“मंत्रालयातील संबंधित कर्मचारी करोना बाधित नाही. आम्ही आता मंत्रालयातील गर्दी बंद केली आहे. बाहेरच्या लोकांना सध्या मंत्रालयात येऊ दिलं जात नाही. मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गर्दी होऊ नये, तसंच कर्मचाऱ्यांचीही गर्दी होऊ नये, असा आमचा विचार आहे. काही महत्त्वाची कामं वगळता अन्य कामं थांबवता येतील का हे आम्ही पाहणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे याबाबत निर्णय घेतील,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा- CoronaVirus : महाराष्ट्रात पहिला बळी, दुबईहून आलेल्या रुग्णाचा मुंबईत मृत्यू
काय आहे प्रकरण ?
मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याच्या भावाला आणि त्यांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ते तपासासाठी रूग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान, मंत्रालयातील कर्मचारी आणि त्यांचा भाऊ एकाच इमारतीत वास्तव्यास आहेत. तसंच त्यांची रोज भेटही होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर करोनाची चाचणी करण्यासाठी संबंधित कर्मचारी रूग्णालयात दाखल झाला होता. परंतु त्यांच्या चाचणीचा अहवाल मिळाला असून त्यांना करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.