक्तांचा प्रचंड उत्साह आणि जनसागर पाहायला मिळाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले. बेलबाग चौकातून दुपारी 4 वाजता मिरवणूकीला सुरवात झाली होती. श्रीमंत दगडूशेठ गणपती बप्पाच्या मूर्तीच विसर्जन रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी झालं.
वर्षा निवासस्थानी कुटुंबीयांसोबत लाडक्या गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा एक नवा आरंभ आहे. बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहोत, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर होवोत, हीच मनोभावे प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/2103493299583787235?s=20

डीजे, फटाके, लेझरवर बंदी; विसर्जन मिरवणुका काढायच्या कशा? न्यायालयाच्या आदेशानंतर गणेश मंडळांमध्ये संभ्रम (AI Image)
