शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली –
– छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
– यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
– सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
– करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.
– महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
– फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
– आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ
एकीकडे लसीकरणाची तयारी सुरु असताना राज्यात बुधवारी २४ तासात ३४५१ नवे करोना रुग्ण सापडले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

“राज्यात गेल्या २४ तासात ३४५१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर २४२१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९ लाख ६३ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra government appeal over celebratation of shivjayanti sgy