वाई : महाबळेश्वर तालुक्यातील मांघरला आता ‘मधाचे गाव’ अशी ओळख मिळाल्यामुळे मध उत्पादनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी व्यक्त केला. केवळ मधमाशा पालनावर जगणाऱ्या या गावाला राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सोमवारपासून ही नवी ओळख बहाल करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावात मोठय़ा प्रमाणावर मधमाशांचे पालन होत़े  त्यातून मोठय़ा प्रमाणात मध उत्पादन होत़े महाबळेश्वर येथील भिलारला साकारलेल्या ‘पुस्तकांचे गाव’च्या धर्तीवर येथे ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविण्याचा विचार पुढे आला. एकटय़ा मध उत्पादनातून या परिसराचा झालेला विकास पाहून या विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी याचा पाठपुरावा केल्यावर सोमवारी या योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी देसाई म्हणाले, ‘‘निसर्ग साखळीत मधमाशांची मोठी भूमिका आहे. या मधमाशा पालनातून मध उत्पादन करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. या नव्या ‘मधाचे गाव’ योजनेतून मध उत्पादनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल. अशा प्रकारची गावे प्रत्येक जिल्ह्यात लवकरच स्थापन करण्यात येतील़’’

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government launch honey tourism at village near mahabaleshwar zws
First published on: 17-05-2022 at 02:27 IST