बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या तरतुदीबाबत विचार सुरू- दिलीप वळसे पाटील

महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडळासह घेतली गृहमंत्र्यांची भेट

Maharashtra Home Minister Dilip Walse Patil, MNS,
महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडळासह घेतली गृहमंत्र्यांची भेट

साकीनाका येथे ३४ वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर आणि राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनेतील वाढ पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केलं. यावेळी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्यासह जनहित व विधी कक्षाचे सरचिटणीस संतोष सावंत, गोरेगाव महिला विभाग अध्यक्षा धनश्री नाईक उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने बलात्काराच्या घटनांची प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे, महिलांवरील अत्याचाराचे एफआयआर घटनेनंतर २४ तासात नोंदवून घेणे, राज्य महिला आयोगाला तात्काळ पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, बलात्कार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्याची तरतूद शक्ती कायद्यात करावी त्यासाठी शक्ती कायद्याची राज्यात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, पॉक्सो कायद्यातील पळवाटा दूर कराव्यात, महिलांविषयक प्रकरणांचा स्वतः गृहमंत्र्यांनी दर महिन्यातून एकदा आढावा घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी गृहमंत्र्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत काही मुद्द्यांवर आपलं म्हणणं विस्तृतरित्या सादर करण्यास सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra home minister dilip walse patil mns rape accused shakti law sgy