Maharashtra Government Formation Updates: देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज (५ डिसेंबर) सायंकाळी मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी होईल. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याने आझाद मैदानात जंगी शपथविधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसह २० ते २२ मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी करण्याची योजना होती. पण महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरून एकमत होऊ शकले नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी पार पडणार आहे. मात्र आता इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? याबाबतचे सुतोवाच शिवसेना (शिंदे) गटाच्या नेत्यांनी केले आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी ११ किंवा १२ डिसेंबरला करण्याचे ठरविण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी कोणाला संधी द्यायची, खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या वाटपाचा पेच यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपूर्ण मंत्रिमंडळाचा जंगी शपथविधी करण्याचे नियोजन तूर्तास फिसकटले आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे नेते भरत गोगावले यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना इतर मंत्र्यांच्या शपथविधीबाबत माहिती दिली.

dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
Eknath Shinde )
Eknath Shinde : “मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं”, उद्योगपतींसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde criticized opposition claiming elections sealed Dhanushyaban and Shiv Sena s fate
राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तर मी तुमची काळजी घेईन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योग मंत्र्यांना इशारा

हे वाचा >> Maharashtra Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, एकनाथ शिंदेंबाबत संदिग्धता कायम!

पंतप्रधान मोदींना वेळ नसल्यामुळे आज शपथविधी नाही

भरत गोगावले म्हणाले, “इतर मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल अद्याप आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाही. पण इतर मंत्र्यांना ११ डिसेंबर रोजी शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला वेळ थोडा कमी असल्याचे म्हटले जात आहे. तेवढ्या वेळेत इतरांचे शपथविधी उरकणार नाहीत. त्यामुळे आज फक्त तिघांना शपथ दिली जाईल. उर्वरित मंत्र्यांना नंतर शपथ दिली जाईल.” मात्र ११ डिसेंबरला किती मंत्र्यांना शपथ दिली जाईल, याबाबत गोगावले यांनी निश्चित माहिती दिली नाही. ते म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे.

तर शिंदे गटाचेच दुसरे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार १२ किंवा १३ डिसेंबर रोजी होईल, अशी शक्यता वर्तविली आहे.

हे ही वाचा >> “महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे, गरज असेल तर..”; ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका

कलंकित चेहऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह कायम

भाजपने आक्षेप घेतला असला तरी एकनाथ शिंदे हे संजय राठोड, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचा समावेश करावा, या मुद्द्यावर फडणवीस यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीनही पक्षांमध्ये मंत्रीपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे आणि कोणाला वगळायचे, असा पेच फडणवीस आणि शिंदे यांच्यापुढे आहे.

आणखी वाचा >> कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची भूमिका ठेवली आहे.

Story img Loader