मुंबई:राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुमारे १३०० कोटींनी घट झाली आहे. ओमायक्रॉनच्या लाटेत लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज्यात वस्तू आणि सेवा कराचे १९ हजार ४२३ कोटींचे संकलन झाले. जानेवारी महिन्यात राज्यात २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले होते. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात संकलनात १२८२ कोटींची घट आली. राष्ट्रीय पातळीवर जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत ५.६ टक्के घट झाली. महाराष्ट्रातही हा कल कायम राहिला.

Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
pune c dac marathi news, c dac campus placements marathi news
सीडॅकच्या ‘प्लेसमेंट्स’ना फटका; दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांमध्ये घट
divyang survey marathi news, maharashtra divyang survey marathi news
राज्यात तीस वर्षांनी दिव्यांग सर्वेक्षणाला मुहूर्त… होणार काय?

फेब्रुवारीत २८ दिवस असल्याने जानेवारीच्या तुलनेत संकलन कमीच होते. पण याबरोबरच ओमायक्रॉनच्या लाटेमुळे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीत लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी याचा संकलनावर परिणाम झाल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांची तुलना केल्यास फेब्रुवारीतील संकलन घटले आहे.

आतापर्यंत १ लाख ९७ हजार कोटींचे संकलन

राज्यात चालू आर्थिक वर्षांत (२०२१-२२) वस्तू आणि सेवा कराचे १ लाख ९७ हजार, ६८७ कोटींचे संकलन झाले आहे. देशात वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात महाराष्ट्र हे आघाडीवरील राज्य आहे. २०२०-२१ या वर्षांत १ लाख ४२ हजार कोटींचे संकलन झाले होते. संकलनात ३३ टक्के वाढ झाली.  गेल्या वर्षी टाळेबंदी आणि कठोर निर्बंधामुळे राज्याची आर्थिक गाडी रुळावरून घसरली होती. यंदा परिस्थिती सुधारली आहे. देशात संकलनात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवरील राज्य ठरले आहे. फेब्रुवारीत कर्नाटक ९,१७६ कोटी, गुजरात ८,८७३ कोटी, तमिळनाडू ७,३९३ कोटींचे संकलन झाले.