महाराष्ट्रातील ‘त्या’ मुलीची नासामध्ये निवड झालेलीच नाही; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

नासाच्या एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाल्याची माहिती देण्यात आली होती

Maharashtra girl diksha shinde nasa panel selection false information

महाराष्ट्रातील औरंगाबादच्या १४ वर्षीय दीक्षा शिंदेची नासाच्या एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाल्याची माहिती २० जुलै रोजी समोर आली होती. १२ ते १६ जुलै २०२१ पर्यंत पॅनेलच्या बैठकीत दीक्षा शिंदेने सहभाग घेतला होता असे सांगण्यात आलं होतं. ब्लॅक होल्स आणि गॉडवर एक सिद्धांत लिहिला असल्याचे तिने म्हटले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने दीक्षा शिंदेशी संबंधित एक अहवाल प्रसिद्ध केला होता. पण आता चुकीच्या माहितीच्या आधारावर तिची निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दीक्षा शिंदेतर्फे दावा करण्यात आला होता की इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंजिनीअरिंग रिसर्चमध्ये मे २०२१ मध्ये तिचा ‘आपण ब्लॅक होलमध्ये राहतो का?’ रिसर्च पेपर स्वीकारला होता. एएनआयसोबत बोलताना दीक्षा शिंदे म्हणाली होती की, “जून २०२१ मध्ये एमएसआय व्हर्च्युअल पॅनेलसाठी पॅनेलिस्ट म्हणून माझी निवड झाली होती. मी ऑफर स्वीकारली आहे आणि लवकरच काम सुरू करेन. माझे काम विद्वानांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे पुनरावलोकन करणे, नासाबरोबर संशोधन करण्यासाठी दृष्टिकोन विकसित करणे आणि संशोधन क्षेत्र यांच्यातील संबंध समजून घेणे आहे.”

जेव्हा ही बातमी ट्विटरवर शेअर करण्यात आली, तेव्हा अनेक जणांनी दीक्षा शिंदेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि काहींनी दीक्षाच्या नासाच्या प्रमाणपत्रात झालेल्या चुकांचाही उल्लेख केला. यासोबतच त्याच्या कथित शोधनिबंधावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर एएनआयने दीक्षा शिंदेशी संपर्क साधून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले. शिंदेने तिला आलेल्या ईमेलवर काय घडले ते दाखवले, ज्यामध्ये नासाच्या ईमेलची URL nasa.gov होती आणि एका व्हिडीओ कॉन्फरन्सचे स्क्रीनशॉट दाखवत दीक्षाने दावा केला की ती कॉन्फरन्स नासाच्या अधिकाऱ्यांसोबत होती. याशिवाय दीक्षाने तिच्या रिसर्च पेपरची प्रतही दिली, पण ज्या वेबसाईटवर ती होती तिची लिंक चालत नव्हती.

यानंतर एएआयने या प्रकरणाबाबत नासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. २६ ऑगस्ट रोजी नासाच्या कॅथरीन ब्राऊनने एएनआयच्या ईमेलद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. दीक्षा शिंदे यांची पॅनेलिस्ट म्हणून निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. पण, चुकीच्या माहितीच्या आधारे त्याची निवड झाल्याचे त्या म्हणाल्या. नासाने दीक्षा शिंदेचा कोणताही शोधनिबंध स्वीकारला नाही. दीक्षा शिंदे यांची निवड कळल्यानंतर रद्द करण्यात आल्याचे ब्राऊन यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra girl diksha shinde nasa panel selection false information abn

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या