Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Updates MNS, AAP Wins: आज राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यातील थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून शिंदे-भाजपा की महाविकास आघाडी अशी चर्चा सुरु असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही एका ठिकाणी बाजी मारली आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे दिल्ली महानगरपालिकेमध्ये अडीच दशकांपासूनची भाजपाची सत्ता खालसा करणाऱ्या अरविंद् केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दोन जागा जिंकल्या आहेत.

उस्मानाबादमधील दोन ग्रामपंचायती ‘आप’कडे

उस्मानाबादमधील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. गोपाळवाडी ग्रामपंचायतीत भाजपा विजयी झाली आहे. तर कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायत आपकडे आली आहे. वाखरवाडी आणि गोरेवाडी ग्रामपंचयातीत ठाकरे गटाचा विजय झाला आहे.

Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics
Maharashtra News : “उद्धव ठाकरे तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल तर….”, आशिष शेलारांचं खुलं आव्हान
nana patole prakash ambedkar
नाना पटोलेंचा अपघात की घातपात? प्रकाश आंबेडकर संशय व्यक्त करत म्हणाले, “निवडणुकीच्या काळात…”
PM Modi Public Meeting in Chandrapur for Sudhir Mungantiwar Lok Sabha Election 2024
PM Narendra Modi in Chandrapur : “कमिशन द्या नाहीतर प्रकल्प थांबवा असं उद्धव ठाकरेंच्या मविआ सरकारचं धोरण होतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
Ashok chavan
“शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसची धुळधाण केलीय, मी तिकडे असताना…”, अशोक चव्हाणांचा टोला

पालघरमध्ये मनसेचा विजय

पालघरमध्ये मनसेने खातं उघडलं असून गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली आहे. सातपाटीमध्येही मनसेचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. या विजयासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी, “याबद्दल आनंद आहे आणि हा आकडा वाढवत जाऊ,” असं म्हटलं आहे.

शिरोळ तालुक्यात शिंदे गटाने जिंकल्या चार ग्रामपंचायती

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तसंच कागल तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर भाजपा विजयी झाली आहे. दुसरीकडे कागलमधील पिराचीवाडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

कोल्हापुरात ठाकरे गटाने खातं उघडलं

कोल्हापूर जिल्ह्यातील व्हनाळी येथे माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी झाले आहेत.

सिंधुदुर्गात ठाकरे गटाने खाते उघडले

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सिंधुदुर्गात खाते उघडले आहे. देवगडमधील मणची ग्रामपंचायत शिवसेनेकडे आली आहे.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

बारामती तालुक्यातील सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. आहे. तिन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.

एकनाथ खडसेंनी गड कायम राखला; भाजपा, शिंदे गटाला धक्का

एकनाथ खडसे यांनी गड कायम राखला आहे. कुर्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बिपिन महाजन यांचे पॅनल विजयी झाले आहे. तर उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.