scorecardresearch

सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा! सरकार शिवरायांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखंही महाराष्ट्रात आणणार

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत

सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा! सरकार शिवरायांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखंही महाराष्ट्रात आणणार
शिवाजी महाराज (संग्रहित फोटो)

छत्रपती शिवाजी महाराजा यांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपर्वी दिली होती. २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणार आहेत. या कार्यक्रमापर्यंत जगदंबा तलवार ब्रिटनने दिली, तर हा आनंदोत्सव आणखी उत्साहात साजरा होईल, असे मुनगंटीवार म्हणाले होते. दरम्यान, आता मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखंदेखील महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती दिली आहे.

हेही वाचा >>> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलो- एकनाथ शिंदे

“ब्रिटनमध्ये असलेली जगदंबा तलवार परत यावी. ज्या दगलबाज अफजलखानाने पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला महाराष्ट्रीय बाणा दाखवला आणि त्याचे पोट ज्या वाघनखांनी फाडले ती वाघनखंदेखील ब्रिटनमध्ये आहेत. ते शिवराज्याभिषेकदिनापर्यंत महाराष्ट्रात यावीत असा आमचा प्रयत्न आहे,” अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

हेही वाचा >>>राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, म्हणाले “डॉ. आंबेडकर सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग…”

“जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना यामध्ये विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना किती यश मिळेल हे मी आताच सांगू शकत नाही. मात्र प्रयत्न करण्यास हरकत नाही,” असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:06 IST

संबंधित बातम्या