राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा या मराठा संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे समाजात रोष निर्माण होत असून, सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, यानंतर तानाजी सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली असून माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय स्पष्टीकरण दिलं आहे?

“मी माझं वक्तव्य नाकारत नाही, बोलण्याच्या ओघात झालं असावं. पण तुम्ही फक्त तेवढाच भाग काढून पाहू नका असं माझं जाहीर आवाहन आहे. माझं एक तासांचं भाषण आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सहकारी माझ्यासोबत उपस्थित होते,” असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”

पुढे ते म्हणाले “सत्तांतर झाल्यानंतर सहा महिन्यात आरक्षण रद्द झालं हे सर्वांनीच पाहिलं. त्या दिवसापासून सध्याचं सत्तांतर होईपर्यंत कोणीही मोर्चा काढला नाही, भाष्य केलं नाही. असं असतानाही आम्ही मराठा आरक्षणावर चर्चा करत होतो. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खुर्चीवर बसेपर्यंत आंदोलनाची भाषा सुरु केली. आम्हाला यामधून, त्यामधून आरक्षण हवं वैगेरे अशा मागण्या होत आहेत. पण आपण टिकाऊ आरक्षण मिळवू असं माझं म्हणणं आहे आणि ते मी मिळवणारच. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशीच माझी घोषणा आहे”.

“टिकाऊ आरक्षण द्या”

“जे विरोधात बोलत आहेत त्यांना तानाजी सावंत आणि त्यांचे सहकारी आरक्षणासाठी काय करत आहेत याची माहिती नाही. तगादा लावलाच पाहिजे, पण थोडा वेळ द्या. आम्ही संबंधित नेत्यांशी चर्चा करत आहोत,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली. “माझ्या समाजातील मराठी मुलांना टिकाऊ आरक्षण दिलं पाहिजे यावर मी ठाम आहे,” असं ते म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान

माफी मागितली

खाज सुटली शब्दावरुन आक्षेप घेतला जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “तो शब्द मी मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करत मी माफी मागतो. ज्या समाजात मी वाढलो तिथल्या पाळण्यातल्या मुलापासून ते आजोबापर्यंत सर्वांची माफी मागण्यास काही अडचण नाही. माझा समाज मला माफ करेल. मी त्याचा एक भाग आणि घटक आहे”. हे वाक्य मराठा समाज आणि झगडणाऱ्यांसाठी हे वाक्य नव्हतं असाही दावा त्यांनी केला.

तानाजी सावंत यांच्या कोणत्या वक्तव्यावरुन वाद?

रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदू गर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले “मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra health minister tanaji sawant aplogoy over statement on maratha reservation shinde fadnavis sgy
First published on: 26-09-2022 at 13:53 IST